
www.janvicharnews.com
सांगली | सांगलीत आर. आर. आबांच्या(R.R.Patil) जाण्याने राजकारणात मोठी निराशा निर्माण झाली होती. अशातच आता आबांचे पुत्र रोहित पाटील(Rohit R.R. Patil) राजकारणात सक्रिय झाल्याने आबांच्या कार्यकर्त्यांना मोठा आधार आला आहे. रोहित पाटील हे देखील आबांप्रमाणेच राजकारणात यशस्वी होत असल्याचं पहायला मिळत आहे. रोहित यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला(NCP) अजून एक दणदणीत विजय मिळवून दिला आहे.
www.janvicharnews.com
सांगली जिल्ह्यातील किरदवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी पार पाडली. त्यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या रोहित पाटील यांनी किरदवाडी ग्रामपंचायतीत एक हाती सत्ता मिळवली आहे. रोहित यांच्या पॅनलच्या सात पैकी सात उमेदवार निवडून आले आहेत. यापूर्वी कवठेमहांकाळ नगरपरिषदेतही रोहित पाटलांना दणदणीत विजय मिळाला होता.