टेनिस एल्बो आणि होमिओपॅथिक उपचार

www.janvicharnews.com

साधारणपणे बाहू किंवा मनगट यांच्या सततच्या कष्टप्रद हालचालीमुळे कोपरामधील स्नायूबंधांवर अती भार आल्याने उद्भवणारी नाजूक स्थिती म्हणजे टेनिस एल्बो. तांत्रिकदृष्टय़ा या दुखण्याला ‘लॅटरल एपिकॉन्डायलिटिस’ म्हणूनही ओळखले जाते. कोपराच्या सांध्याच्या अगदी वरच व बाहूच्या बाहेरच्या भागामध्ये सूज आल्याने ही स्थिती निर्माण होते. अशावेळी कोपर आणि कोपरापासून मनगटापर्यंतचा हात (फोरआर्म) या परिसरातही वेदना जाणवू शकतात.

हात आणि मनगटाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणारे कोपरापुढच्या हाताच्या भागातले स्नायू कशाप्रकारे वापरले जात आहेत, यावरून टेनिस एल्बो वाढीस लागण्याची कारणे बरेचदा शोधता येतात. बोटे ताठ करणे, मनगट वरच्या बाजूला दुमडणे आणि तळहाताची बाजू वर येईल, अशा पद्धतीने फोरआर्म दुमडणे अशा क्रियांसाठी हे स्नायू वापरले जातात. अचानक झालेल्या हालचालींचा परिणाम म्हणून तसेच लहान स्वरूपाचा भार सातत्याने पडत राहिल्यामुळे अखेर एखादा दोर वापरून वापरून झिजावा तशाप्रकारे कोपराच्या भागातील उतींना हानी पोहोचते. या उतींना पूर्ववत होण्यासाठी पुरेसा आराम आणि वेळ दिला गेला नाही, तर आधीच ताण सहन करणारे स्नायूबंध कायमचे कमकुवत होऊन जातात व हे दुखणे वेदनादायी असते. असे झाल्याने एखादी गोष्ट पकडण्याची आपली क्षमताही कमकुवत होऊन जाते.

बरेच जण दीर्घकाळापर्यंत अशा दुखण्याकडे दुर्लक्ष करतात आणि वैद्यकीय मदत घेण्यास विलंब करतात, कारण अनेकदा या दुखण्याची लक्षणे अतिशय सौम्य असतात व थोडीशी विश्रांती घेतली की, नाहीशीसुद्धा होतात. स्वत:हूनच जवळच्या दुकानांमध्ये मिळणारी वेदनाशामक औषधे घेतल्याने सुरुवातीच्या टप्प्यावर बरेही वाटते; त्यामुळे या दुखण्याचा दैनंदिन कामामध्ये अडथळा होऊ लागतो व वेदना असह्य होऊ लागतात तेव्हा कुठे डॉक्टरला दाखवण्याच्या पर्यायाचा विचार केला जातो.

प्रतिबंध

टेनिस एल्बोसाठी कारणीभूत ठरत असतील, अशी कामे ओळखा आणि त्यात सुधारणा करा, म्हणजे गंभीर दुखापतीचा धोका टळू शकेल. जोरदार हालचालींची गरज असलेली कामे करण्यासाठी वारंवार बोटे, मनगट आणि फोरआर्म यांचा सातत्याने अतिवापर करणे, शरीर अवघडलेल्या स्थितीत असणे आणि विश्रांतीचा अभाव या सुद्धा काळजीच्या बाबी आहेत. तुमच्या हातांच्या स्नायूंवर अति भार देणारी किंवा खूप ताण देणारी कामे टाळा. वेळीच लक्ष दिल्यामुळे गंभीर समस्या तयार होण्याची शक्यता कमी होते.

होमिओपॅथिक उपचार

आपल्याला अडचणीत आणू शकतील, अशी कामे ओळखा व टाळा.

शरीराची ढब व हालचालींत सुधारणा घडवून आणा.

सूज किंवा वेदना कमी करण्यासाठी आइस पॅक आणि होमिओपॅथिक डॉक्टरांनी दिलेली औषधे घ्या.

हलके स्ट्रेचेस, एक्सेंट्रिक आणि कॉनसेन्ट्रिक स्ट्रेन्ग्दनिंग अशा व्यायामपद्धती वापरा.

दुखणे बरे होण्याच्या प्रक्रियेला बळ देण्यासाठी, कोपराची उच्चतम कार्यक्षमता पूर्ववत व्हावी यासाठी व व्यक्तीला पुन्हा कामाला लागण्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी होमिओपॅथिक औषधांची मदत घ्या.

अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ समता गोर्हे
8657875568

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top