भूकंप कसला करता एकनाथ शिंदे भाजपाने आपली अवस्था ना घर का? ना घाट का? केली…

दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार

माझ्या आजवरच्या 42 वर्षांच्या पत्रकारितेतील अतिशय ज्वालाग्राही व जळजळीत लेख !

भूकंप कसला करतोस पादल्याची दुर्गंधी सुटेल व लोक अधिक तिरस्कार करतील !भाजपाने एकनाथ शिंदे यांची अवस्था ना घरका ना घाटका !अशी करून टाकली आहे.

www.janvicharnews.com


शिवसेनेत स्वाभिमानाचं पद व स्वातंत्र्य असताना केवळ मुख्यमंत्री पदाच्या लालसेने भाजपाच्या गोठ्यात गुलामीचे जोखड बांधुन घेतलेला एकनाथ ( गद्दारांबद्वल सन्मानाने बोलण्याची परंपरा नाही.आठवा – ना-या,कोंबडी चोर, लखोजी लोखंडे, सूर्याजी पिसाळ, अनाजी पंत, इत्यादी) लाचारीचा पट्टा बांधून बोलवणे येईल‌ तेव्हा असेल त्या अवस्थेत दिल्लीला धाव घेत आहे, तासनतास ताटकळत ठेवत रात्री अपरात्री औटघटकेची भेट मिळताच तृप्तीचे ढेकर देऊन महाराष्ट्रात स्वाभिमान,निष्ठा,दिघेसाहेब,बाळासाहेबांवरील निष्ठेवर नक्राश्रू ढाळत बसतात.असा हा लाचार श्रीमणी मुलाखत देऊन म्हणे भूकंप घडवणार ? याला लघु शंकेला जाण्यासाठीही अमित शहा, देवेंद्र फडणवीसची परवानगी लागत असावी,असा माणूस भूकंप तर सोडा स्वतः चा गँसही सोडू शकत नाही; तो माणूस पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना आनंद दिघेंच्या मृत्यूबद्दल गौप्यस्फोट करण्याची फुसकी धमकी देत आहे, हे किती हास्यास्पद आहे.रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्या देखील इतका केविलवाणा विनोद करणार नाहीत.

आनंद दिघेच्या मृत्यूचे गुढ उकलण्यापूर्वी आधी तुमचा पक्ष कोणता,तुमची निशाणी कोणती,तुमचे विद्यमान आदर्श व बोलविते धनी कोण ? याचे गुढ उकला.सहा सहा वेळा दिल्लीश्वराचे दर्शन घेतले त्यातून काय निष्पन्न झाले,त्या भेटी वांझोट्या का राहिल्या ? त्याची माहिती महाराष्ट्राला द्या.मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन एक नाथी मंत्री मंडळाला कॅबिनेट म्हणवता ? त्या मंत्री मंडळाचा विस्तार का होऊ शकला नाही,40+10 आमदारांचे भवितव्य टांगणीला लावून तुम्ही दिल्ली वा-या करून स्वतः चे मनोरंजन करून घेत असता. आधी तुमच्या भूलथापांवर विश्वास ठेऊन ज्यांनी आपले राजकीय भवितव्य पणाला लावले त्यांचा विचार करा.

