अतीढेकर दिवसरात्र ढेकर दिवसाकाठी 200/400 ढेकर का येतात?


ढेकर आणि आयुर्वेद
Belching

डॉ बाबासाहेब रेणुशे

नमस्कार मंडळी ….सध्या असे कित्येक त्रासदायक पोटाचे आजार आहेत किंवा एखादे लक्षण असे असते की ज्याचा प्रचंड त्रास होत असतोच… परंतु त्यावर उपचार म्हणून विशेष काहीच करता येत नाही.त्यापैकीच एक महत्त्वाचा त्रास म्हणजे अतीढेकर ज्याला Belching असे म्हणतात.

www.janvicharnews.com

पोटाच्या आजाराची प्रॅक्टिस करताना अशा अतिप्रमाणात ढेकर येण्याच्या त्रासाने वर्षानुवर्षे त्रासलेले कित्येक पेशंट येतात. ….अति प्रमाणात ढेकर येण्याचे प्रकारसुद्धा गमतीदार असतात.. काही लोकांना दिवसाकाठी दोनशे-तीनशे ढेकर येत असतात. काही लोकांना आंगावर कुठेही थोडा दाब पडला की लगेच एक मोठा ढेकर येतो ….काही लोकांचा ढेकर देण्याचा आवाज एवढा मोठा असतो की आजूबाजूच्या लोकांना दचकायला होते…. काही लोकांना उपाशीपोटी भरपूर ढेकर येतात तर काहींना जेवल्यानंतर…..! आणि कधी ढेकर अडकला की मग तो ढेकर मोकळा होईपर्यंत जीवाची तगमग होते

www.janvicharnews.com

…तर समजावून घेऊया ….. कशामुळे येतात अतिप्रमाणात ढेकर..? आणि ढेकर कमी करण्यासाठी काय असतात उपचार…!

साधारणपणे आपल्या पचन संस्थेच्या रचनेनुसार आपण अन्न तोंडामध्ये बारीक बारीक चावतो त्यानंतर ते अन्न अन्ननलिकेचे मधून खाली सरकत जाऊन जठराच्या पिशवी मध्ये पडते… जठराच्या पिशवीमध्ये अन्नाची चांगल्याप्रकारे घुसळण होते.जठरामध्ये अन्नावर ॲसिड व काही पाचक स्त्राव पडतात.. त्यामुळे जठरामध्ये अन्नाचा मऊसर असा गोळा तयार होतो. पुढे तो अन्नाचा गोळा लहान आतड्यामध्ये ढकलला जातो.लहान आतड्यामध्ये सुद्धा त्याच्यावर पाचक पित्ताचे स्त्राव पडतात आणि अन्नाचे पचन होते ही झाली अन्नपचनाची नैसर्गिक प्रक्रिया …..

परंतु मंडळी प्रत्येकाच्या खाण्यापिण्यातील चुका म्हणजे.. विशेषतः चिकट व मैद्याच्या पिठापासून तयार झालेले बेकरीचे पदार्थ.
साखर जास्त असणारे पदार्थ.. कोरडे अन्न म्हणजे डाळी व कडधान्यांच्या उसळी …दुधाचे पदार्थ ….गडबडीत पाणी पिणे …गडबडीत भरभर जेवणे …वरून पाणी पिणे ..त्याचबरोबर स्मोकिंग.. वारंवार चहा-कॉफी …

अशा चुकांमुळे पचनसंस्था मंदावते.. म्हणजे अन्न पचवणारे पाचक पित्त व पाचकस्त्राव मंद झाल्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे न पचलेले …अर्धवट पचलेले अन्न आतड्यामध्ये व जठराच्या पिशवीमध्ये तसेच पडून राहते व त्यामधून भरपूर प्रमाणात गॅसेस तयार होतात व त्या गॕसेस वरच्या दिशेने येऊन ढेकर यायला लागतात..

www.janvicharnews.com

बऱ्याच पेशंटमध्ये अन्नाचे अजीर्ण खूपच वाईट पद्धतीने होते न पचलेल्या अन्नाचा चोथा अक्षरशा नसल्यासारखा किंवा कुजल्यासारखा होतो.विशेषता कधी food poisoning म्हणजे खराब…शिळे…पुढे गेलेले अन्न खाल्ल्यामुळे तिव्र अजिर्ण होऊन करपट स्वरूपाचे ढेकर येतात.

