डॉ बाबासाहेब रेणुशे

www.janvicharnews.com
🍞🍔🥞🥪 वडापाव म्हटलं की मुंबई हे चित्र आता बदललं आहे. देशभरातील प्रत्येक शहरात आणि गावागावात वडापाव, भुर्जीपाव किंवा आणखी काही पाव असलेले पदार्थ चवीने खाल्ले जातात. याची चव चांगली असली आणि याने भूक भागवली जात असली तरी पावाचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम बघायला मिळतात. हे दुष्परिणाम सुरुवातील जरी दिसले नाही तरी नंतर ते दिसू लागतात. पाव खाल्लाने कोणत्या समस्या होतात, हे खालीलप्रमाणे जाणून घेता येईल.

www.janvicharnews.com
🍔 रक्तातील शुगर वाढते – पावामधील रिफाईन्ड साखर मेटॅबॉलिझमच्या कार्यावर परिणाम करते. तसेच स्वादूपिंडातून अधिक इन्सुलिन शोषले जाते. त्यामुळे रक्तातील साखर एकाएकी वाढते.

www.janvicharnews.com
🍔 गॅसची समस्या – वडापाव किंवा यासारखे जंकफूडमध्ये लॅक्टोज अधिक असल्याने ब्लोटींगचा त्रास किंवा गॅसची समस्या होण्याचा धोका अधिक असतो. यामधील ग्ल्युटेन असल्याने ते पचायलाही जड असते. पावाचे पदार्थ खाल्ल्याने ते पचायला काही वेळेस तीन दिवसही लागू शकतात.

www.janvicharnews.com
🍔 वजन वाढतं – पावामध्ये अतिप्रमाणात साखर किंवा फ्रुक्टोज कॉर्न सिरप असतं. यामुळे कॅलरीज वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे नेहमी पावासओबत वडा, समोसा खाण्याची सवय तुम्हांला लठ्ठ बनवू शकते.

www.janvicharnews.com
🍔 पोषणद्रव्यांचा अभाव – पावामधून पोषणद्रव्य मिळण्याची शक्यता कमी असते. पावामधून फायबर, व्हिटॅमिन किंवा मिनरल्स मिळत नाहीत. अधिक हेल्दी बनवण्यासाठी वडापाव किंवा भुर्जीपाव घरीच तयार करा. पावाऐवजी गव्हाचा ब्रेड किंवा मल्टीग्रेन पावासोबत खा.
www.janvicharnews.com
🍔 अॅलर्जिक रिअॅक्शन वाढते – पाव बनवताना त्यामध्ये काही एन्झाईम्स मिसळली जातात. यामुळे पाव अधिक दिवस टिकतो तसेच तो मऊ राहतो. मात्र यामुळे अॅलर्जिक रिअॅक्शनचा धोका वाढतो.
🩺 डॉ बाबासाहेब रेणुशे
M.D – Medicine (Ayu)
7057394036.