www.janvicharnews.com

भाजपा हा कपटी व धोकेबाज पक्ष आहे म्हणून पाच वर्षापुर्वी जाहिर सभेत राजिनामा नाट्य करणारे तुम्ही आता भाजपा चे भक्त झालात,अस्मिता गहाण ठेवत मोदी,शहा या महाराष्ट्र द्वेष्ट्यांचे “चरणदास” का झालात ? याचे गुढ सर्वांना ठाऊक आहे,ते एकदा सांगा. अरविंद वाळेकर, यांचे काढलेले पोलीस संरक्षण, शिवसेनेच्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर दहशत माजविण्यासाठी केलेली तोडक कारवाई, एमआरटीपीचे गुन्हे नोंदविण्याच्या धमक्या देऊन बदलापुर च्या वामन म्हात्रे सारख्यांना स्वतः च्या गोटात सामिल करून घेता ? डोंबिवलीच्या शाखाप्रमुख, पदाधिका-यांवर चोरीचा गुन्हा नोंदवता ? सत्तेसाठी इतका अत्याचार ? कुठे फेडाल हे पाप ?? आजवर राज ठाकरे,छगन भुजबळ, नारायण राणे,गणेश नाईक शिवसेनेतून फुटले परंतू इतका अतिरेक कधीच केला नाही. इतके करून काय मिळवले ? स्वाभिमानाने जगू शकत नाही,दिल्लीश्वराच्या मर्जीखेरीज तुमचे पानही हालत नाही, बोलवणे आले की दौरा सोडून रात्री अपरात्री ढुंगणाला पाय लावून पळत जावे लागते दिल्लीला !

शिवसेनेशी इतके प्रामाणिक राहिला असतात तर ही वेळ आली नसती.उद्धवजी तर शेवटी शेवटी आपले मुख्यमंत्री पद द्यायला तयार झाले होते.पण तुम्हाला भाजपाच्या दावणीला सर्वांना बांधुन घेण्याची इच्छा होती.

एकनाथ शिंदे, भाजपा तुमच्याशी उंदीर-मांजराचा खेळ खेळत आहे. शिवसेना संपवण्यासाठी तुमचा शिडी म्हणून वापर केला आता तुम्हाला संपवण्याची जय्यत तयारी झाली आहे.आधी बाहेरून पाठींबा देणारा भाजपा सत्तेतील सहभाग मागत आहे.भाजपा बाहेरून पाठींबा देईल मग सर्व मंत्रीपद आपल्या अंधभक्त आमदारांना मिळतील, असे तुम्ही चाॅकलेट तुम्ही सर्वांना दिले. 50 पैकी 45 आमदार मंत्री, राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री, होणार, इतरांना मंत्रीपदाची लाँटरी लागणार मग अडीच वर्षे राज्य करू,इडीची पिडा गेली व मलईदार खाती व पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यावर दे दणादण लूटमार करून गद्दारीतून गब्बरात्वाकडे वाटचाल करू,मग काय पंचवीस वर्षे आपलेच राज्य असे शेखचिल्ली सारखे स्वप्न रंजन करू लागलात.

भाजपाने तुमच्या या स्वप्नांचा फुगा फोडला.मी नाही त्यातला- म्हणत देवेंद्र उपमुख्यमंत्री झाले तेंव्हा तरी धोक्याची चाहूल ओळखायला हवी होती.त्यांचे माईक ओढून घेणे, तुम्ही बोलत असताना सर्वांच्या लक्षात येईल अले चिठ्ठी सरकवणे, शाल ओढाओढी, यातून तुमचे पद्धतशीर खच्चीकरण व अवमुल्यन होत होते, पण तुम्ही गुलामीचा पट्टा व मुख्यमंत्री पदाची झुल पांघरलेले लाचार झालेले गुलाम होतात. आत्ता भाजपाचे नेते व तुमचे दिल्लीश्वर तुम्हाला मंत्रीमंडळ विस्तारावरून झुलवत ठेवत आहेत.100 टक्के मंत्री पदाला सुरूंग लावत भाजपाश्रेष्ठी व तुमच्या आलाकमानने तुमच्या आकांक्षांत पाचर मारले आहे.आत्ता तुमची अवस्था मुळव्याध झालेल्या रूग्णासारखी झाली आहे, सहन तर होत नाही व सांगताही येत नाही, आणि जखम उघडुन दाखवली तर अब्रूचं खोबरं.ही रक्ती मुळव्याध आहे. एकनाथ एकटा पडला व अनाथ झाला,हे जसे पोपट मेला आहे , हे राजाला कोणी सांगावे,तसेच आपल्या या मुळव्याधीचे झाले आहे.

