
www.janvicharnews.com
होमिओपॅथीची औषधे ही रुग्णाची मानसिक स्थिती, त्याची जडणघडण, आवडनिवड, लक्षणे, लक्षणांची तीव्रता, बाहेरील परिस्थितीचा रुग्णावर होणारा परिणाम यांचा सखोल अभ्यास करून दिली जातात. रुग्णाची मानसिक व शारीरिक लक्षणे, त्याचे जीवनमान, रुग्णाचा व त्याच्या कुटुंबाचा इतिहास, प्रयोगशाळेत केल्या जाणाऱ्या तपासण्या या सर्वांचा विचार करून औषध योजना केली जाते.
होमिओपॅथीचे वेगळेपण हे की सगळ्यांचे आजार सारखे दिसत असले तरी औषध योजना प्रत्येकाच्या प्रतिकार शक्तीवर अवलंबून असते.
होमिओपॅथीची औषधे ही रुग्णाची प्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढवतात व रुग्ण पूर्ण बरा होतो.
डोके, नाक, कान, घसा, पोटाचे व छातीचे विकार
रुग्णाचा आजार कोणताही असो, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सर्व आजार कायमचे बरे होतात.
अर्धशिशी, डोकेदुखी, केस गळणे, केस अकाली पांढरे होणे, चाई, डोळे येणे, रांजणवडी, वरचेवर होणारी सर्दी, नाकाचे हाड वाढणे, नाकास वास कमी येणे, कान फुटणे, कमी ऐकावयास येणे, दातदुखी, हिरड्यातून पू व रक्त येणे, कोणत्याच पदार्थाची चव न लागणे, तोंड येणे, गिळताना त्रास होणे, मळमळ, उलटी, पोट दुखणे, अपचन, गॅसेस व पित्त वाढणे, छातीत जळजळ, वरचेवर होणारे जुलाब, बध्दकोष्ठ, रक्त व शेम पडणे, अजिबात भूक न लागणे (विशेषत: लहान मुले व वृध्द), वरचेवर येणारा खोकला, दमा यावर होमिओपॅथी रामबाण आहे.
सांधे व मणक्याचे आजार :
सांधेदुखीवर होमिओपॅथी हे वरदान आहे. सांधे दुखणे, सुजणे, मान, पाठ, कंबर दुखणे, आखडणे, चमकणे, मणक्याचे आजार, फ्रॅक्चर लवकर बरे न होणे, लागलेला मुका मार, हाडावरची जखम लवकर न भरणे, हातापायातून मुंग्या येणे. अवयव बधीर होणे, नखे व त्यांचे विकार, सांधे लचकणे, मुरगळणे , चमक भरणे, सायटिका, हातापायाच्या नसा दुखणे, पायाची टाच दुखणे, हाडास सूज येऊन दुखणे, हाड वाढणे इ. आजारावर होमिओपॅथी गुणकारी ठरते.
लहान मुलांचे आजार :
नुकत्याच सुरु झालेल्या आजारात तसेच जुन्या आजारात होमिओपॅथीची औषधे त्वरित काम करतात व रुग्ण पूर्ण बरा होतो.
लहान मुलांमध्ये वरचेवर होणारी सर्दी, खोकला, बालदमा, दात येताना होणारा त्रास, जंताचा त्रास, वजन न वाढणे, उशिरा बोलावयास व चालावयास लागणे, मंदबुध्दी, स्मरणशक्ती कमी होणे, नखे कुरतडणे, तोंडात बोटे घालणे, माती खाणे, अंथरुणात लघवी करणे, श्वास कोंडणे, फिटस् इ. होमिओपॅथीच्या औषधाने कायमचे जाते.
मानसिक विकार
मानसिक विकार पूर्ण बरे करणे होमिओपॅथीचा हातखंडा आहे.
स्मरणशक्ती कमी होणे, फिटस, आत्मविश्वासाचा अभाव, निरनिराळ्या गोष्टींची भीती वाटणे, जास्ती झोप येणे, अजिबात झोप न येणे, भयावह स्वप्ने पडणे, वेडाचे झटके येणे, लिहिताना हात थरथरणे. हातापायांतून वारे जाणे, वरचेवर येणारी चक्कर इ. स्त्री-पुरुष विकार, त्वचा विकार, मूत्रविकार-लघवीला सारखे जावे लागणे. लघवी पूर्ण झाली नाही असे वाटणे, थेंब थेंब होणे, लघवी करताना, पूर्वी व नंतर आग होेणे, मूत्रपिंड, मूत्राशय सुजणे इ. तसेच स्त्रियांच्या आजारात पाळीचा त्रास, अंगावर जास्त प्रमाणात जाणे, पाळी उशिरा येणे, पांढरे जाणे, बाळंतपणात उलट्या होणे, वयात येताना व पाळी थांबताना होणारा त्रास, ओटीपोटात दुखणे, स्तनात होणाऱ्या गाठी, इ. त्वचेच्या विकारात पांढरे डाग, हातापायाची त्वचा जाणे, सूरमा, इसब, गजकर्ण, सोरायसीस, पायाच्या भेगा, हातापायास जास्त घाम येणे, घामाची दुर्गंधी , चेहऱ्यावर येणारी मुरुमे, डोळ्याखाली काळे होणे, त्वचेची खाज, वरचेवर होणारी करटे, जखम बरी न होणे, केस गळणे, केसात कोंडा होणे, सर्व प्रकारची ऍलर्जी इ. सर्व विकारात होमिओपॅथीचा चांगला उपयोग होतो.
