आम्लपित्त म्हणजेच ऍसिडिटी होण्याची कारणे,लक्षणे आणि घरगुती उपचार

आम्लपित्त म्हणजे अॅसिडीटी , अॅसिडीटीचा

त्रास आपल्यापैकी अनेकांना होत असतो. या

त्रासात छातीत जळजळ होत असते. प्रामुख्याने

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे ही

समस्या होत असते.

आपल्या पोटामध्ये अन्नाच्या पचनासाठी

हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. त्याचे

प्रमाण वाढल्यास तसेच ते आम्ल पोटातून

अन्ननलिकेत आल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊ

लागतो.

अॅसिडीटीची लक्षणे –

एसिडीटीमुळे पोटात आग व जळजळ होणे,

छातीत जळजळ होणे,

• घशात जळजळणे,

• मळमळ किंवा उलटी होणे,

•तोंडात आंबट पाणी येणे,

• तोंडाची चव बदलणे,

•ढेकर येणे,

•पित्तामुळे डोके दुखणे,

• अपचन होणे,

•बद्धकोष्ठता समस्या होणे अशी प्रामुख लक्षणे

आम्लपित्तात असतात.

ऍसिडिटी होण्याची कारणे –

-अयोग्य आहार घेण्यामुळे म्हणजे जास्त तिखट,

मसालेदार, चमचमीत, आंबट पदार्थ खाण्यामुळे,

वारंवार चहा, कॉफी पिण्याची सवय,

वेळच्यावेळी जेवण न घेण्याची सवय,

-भूक लागलेली असताना आहार न घेणे,

-गॅसेस, अपचन, अल्सर, जठराचा दाह झाल्यामुळे,

-मानसिक ताणतणाव,

-अपुरी झोप, जागरण करणे,

-मद्यपान, धूम्रपान, तंबाखू अशा व्यसनांमुळे,

तसेच वेदनाशामक गोळ्या व औषधे,

-स्टिरॉईड्सची औषधे यांच्या अतिवापरामुळे

आम्लपित्ताच्या तक्रारी वाढतात.

आम्लपित्तावरील होमिओपॅथिक उपचार –

ऍसिडिटीचा त्रास असल्यास आपले होमिओपॅथिक डॉक्टर आपला संपूर्ण म्हणजेच शारीरिक, मानसिक विचार करून औषधे देत असतात. आम्लपित्त होण्याचे नेमके कारण शोधून त्यावर उपचार करतात..

आम्लपित्ताचा त्रास असल्यास काय खावे..?

वरचेवर ऍसिडिटी होत असल्यास आहारात तूप

घालून वरण भात खावा. तूप हे उत्तम पित्तनाशक

असल्याने त्याचा आम्लपित्तामध्ये खूप चांगला

उपयोग होतो.

दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.

ऍसिडिटीमध्ये केळी, डाळींब खाणे चांगले

उपाशीपोटी फार वेळ न राहू नये. जेवणाच्या

वेळा कटाक्षाने पाळाव्यात. कामाच्या व्यापात

जेवण करणे विसरू नका.

ऍसिडिटी झाल्यावर काय खाऊ नये..?

तेलकट, तिखट पदार्थ, मसालेदार पदार्थ, खारट

पदार्थ, लोणची, पापड, स्नॅक्स, चिप्स, फास्टफूड,

बटाटेवडा, भजी, मैद्याचे पदार्थ खाणे तसेच चहा,

कॉपी, कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे.

ऍसिडिटी झाल्यावर लिंबूपाणी पिऊ नका.

मद्यपान, तंबाखू व धुम्रपान पूर्णपणे बंद करावे.

वारंवार वेदनाशामक गोळ्या औषधे खाणे..

डॉ समता गोर्हे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top