www.janvicharnews.com

या मुळ व्याधी वरून लक्ष विचलित करण्यासाठी आत्ता आनंद दिघे यांच्या मृत्युचे गुढ उकलून भूकंप घडविण्याचा भंपक इशारा तुम्ही देत आहात. आनंद दिघे यांच्या मृत्यू बद्दल संशय निर्माण करण्याचा प्रथम प्रयत्न गगनभेदी थापा सम्राट अनिल थत्तेने केला होता.आत्ता आपण त्याची रि ओढून फुसका बाँम्ब फोडण्याची वल्गना करीत आहात. धर्मवीर या चित्रपट निर्मितीमागे तुमच्या गद्दीरीची बीजं रोवली गेली होती, तुमचे ब्रांडिंग करण्यासाठी दिघे साहेबांची लोकप्रियता तुम्ही कॅश करण्याचा प्रयत्न केला. त्यात गुरूपौर्णिमाचा सीन घुसडला, आनंद आश्रमाचे विकृत चित्रण करून मीच कसा दिघे साहेबांचा खास ! हे दाखवण्याचा प्रयत्न केला.मी 1973 पासून शिवसैनिक म्हणून दिघे साहेबांच्या संपर्कात होतो.त्यावेळी तुम्ही शाळकरी होतात.तुम्ही कधी धोबी आळीतील दिघे साहेबांचे चाळीतील घर पाहिले होते का ? मी 1992 व 95 ला नगरसेवक व विरोधी पक्ष नेता होतो,त्यावेळी तुम्ही दिघे साहेबांच्या आश्रमातील सांगकामे होतात,सिगरेट आणून दे,आल्या गेलेल्यांचे आगत स्वागत कर हे तुमचे स्थान होते.आणि म्हणे मी दिघे साहेबांचा खास आणि त्यांच्या जीवनाची सर्व माहिती आहे.तुमच्या सारखे अनेक दरबारी सेवक आज आमदार खासदार झाले आणि तुमच्या नादी लागून गद्दार झाले.तुम्ही आनंद आश्रमचे अस्तित्व मिटवून स्वतः चे मुख्यालय बनवू पाहत आहात,”आनंद आश्रम” हा डौलाने झळकणारा फलक उतरवला, बाहेरच्या भिंतीवर “शिष्य पौर्णिमेचा” तुम्हीच लावलेला बोर्ड उखडून टाकला व हे दुष्कृत्य नजरेस पडू नये म्हणून आपल्या होर्डींगने ते झाकले ?हीच का तुमची दिघे निष्ठा ?

www.janvicharnews.com

आपण त्या चित्रपटात दिघे साहेबांचे पार्थिव स्वतःच्या खांद्यावर घेऊन खाली आलात हे दृश्य किती बनावट व नाटकी आहे.त्यावेळी तुम्ही तिथे होतात व त्यांचे पार्थिव खांद्यावर उचलून आणले हे आपण आपल्या दोन दिवंगत मुलांची शपथ घेऊन सांगा,मी तुमचा गुलाम होईन.अरे किती हा खोटारडेपणा व लुच्चेगिरी ?

आनंद दिघे साहेबांचा मृत्यू हा पायाला अपघात झाल्याने नव्हे तर घातपाताने झाला,हे सांगून तुम्हाला भुकंप करायचा असेल तर तो तुमचा भ्रम आहे,
पादल्याने भूकंप होत नसतो. निलेश राणे यांनी देखील असाच आरोप मातोश्रीवर केला होता परंतू त्यांचे पिताजी नारायण राणे, जे दिघे साहेबांच्या अंतिम दिवशी उपस्थित होते,त्यांनी निलेश चे म्हणणे चुकीचे आहे,हे निक्षुन सांगितले होते,हे आपले सहयोगी नारायण राणेंना विचारून खात्री करून घ्या ! मग तोंडाची वाफ वाया घालवा.