शस्त्रक्रिया टाळता येतात

www.janvicharnews.com
होमिओपॅथीने शस्त्रक्रिया टाळता येते.
निरनिराळ्या प्रकारच्या गाठी (ट्यूमर), कुरुपे, चामखीळ, टॉन्सिलचा त्रास, जठर व आतड्याचा व्रण, मूतखडा, पित्ताचा खडा, प्रोस्टेट वाढणे, अपेंडिक्सचा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, गुदद्वार बाहेर येणे, स्त्रियांमध्ये अंग बाहेर येणे इ.
होमिओपॅथीची औषधे घेणे हे सर्वात साधे व सरळ. या गोळ्या जिभेखाली ठेवून विरघळू द्यायच्या असतात. यापेक्षा दुसरे पथ्य काहीही नाही. गोळ्या वेळच्या वेळी घेणे गरजेचे. ही औषधे घेणे एकदम सोपे असते.
होमिओपॅथीचा सर्वात मोठा गुण म्हणजे कोणत्याही वेदना मग त्या दातदुखीच्या असोत वा शरीरातील कोणत्याही अवयवातील वा कॅन्सरसारख्या आजारातील असोत. नैसर्गिकरित्या वेदना थांबवणे होमिओपॅथीनेच शक्य होते.
होमिओपॅथीत फुले, वनस्पतींचा अर्क औषधांसाठी वापरला जातो. गेल्या काही वर्षात पुष्पौषधी ही नवी पॅथी सुरु झाली आहे. त्याचे मूळ होमिओपॅथीतच आहे. प्रारंभी होमिओपॅथीची औषधे फक्त साखरेच्या छोट्या गोळ्या, औषधाच्या अर्कात भिजवून दिली जात असत. आता मात्र या औषधी योजनेतही नवे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. विविध मलमे आणि औषधेही मिळतात.
होमिओपॅथीत रोगाचेनिदान हे भावनेवर केले जाते. नेमका कोणता आजार आहे, याचा शोध घेण्यासाठी डॉक्टर रुग्णांना विविध प्रश्न विचारतात. त्याद्वारे नेमक्या रोगाचे निदान केले जाते आणि त्याद्वारेच औषध योजनाही केली जाते. रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढवणारी ही औषधे म्हणजे काट्याने काटा काढणे, या प्रकारचीच आहेत. होमिओपॅथीचे मूळ तत्वच ते आहे. होमिओपॅथीच्या औषधांबरोबरच बाराक्षार औषधांचीही योजना केली जाते. त्याद्वारे शरीरातील कमी पडणाऱ्या क्षारांची उणीव भरुन काढली जाते. ज्या असाध्य आजारांना ऍलोपॅथीत इलाज नाही, अशा काही असाध्य आजारावर होमिओपॅथी मात्र अत्यंत गुणकारी ठरते. भारतात होमिओपॅथीचा प्रसार तुलनेने खूप उशिरा सुरु झाला. प्रारंभी काही वैज्ञानिक तज्ञांनी या पॅथीला विरोधही केला. पण, जगभर होमिओपॅथीच्या औषध योजनेचे यश आणि रोगनिदान लोकप्रिय झाल्याने, भारतातही होमिओपॅथी रुजली आणि वाढली. आता देशात होमिओपॅथीची अनेक महाविद्यालये सुरु आहेत. ग्रामीण भागापर्यंत होमिओपॅथीचे डॉक्टर्स रुग्णांवर उपचारही करतात. होमिओपॅथीची औषधे तुलनेने ऍलोपॅथीच्या औषधांपेक्षा कमी किंमतीची असतात. त्यामुळे गरीबांनाही हे उपचार घेणे सहज परवडते, हेही या पॅथीचे महत्व होय.
अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ समता गोर्हे
(होमिओपॅथिक कन्सल्टंट)
8657875568