पीसीओडी लक्षणे कारणे आणि होमिओपॅथिक उपचार

पीसीओडी म्हणजे काय ?

www.janvicharnews.com

स्त्री बीजकोषातील अनेक गाठी तयार होणे याला पीसीओडी (PCOD),असे म्हणतात. आंतर्स्रावी ग्रंथीच्या कार्यपद्धती मध्ये आलेल्या अनियमितपणामुळे व त्या ग्रंथीपासून निघणा-या स्रावामध्ये झालेला चढ-उतार या गाठी निर्माण होण्यास कारणीभूत असतात. आजच्या आधुनिक युगात स्त्रियांमध्ये ही समस्या फार झपाट्याने वाढत आहे. या आजाराच्या 10 – 15 % स्त्रियांना वंध्यत्वासारख्या समस्येला सामोरे जावे लागते.

पीसीओडी लक्षणे

1) शरीरावर, चेह-यावर अति प्रमाणात येणारे केस.

2) लठ्ठपणा वजनात अति प्रमाणात होणारी वाढ.

3) चेह-यावर पुळ्या येणे.

4) वंध्यत्व येणे.

5) मासिक पाळी अनियमित येणे, पाळीमधील रक्तस्राव खूप कमी होणे, मुलगी वयात येऊन देखील मासिक पाळी सुरू न होणे.

६) कामेच्छा कमी होणे.

७) स्त्री बीजकोषाचा आकार वाढणे, त्यात गाठी निर्माण होणे.

या आजाराचे झालेल्या अभ्यासात काही निकष समोर येत आहेत. हा आजार आनुवंशिकपणे आईकडून मुलीला येऊ शकतो. जर आईने आपल्या मुलीच्या जन्मापूर्वी गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या असतील तर त्याचा दुष्परिणाम पुढच्या पिढीतील येणा-या मुलीवर होऊ शकतो.

अनेक महिने स्त्री बीजकोषातील अंडी जर फुटली नाही तर त्यापासून अशा गाठी तयार होतात. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे या गाठी होण्याचे प्रमाण जास्त असते. या गोळ्या स्त्री बीजकोषातील अंडी फुटण्याची प्रक्रिया बंद करून आणि मग गर्भधारणेस प्रतिबंध करते. जर ही प्रक्रिया अनेक महिने बंद राहिली तर त्याचा दुष्परिणाम म्हणून त्या गाठी तयार होतात. हार्मोन्समध्ये झालेला चढ-उतार हे या समस्येचे एक मुख्य कारण आहे. आणि या चढ-उतरामुळे अंडी फुटणे बंद होते त्यामुळे वंध्यत्वाच्या समस्या उभ्या राहतात.मुख्यतो इस्ट्रोजन नावाच्या अंतर्स्रावी ग्रंथीपासून निघणारा स्राव या गाठी होण्यास कारणीभूत आहे. लठ्ठपणा, आपल्या शरीरातील इन्सुलिन या स्रावाला शरीरात निर्माण झालेला प्रतिकार या चुकीच्या घडामोडीमुळे हा आजार होऊ शकतो. अशा अवस्थेमध्ये आपले शरीर जास्त इन्सुलिन तयार करते अशा अति इन्सुलिनच्या स्रावामुळे त्याला विरोध म्हणून आपले शरीर अ‍ॅँड्रोजेन आणि टेस्टोस्टेरोन नावाचे स्राव वाढवतात हे स्राव वाढले तर त्याचा परिणाम स्त्री बीजकोषातील अंडी फुटण्यावर होतो ती अंडी न फुटता तशीच ती पुढच्या अवस्थेत जाते आणि त्यात गाठी तयार होतात. मूलत: हा आजार हार्मोन्सशी संबंधित असून याच्या उपचारामध्ये बरेच फायदे तोटे आहेत. याचा उपचार योग्य होमिओपॅथिक पद्धतीनेच होणे आवश्यक आहे.

होमिओपॅथिक उपचार

आधुनिक उपचार पद्धतीमध्ये काही डॉक्टर हार्मोन्सच्या गोळ्या देतात, पण या गोळ्याचे दुष्परिणाम होण्याचे प्रमाण अधिक असते, कारण एक हार्मोनचे प्रमाण वाढले तर ते दुस-यावर त्याचा दुष्परिणाम करत असते. त्यामुळे या हार्मोन्सच्या गोळ्या बाहेरून घेण्यापेक्षा ते हार्मोन्स आपल्या शरीरानेच तयार केले तर तेच उत्तम आहे. आपले शरीर आपल्याला हवे तेवढेच हार्मोन्स तयार करते फक्त त्या प्रक्रियेमध्ये झालेली बिघाड योग्य उपचाराने ठीक करणे आवश्यक आहे.

दुसरे म्हणजे दुर्बिर्णीच्या साह्याने या गाठी फोडणे. ह्या गाठी फोडण्याची उपचार पद्धती ही आजाराच्या मूळ कारणाच्या व्यतिरिक केली जाते. कारण, या गाठी फोडल्याने हार्मोन्समध्ये झालेला चढ-उतार स्थिर होत नाही. त्यामुळे यापासून फायदा होण्याची शक्यता कमी असते उलट त्या गाठी पुन्हा होऊ शकतात.

होमिओपॅथिक उपचाराने या समस्येवर अनेक रुग्णांनी मात केली आहे. या उपचार पद्धतीमध्ये रुग्णांची पूर्ण माहिती घेऊन योग्य औषध निवडले जाते. होमिओपॅथिक तज्ज्ञाने निवडलेले औषध अंतर्स्रावी ग्रंथीवर कार्य करते. हार्मोन्समध्ये झालेल्या चढ-उतारामध्ये प्रथम सुधारणा करते. हार्मोन्स स्थिर प्रमाणात आल्यानंतर स्त्री बीजकोषातील अंडी फुटण्याची प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू होते आणि कालांतराने त्यात असणा-या गाठी पूर्णपणे नाहीशा होतात आणि लवकरच गर्भधारणा राहते. होमिओपॅथिक औषधाने हे आता सिद्ध झाले आहे आणि त्याचा अनेकाने लाभ घेतला आहे. ब-याच रुग्णांनी स्त्री बीजकोषातील गाठी फोडल्यानंतरही त्यांना फायदा झाला नाही अशा रुग्णांनाही होमिओपॅथिक उपचाराने गर्भधारणा झाल्याचे सिद्ध झाले आहे.

इतर उपचार पद्धतीच्या तुलनेत होमिओपॅथी ही उपचार पद्धती कमी खर्चीक असून जास्त लाभदायक आहे.

होमिओपॅथी ही नैसर्गिक तत्त्वावर आधारित उपचार पद्धती असल्यामुळे याचे इतर पद्धतीप्रमाणे दुष्परिणाम होत नाही.

होमिओपॅथी ही दुष्परिणाम नसलेली, कमी खर्चीक पद्धती स्त्री बीजकोषातील गाठी फोडल्यानंतरही फायदा झाला नाही अशा रुग्णांनाही होमिओपॅथिक उपचाराने गर्भधारणा झाल्याचे सिद्ध झाले आहे.

तुलनेत होमिओपॅथी ही उपचार पद्धती कमी खर्चीक असून जास्त लाभदायक आहे. नैसर्गिक तत्त्वावर आधारित उपचार पद्धती असल्यामुळे याचे इतर पद्धतीप्रमाणे दुष्परिणाम होत नाही.

डॉ समता गोर्हे

8657875568

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top