
निळूभाऊ फुले एक कठोर भूमिका करणारा हळवा कलाकार-
www.janvicharnews.com
“गोष्ट छोटी डोंगराएवढी” या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यानची घटना होती चित्रीकरण सुरु झाले. त्यात एका वृध्द कलावंताला डोंगरावर जावुन एक सिन चित्रित करून द्यायचा होता. परंतु प्रकृती अस्वस्थ आणि गुडघ्याच्या दुखण्यामुळे हा कलाकार डोंगर चढू शकत नव्हता त्यामुळे खुर्चीत बसून ह्या कलाकाराला डोंगरावर जायचे आणि मग प्रसंग चित्रित करावा असे टीमने ठरवले. परंतु ह्या गोष्टीची कुणकुण त्या कलाकाराला लागली. तसा हाडाचा कलावंत असणारा हा माणूस जागेवर उसळला. “डोंगरावरचा सिन चित्रित करायचा असेल तर मी डोंगर चढूनच जाईल, खुर्चीत बसून डोंगरावर जायचे आणि मग सिन द्यायचा हा माझ्या कलेचा अपमान आहे जो मला कधीच सहन होणार नाही” आणि ह्या माणसाने करुन चित्रीकरण पूर्ण केले. कुठलाही विचार न करता डोंगर चढायला सुरुवात केली आणि डोंगर सर ह्या निष्ठावान कलाकाराचे नाव होते-निळू फुले आपल्या कामावर आपली निष्ठा असली तर मनुष्य यशाचे विश्व उभारू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे “निळू फुले” तेच निळू फुले म्हणजे कुण्या अभिनेत्याचे किंवा नटाचे पुत्र नव्हेत! पुण्यातील खडकमाळ अलीबागात छोट्याशा घरात राहणारा भाजीवाला विक्रेत्याचा हा पोरगा होता. वडिलांना भाजीपाला विक्रीत मदत करत पुण्याच्या शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या निळूभाऊंनी राष्ट्रसेवा दलात प्रवेश घेतला आणि अल्पावधीतच राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकाची जबाबदारी खांद्यावर घेतली. कलापथकाच्या माध्यमातून निळूभाऊ मधला कलाकार वाढू लागला. कलापथकातले प्रत्येक काम निळूभाऊ मोठ्या निष्ठेने करायचे परंतु त्यातून त्यांना अर्थाजन होत नव्हते. घरची परिस्थिती तर बेताची होती. अशा अवस्थेत निळू फुलेंनी माळी कामाचा कोर्स पूर्ण केला आणि आर्म फोर्सेस मेडिकल महाविद्यालयात माळीकामाची नोकरी स्वीकारली. पण कलेवर प्रगाढ निष्ठा असणारा हा अवलिया फक्त नोकरीतच रमेलच कसा? नोकरीसोबतच निळूभाऊंनी नाटकामध्ये छोट्या मोठ्या भूमिका करायला सुरुवात केली. कलापथक,लोकनाट्य यातून तावून सुलाखून निघालेला हा कलाकार नाट्यसृष्टीत दाखल झाला आणि त्याच काळात एक अजरामर कलाकृती रंगभूमीवर आली. निळू फुलेंची भूमिका असणारे “सखाराम बाईंडर” नावाचे नाटक जगासमोर दाखल झाले.
ब्राम्हण ब्राम्हणेत्तर संघर्षावर घेतलेल्या ह्या नाटकाला रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने परवानगी नाकारली. नाटकाच्या टीमने हायकोर्टात दाद मागितली व हायकोर्टातून परवानगी मिळवत ह्या नाटकाचे प्रयोग सुरू झाले. आणि निळू फुले नावाचा कलाकार सगळ्याचे जगणे अनुभवला ह्या नाटकात निळूभाऊंनी दुसऱ्याला छळणाऱ्या, परपिडक, वासनी, चाळेबाज सखारामची भूमिका साकारलीय. निळूभाऊंनी वठवलेली ही भूमिका इतकी जिवंत होती की नाटक संपल्यावर ज्येष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू रगमचावर धावत आले आणि त्यांनी निळू फुलेंना वाकून नमस्कार केला. माळीकाम करणाऱ्या अभिनेत्याचा अभिनय निष्ठेला मिळालेली ती पावती होती. नाटकातल्या निळूभाऊंच्या अभिनयाचे कौतुक सर्वत्र होत होते. परंतु चित्रपटात मात्र कुणी काम देईना. त्याच काळात एक घटना घडली . कोल्हापूरच्या शालिनी स्टुडिओत अनंत माने दिग्दर्शित” एक गाव बारा भानगडी” नावाच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले.
