अंगावर चामखीळ का येतात? त्याची कारणे चामखीळचे प्रकार व होमिओपॅथिक उपचार

चामखीळ म्हणजे काय ..?

चामखीळचा त्रास अनेकांना असतो. त्वचेवर चामखीळ होण्यासाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (human papillomavirus) कारणीभूत असतो. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसला HPV व्हायरस असेही म्हणतात. चामखीळला warts असे म्हणतात. चामखीळ हे शरीरासाठी फारसे धोकादायक नसतात. मात्र अंगावर चामखीळ असल्याने त्वचेच्या सौन्दर्यावर थोडा परिणाम होऊ शकतो.

चामखीळ येण्याची कारणे

ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे (HPV व्हायरसमुळे) अंगावर चामखीळ येतात. शरीरावर असलेले चामखीळ नखाने कोचत राहणे यासारख्या सवयीमुळे चामखीळीतील स्त्राव शरीराच्या इतर ठिकाणीही लागण्याची शक्यता असते. त्यामुळे व्हायरसमुळे चामखीळ शरीराच्या इतर भागातही पसरत असतात. अशाप्रकारे शरीरावर चामखीळ येतात. यासाठी चामखीळ असल्यास त्यावर नखाने कोचत राहणे टाळावे.

तसेच चामखीळची लागण ही एकाकडून दुसऱ्याला होऊ शकते. यासाठी एकमेकांचेरेजर, अंतर्वस्त्रे, टॉवेल, कपडे, साबण, कंगवा इत्यादी वस्तू वापरणे टाळावे.

चामखीळचे प्रकार

चामखीळचे एकूण पाच प्रमुख प्रकार (types) असतात. प्रत्येक प्रकारचे चामखीळ शरीराच्या वेगवेगळ्या भागावर येत असतात तसेच त्यांचे स्वरूपही वेगवेगळे असते.

1) Common warts
2) Plantar warts
3) Flat warts
4) Filiform warts
5) Periungual warts

1) Common warts

ह्या प्रकारचे चामखीळ शरीरावर कोठेही होऊ शकतात त्यातही बोटांवर अधिक प्रमाणात येतात.

2) Plantar warts

ह्या प्रकारचे चामखीळ पायाच्या तळव्यात येतात. इतर चामखीळ त्वचेच्या वर येत असतात तर या प्रकारातील चामखीळ पायाच्या तळव्याच्या त्वचेच्या आत येत असतात.

3) Flat warts –

ह्या प्रकारचे चामखीळ चेहरा, हात आणि पायावर येतात.ह्या प्रकारचे चामखीळ नाक व तोंडाभोवती तसेच मानेवर आणि हनुवटीच्या खाली येतात.

5) Periungual warts –

ह्या प्रकारचे चामखीळ नखांच्या आत येतात. यामुळे नखांच्या वाढीवर परिणाम होऊन त्या ठिकाणी वेदना होत असतात. चामखीळ ज्या HPV व्हायरसमुळे येतात त्या HPV व्हायरसचे 100 हून अधिक प्रकार आहेत. हातापायावर येणारे चामखीळ हे फारसे धोकादायक नसतात. मात्र काही वेळा गुप्तांगावरही चामखीळ येऊ शकतात. त्याला genital warts असे म्हणतात. स्त्रियांमध्ये गुप्तांगावर येणाऱ्या चामखीळमुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग (cervical cancer) होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशावेळी दुर्लक्ष न करता स्त्रियांनी गुप्तांगावर चामखीळ असल्यास जवळच्या होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

होमिओपॅथिक उपचार

होमिओपॅथी मध्ये वारंवार चामखीळ येण्यावर आळा घातला जातो.

कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन, जालीम उपाय यांची गरज न पडता होमिओपॅथिक औषधांनी चामखीळ आपोआप गळून पडते.


डॉ समता गोर्हे
8657875568

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top