बरेच लोक जेवताना अगदीच घाई गडबडीत जेवण करतात. शेजारी बसलेल्या व्यक्तीची जेवायला सुरुवात होईपर्यंत हा हात घेऊन उठलेला असतो… तर बरेच लोक पाणी पिताना सुद्धा तोंडाला पाण्याचा glass न लावता म्हणजे डायरेक्ट वरून पाण्याची धार धरतात परंतु अशा प्रकारे भरभर जेवल्यामुळे व वरून पाणी पिल्यामुळे अन्नाच्या घासाबरोबर व पाण्याच्या घोटाबरोबर जास्त प्रमाणात हवा सुद्धा पोटामध्ये जाते आणि त्यामुळे रिव्हर्स प्रेशर येऊन जास्त प्रमाणात ढेकर येतात.

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल ….की नॅचरली आपल्या मोठ्या आतड्यामध्ये बॅक्टेरिया म्हणजे जिवाणू असतात ज्यांचा अन्नपचनाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग असतो.आणि विविध प्रकारचे बॅक्टेरिया आपल्या आतड्यामध्ये असतात… परंतु पचनसंस्था बिघडल्यामुळे हे चांगले बॅक्टेरिया..good bacteria कमी होऊन वाईट बॅक्टेरिया bad bacteria जास्त प्रमाणात वाढतात .आणि ते bad बॅक्टेरिया आतड्यातून वरच्या दिशेने म्हणजे लहान आतड्यामध्ये सुद्धा वाढतात. त्यामुळे लहान आतड्यामध्ये भरपूर प्रमाणात गॕसेस तयार होऊन अतिप्रमाणात ढेकर येतात.

www.janvicharnews.com

आतीढेकर येण्यासाठी आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे आम्लपित्तामुळे किंवा bacterial infection मुळे जठराच्या पिशवीला सालपटल्यासारख्या जखमा म्हणजेच ulceration झाल्यामुळे ..किव्हा overeating मुळे जठराच्या पिशवीचा आकार वाढल्यामुळे सुद्धा … जठराच्या हालचालीमध्ये अडथळे येतात आणि त्यामुळे अतिप्रमाणात ढेकर येऊ शकतात .

अती ढेकर उपचार करताना …..

पोटाच्या आजारांमध्ये अतिप्रमाणात ढेकर येण्याच्या त्रासातुन कायमचे बरे होण्यासाठी… सर्वात आधी ढेकर कशामुळे येतात….? ही प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे आहे.म्हणजेच योग्य डायग्नोसिस …निदान होणे गरजेचे असते.
अतिढेकर या आजाराचे निदान करताना प्रामुख्याने खाण्यापिण्यातील काही चुका आहेत का..?आणि त्या असतील तर दुरुस्त करणे महत्त्वाचे आहे.विशेषता तहाने प्रमाणे व शिस्तीत.. तोंडाला glass लावून पाणी पिणे.जेवताना अन्न भरपूर चर्वण करून खाणे… आहार ताजा गरम पचायला हलका व आपल्या सवयीचा असावा. वेळेवर जेवावे.पुरेशी झोप घ्यावी अशा पद्धतीने आपले खाणे पिणे व्यवस्थित ठेवावे.

वैद्यकीय उपचार करताना …..तज्ञ डॉक्टरांकडून ढेकर जास्त येण्या पाठीमागे नेमके काय कारण आहे…? म्हणजे वैद्यकीय भाषेमध्ये पॅथॉलॉजी काय आहे… हे निदान केले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने पचन संस्था मंदावलेली आहे काय..? पेशंटला GERD किंवा हायपरऍसिडिटी म्हणजे आम्लपित्त हा आजार आहे…? की कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेचा त्रास आहे काय…?किंवा हीयाटस हर्निया आहे काय..? हे पाहून त्यानुसार तज्ञ वैद्यकीय उपचार केले असता अतिढेकर येण्याच्या त्रासातून रुग्ण नक्कीच बरा होऊ शकतो.

अतीढेकर आणि आयुर्वेद उपचार …. अती प्रमाणात ढेकर येतात आणि त्रास जुणाट असेल तर या त्रासाकडे मुळीच दुर्लक्ष करू नये. त्याचबरोबर कोणत्याही चुकीच्या ऐकीव माहीतीवर औषध घेत बसू नये . अती प्रमाणात ढेकर येण्याच्या त्रासापाठीमागे अनेक कारणे आसू शकतात.आयुर्वेदीय उपचार करताना या सर्व कारणांचा विचार करून आयुर्वेदीय औषधांच्या प्रयोगाने निश्चितपणे फायदा होतो.

🩺 डॉ बाबासाहेब रेणुशे
M.D – Medicine (Ayu)
7057394036.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top