चंद्रकांत जयश्री गडकर, दादा साळवी यासारखे दिग्गज कलाकार प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटाची पटकथा शंकर पाटील यांनी लिहलेली आणि पटकथेनुसार पाटील आणि झेलेअण्णा ही चित्रपटातील दोन प्रमुख पात्रे होती . चित्रपटातल्या एका प्रसंगात पाटील झेले अण्णांच्या थोबाडीत मारतो असा प्रसंग होता. परंतु चित्रीकरण सुरु होताच झेले अण्णांची भूमिका करणारे अभिनेते चंद्रकांत कडाडले “मी थोबाडीत मारुन घेणार नाही” तसे स्टुडिओवरचे सगळे वातावरणच बदलले. दिग्दर्शक अनंत मानेंनी चंद्रकांतला समजावून सांगितले की पाटील तुमच्या थोबाडीत नाही तर चित्रपटातील झेले अण्णांच्या थोबाडीत मारतोय, परंतु चंद्रकांत हट्टाला पेटले. कुणीही माघार घेईना त्यातच वादाची ठिणगी पडली आणि चंद्रकांतनी चित्रपटच सोडला. झेले अण्णांच्या अभावी सगळे शुटिंग खोळंबले. अनंत मानेंनी ह्या भूमिकेसाठी एका कसदार अभिनेत्याचा शोध सुरु केला आणि कुणीतरी निळू फुलेंचे नाव पुढे केले. तात्काळ निळूभाऊंना बोलावणे धाडण्यात आले. निरोपासरशी कॉलेजला रजा टाकून निळू फुले कोल्हापुरात दाखल झाले. चाचणी घेतली गेली आणि झेलेअण्णाच्या भूमिकेचे शिवधनुष्य निळू फुलेंच्या खांद्यावर सोपवण्यात आले . काही दिवसात चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या नायकाला सुध्दा मिळू शकत नाही इतकी प्रचंड लोकप्रियता झेलेअण्णा ह्या खलनायकी पात्राला मिळाली आणि पहिल्याच चित्रपटात निळू फुले नावाच्या वादळाने रुपेरी पडदा ताब्यात घेतला आणि झंझावाती प्रवासाला सुरुवात झाली. पाहता पाहता ह्या अभिनेत्याने चित्रपटांची साखळीच लावली. सोंगड्या, चोरीचा मामला, पिंजरा, थापाड्या, सामना, सिंहासन असे एकापाठोपाठ एक चित्रपट निळूभाऊंनी गाजवले. आणि मराठी चित्रपट सृष्टीचा सर्वात मोठा खलनायक म्हणून निळू फुले पुढे आले. निळू फुलेंनी गाठलेले यशाचे शिखर हे त्यांच्या कामावरील निष्ठेचे फळ होते. निळू फुलेंच्या काळात श्रीराम लागू, दादा कोंडके, चंद्रकांत सूर्यकांत यासारखे अनेक दिग्गज कलाकार होते. परंतु निळू फुलेंनी कुणाशीही स्पर्धा न करता स्वत:चे वेगळे अस्तित्व चित्रपटसृष्टीत निर्माण केले. इतरांशी स्पर्धा करून शक्ती निरर्थक घालवण्यापेक्षा स्वतःशीच स्पर्धा करून मिळवलेले यश टिकेलच शंका नाही. परंतु स्वतःशीच स्पर्धा करणारा माणूस सर्वोत्तमच होत जातो यात शंका नाही.
अभिनेता म्हणून श्रेष्ठ असणारे निळूभाऊ “माणूस” म्हणून देखील तितकेच श्रेष्ठ होते. आचाराने नास्तिक आणि विचाराने विज्ञानवादी असणारे निळू फुले पन्नास वर्षेचित्रपट सृष्टीसोबत सामाजिक कार्यात सुध्दा अग्रेसर राहिले. यशाच्या शिखरावर असताना सुध्दा ह्या माणसाने आपल्यातला कार्यकर्ता मरू दिला नाही. गरीब कलावंतांना शासकीय शेड्यातून घर मिळावे म्हणून मंत्रालयाच्या फेऱ्या मारणारा निळूभाऊसारखा व्यक्ती कोणी नसेल. त्यांच्या फेरीपाहून मुख्यमंत्र्यांनी एकदा निळू फुलेंच्या कुटुंबालाच सरकारी कोठ्यातून मुंबईत घर देण्याचे जाहीर केले. परंतु निळूभाऊसह सगळ्या कुटुंबाने एका सुरात सांगितले की, आम्हाला घर आहे. आम्हाला देण्याऐवजी एखाद्या गरजू कलावंताला ते घर द्या, एवढा उदात्तपणा आजच्या जमान्यात खूप महाग झालाय.
मराठी सोबतच ह्या माणसाने हिंदी चित्रपटामध्ये सुध्दा आपला ठसा उमटवला. हिंदीतील अमिताभ बचन दिलीपकुमार, अनुपम खेर, नसिरुद्दीन शहा यासोबत अनेक चित्रपटात काम करीत आपला दर्जा सिध्द केला. कूली मधल्या निळू फुलेंचा अभिनय अमिताभला तोडीस तोड होता तर मशाल चित्रपटात दिलीपकुमारचा निळूभाऊसाठी आग्रह होता. शेवटी स्वतः तले कर्तृत्वच माणसाला श्रेष्ठ ठरवते, हेच खरे! चित्रीकरणासाठी दौऱ्यावर असतांना लातूर आणि किल्लारीमधील विनाशकारी भूकंपाची बातमी निळूभाऊंच्या कानावर पडली. सगळ्या गोष्टी तशाच सोडून हा माणूस लागोलाग किल्लारीमध्ये भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी दाखल झाला. उदध्वस्त झालेली गावे, कोसळलेली घरे ढासळलेल्या भिंती, धाय मोकलून रडणारी माणसे आणि ज्यांचे अश्रू पुसणारे निळू फुले हे दृष्य ह्याच महाराष्ट्राने पाहिलंय. पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट हा माणुस पावसापाण्यात उभा राहून स्वतः करत होता. वर्तमानपत्रात चमकण्यासाठी हे काम नव्हते किंवा प्रसिध्दीचे तंत्र सुध्दा नव्हते. तो माणुसकीचा मंत्र होता आणि यशस्वी झालेल्या प्रत्येकाने आपले पाय मातीतच असू द्यावेत, असाचत्याचा मतितार्थ असावा. माळीकाम करणारा माणूस स्वकर्तृत्वाने निष्ठेच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टीत सम्राट होतो. अन देखील त्यांच्या चेहऱ्यावर सर्वच म्हटले पाहिजे. सामान्य इतका सुध्दा अहंकार नसेल तर ह्या माणसाला फक्त ” बाप माणूस “च म्हंटले पाहिजे.