तुमचा मुलगा आँर्थोपेडिक सर्जन आहे,त्याचा खाजगीत सल्ला घ्या. पायाला फ्रॅक्चर जरी झाले तरी त्यासाठी जी शस्त्रक्रिया करावी लागते,
त्यासाठी ह्रदय सक्षम असावे लागते,त्यासाठी द्यावा लागणारा अनेस्थेशीया (भूलीचे इंजेक्शन) पचविण्यासाठी ह्रदय सक्षम लागते. आपणांस ठाऊक नसेल तर ज्ञानात भर घालतो, एन्जियोग्रफि व बायपास शस्त्रक्रियेच्या वेळी आॅपरेशन टेबलवर मृत्यू मुखी पडणा-या रूग्णांची संख्या मोठी आहे. धर्मवीर आनंद दिघे हे चेनस्मोकर होते,हे तुम्हाला ठाऊक नसण्याचे कारण नव्हते, कारण तुम्हीपण त्यांना सिगारेटीतची पॅकेटस् आणून देत, कधी कधी शिलगाऊनही देत होतात. अतिधुम्रपान, अविश्रांत काम,ताण तणाव व अनियमित जेवण यामुळे त्यांचे ह्रदय कमकुवत झाले होते व ते 40 %च कार्यरत होते.अशा परिस्थितीत त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना ह्रदयविकाराचे तीव्र झटके आल्याने त्यांचे अकस्मात निधन झाले.ही वस्तुस्थिती माझ्या सारख्या असंख्य शिवसैनिकांना ठाऊक आहे. त्यांचे मातोश्रीशी बिनसले होते किंवा मातोश्रीतून त्यांच्यावर नाराजी होती हे जरी सत्य असले तरी त्यांचा घातपात करून बळी घेण्याइतकी नीच प्रवृत्ती कधीच नव्हती. हे जे किडे वळवळत आहेत ते बुद्धी भेद करून मातोश्रीला बदनाम करण्यासाठीच आहेत.हाच एकनाथ, दिघे निष्ठ म्हणवतो, मग चार वेळा आमदार,एकदा विरोधी पक्ष नेता, दोनदा कॅबिनेट मंत्रीपद पालक मंत्रीपद,पोरगा दोनदा खासदार झाला तेंव्हा का मिठाच्या गुळण्या करून तोंड बंद ठेवले होते ? आत्ता भाजपाच्या दरबारात हुजरेगिरी करताना निष्ठेची बांग देण्यासाठी हे उपद्व्याप करीत आहे महाराष्ट्राची जनता दुधखिळी वाटली कारे ? तुझ्या भूलथापांवर विश्वास ठेवायला ? तुझी विश्वासार्हता त्याच दिवशी दफन केली जेंव्हा तू केसाने गळा कापलास ?तुझ्या वायफळ बडबडीने भूकंप तर होणार नाहीच पण तुझ्या पादण्याने जी दुर्गंधी सुटेल त्यामुळे तुला कोणी जवळपास फिरकूही देणार नाही. गप्प गुमान भाजपाची चाकरी कर व अमित शहा,जी उरले सुरलेली हाडं टाकेल ती चघळत भाजपा निष्ठेची बांग देत बस ! दिल्या घरी अपमानीत जीणं जगण्यात धन्यता मान.मातोश्रीरूपी सूर्यावर थुंकशील तर तुझ्याच तोंडावर थुंकी उडेल,तूर्त इतकेच पुरे आहे !

टिप : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक गद्दार असल्याने एकेरी उल्लेख केला आहे.अंधभक्तांनी याची नोंद घ्यावी.

दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार

9822902470

अस्वीकरण-सदरील लेखात पत्रकाराची व्यक्तिगत मते आहेत त्यामुळे JANVICHARNEWS.COM कडे कोणतीही जबाबदारी नाही

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top