
www.janvicharnews.com
पाठदुखी कंबरदुखी याची कारणे आणि होमिओपॅथिक उपचार
पाठदुखी व कंबरदुखीचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो, दुखण्याची तीव्रता कमी अधिक असली तरी पाठदुखी सर्वांना माहिती असते. पाठदुखी हा बिघाड क्वचित गंभीर स्वरूपाचाही असू शकतो. पाठदुखी म्हणजे खालच्या बाजूला पाठ दुखणे, पाठीवर ताण येणे किंवा पाठीला अस्वस्थ वाटणे होय. पाठदुखीमधे पाठीचा कणा किंवा स्नायू दुखावतात. पाठीच्या कण्याजवळ जे मोठे स्नायू असतात ज्याचा पाठीच्या कण्याला आधार असतो ते दुखावल्यामुळे किंवा त्यावर ताण आल्याने पाठदुखी होते. आम्ही तुमच्यासाठी पाठदुखीवर काही खास टिप्स आणल्या आहेत.
पाठदुखीची कारणे –
ताणामुळे आलेली पाठदुखी ही एकाच जागी, एकाच पोझ मध्ये खूप वेळ बसल्यामुळे किंवा ताण आल्यामुळे येते. अनेकांना नोकरीच्या ठिकाणी खुर्चीत दिवसभर बसावे लागते. पाठीवरच्या ताणामुळे माणसाचा मानसिक ताण सुद्धा वाढण्याची शक्यता असते. (हे पण वाचा: केळी खाल्ल्यानंतर ती झाली प्रेग्नेंट)
पाठीच्या हाडांमधली ताकद कमी झाली तरी पाठ दुखू शकते. इतर हाडे ठिसूळ होतात त्याप्रमाणे मणके ठिसूळ होऊ लागले तरी पाठ दुखू शकते, कण्याला आधार देणारे स्नायू जखडू लागले तरी पाठदुखी सुरू होऊ शकते.
वाढत्या वयानुसारही पाठ-कंबरदुखी सुरू होऊ शकते. आघात, अपघात, ताठ न बसण्याची सवय, बैठ्या स्वरूपाचे कामकाज, व्यायामाचा अभाव, संगणकावर रोज दहा-दहा तास काम हीसुद्धा पाठदुखीची कारणं आहेत.
प्रतिबंधात्मक उपाय
- वस्तू उचलताना गुडघ्यात वाका, पाठ सरळ ठेवा व वस्तू शरीराजवळून उचला.
- एकाच स्थितीत बराच वेळ बसू नका. नियमित वेळाने बसण्याची स्थिती बदला, पाठ सरळ करा किंवा फिरून या.
- टेबलावर कोपर ९० अंशांमध्ये टेकतील, अशा प्रकारे खुर्चीची उंची ठेवा.
- गाडी चालवताना पाठीला आधार मिळेल याप्रकारे सीट ठेवा,
- झोपताना पाठीला आधार मिळेल अशा टणक पृष्ठभागावर झोपा.
- आखडलेल्या स्थितीत झोपू नका. कुशीवर झोपताना कंबरेला आधार मिळेल, अशा पद्धतीने पातळ उशीचा उपयोग करा.
- पाठदुखी असेल तर उंच टाचांच्या चपला टाळा.
होमिओपॅथिक उपचार
होमिओपॅथी मध्ये सगळ्यात पहिले नेमके कारण शोधले जाते..
प्रत्येक व्यक्तीमध्ये आजारांची येणारी लक्षणे ही वेगवेगळी असू शकतात..
प्रत्येक व्यक्तीची sensitivity वेगळी असते त्यामुळे त्याची reaction ही वेगवेगळी येते..
Individualy हा व्यक्ती आजाराला कसे सामोरे जात आहे याचाही विचार केला जातो..
Patient चे वय , त्याची मानसिक अवस्था , तसेच वर सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार होमिओपॅथिक औषधे देताना केला जातो..
होमिओपॅथिक औषधे मुळावरच घाला घालतात त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार औषधे घेतलीत तर तुम्ही पूर्णपणे बरा होऊ शकता
होमिओपॅथी मध्ये निश्चित कारण शोधून त्यावर उपचार केला जातो व तो तात्पुरता उपाय नसून कायम स्वरुपी असतो .
अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ समता गोर्हे
8657875568