मराठी माणसाच्या सोनाच्या खाणी – चिंतामणी ज्वेलर्सचे नितीनभाऊ कदम

मराठी माणसाच्या सोनाच्या खाणी – चिंतामणी ज्वेलर्सचे नितीनभाऊ कदम

प्रा डॉ सतिश कदम..

 

तुळजापूरचे भोपे पुजारी भाऊसाहेब कदम हे बडोद्याच्या गायकवाड घराण्याचे पुजारी ! प्रत्यक्षात रोजची पुजा करण्यासाठी म्हणून श्रीमंत तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या पत्नी चिमनाबाई यांनी भाऊसाहेबांना बडोद्याला नेले. बडोद्यात मराठी शिक्षण घेऊन त्यांचे चिरंजीव आबासाहेब हे महाराष्ट्रात दुय्यम निबंधक झाले. आपल्या नोकरीदरम्यान त्यांनी माणुसकीची खूप माया जमविली. आणि शेवटी ते मुंबईत स्थायिक झाले.

www.janvicharnews.com

त्यांना श्री बाळासाहेब, अजित व नितीन अशी तीन मुले आणि जयश्री व शैलजा या दोन मुली झाल्या. बाळासाहेबांनी काही दिवस भारतीय नाविक दलात काम केल्यानंतर परत येऊन व्यावसायात उडी घेतली. नगरचे अरुण कायगावकर यांच्या सोबत 1992 साली चिंतामणी ज्वेलर्सच्या माध्यमातून पदार्पण केले. ठाणे, डोंबिवली भागात याच्या भव्य शाखा आहेत. याच चिंतामणी ज्वेलर्सने तुळजाभवानीच्या मुख्य गाभार्याेतील तब्बल 65 किलो वजनाची चांदीची मेघडंबरी दिलेली आहे. श्रीमान बाळासाहेब हे उप मुख्यमंत्री मा. अजितदादांचे साडू आहेत.

 

www.janvicharnews.com

 

 

राठी माणसाच्या सोनाच्या खाणी – चिंतामणी ज्वेलर्सचे नितीनभाऊ कदम यांची सदिच्छा भेट !

लहान बंधू नितीनराव यांनी या व्यावसायात भाग घेऊन पुढे कदम आणि कदम ज्वेलर्स या फर्मच्या नावाखाली अमेरिकेतील सनीवेल, कॅलिफोर्निया, आफ्रिकेतील घाना, पेरु, द. अमेरिका, बुलाव्हिया, रशिया, दुबई इत्यादि ठिकाणी आपल्या शाखा काढून मराठी माणसाचे नाव उज्वल केले. विशेष म्हणजे घानामध्ये सोन्याच्या खाणीतून प्रत्यक्ष सोने काढतानाचे नितीनभाऊनी सांगितलेले अनुभव खूप उत्साहवर्धक वाटले. आई तुळजाभवानी व इतिहासाच्या आवडीतून अशी सोनेरी माणसे आमच्या भेटीला आली. सोबत इतिहासाची प्रचंड आवड असणारे तुळजापूरचे भोपे पुजारी संभाजीदादा कदम होते. धन्यवाद नितीनभाऊ !

प्रा. डॉ. सतीश कदम, अध्यक्ष अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद.

 

Scroll to Top