औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरात श्रेयवादाचे राजकारण

घोषणेचा नामकरण सोहळा कधी पार पडणार www.janvicharnews.com

औरंगाबादचे संभाजीनगर हे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे मग नामांतराला स्थगिती का? ना समर्थन ना इच्छाशक्ती

राज्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन ठिकाणांची नावे बदलण्याच्या मागील उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे.

महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन ठिकाणांची नावे बदलण्याचा मागील उद्धव ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने तूर्तास स्थगित ठेवला आहे. शिंदे फडणवीस सरकार हा प्रस्ताव नव्याने मंत्रिमंडळासमोर ठेवणार आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला, त्या वेळी राज्यपालांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र लिहून या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात होते.

खुर्चीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने गेल्या महिन्यात एक मोठा निर्णय घेतला असून त्यात औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर’ असे करण्यात आले आहे. त्याचवेळी उस्मानाबाद शहराचे नाव बदलून ‘धाराशिव’ करण्यात आले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण दिवंगत दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात आले. त्याचवेळी औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.

नाव बदलावर प्रचंड राजकारण

उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जो शहर नामांतराचा धडाका लावला तो महाराष्ट्रात भाजपा शिवसेनेच्या सरकारला मागील पाच वर्षात करता आले असते परंतु या दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांनी कोणतीच पाऊले उचलली नाहीत. यांना निर्णय घेण्यास विरोध कोणाचा होता. घाईगडबडीत जाता जाता ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयावर शरद पवार म्हणाले की “या ठिकाणांचे नाव बदलणे महाविकास आघाडीच्या समान किमान कार्यक्रमाचा भाग नाही”. निर्णय घेतल्यानंतरच मला हे कळले, असे ते म्हणाले. कोणताही पूर्व सल्लामसलत न करता ही कारवाई करण्यात आली. या प्रस्तावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमच्या लोकांनी मते व्यक्त केली. पण निर्णय (तत्कालीन) मुख्यमंत्र्यांचा (ठाकरे) होता.” मागील पाच वर्षात भाजपा शिवसेना एकत्रित सत्तेत होती त्यावेळी का? असे नामकरण करण्यात आले नाही. दोन्ही पक्षाच्या हिदुत्वात कोणाचा अडसर होता कि राजकीय इच्छा शक्ती कमकुवत होती याची देखील चर्चा सर्वसामान्य लोकामध्ये होते आहे. ठाकरे सरकारने जाता जाता घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाला स्थगिती देऊन शिंदे-भाजपा सरकार काय सिद्ध करू पाहतेय? औरंगाबादचे संभाजीनगर हे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे मग नामांतराला स्थगिती का? लोकभावनेचे विषय वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवून राजकीय पोळी भाजण्याचे प्रयोग सातत्याने राजकीय पक्षाकडून होत असल्यामुळे कोण हिंदुत्ववादी आणि कोण धर्मनिरपेक्षवादी हे प्रश्न अनुउत्तरित राहतात…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top