महेंद्र कुंभारे,
www.janvicharnews.com
कालच भाजपचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झाले. होय, भाजपचेच गृहमंत्री कारण, ते कधीच देशातील जनतेचे गृहमंत्री आहेत असे वागलेच नाहीत. जसे महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी वागतात तसेच. केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदीही जनतेला आपले मानतच नाहीत. शेतकऱ्यांसाठी काळे कायदे, सर्व सामान्यांसाठी महागाई, सरकारी कंपन्या विकणे आणि दोन गुजराती व्यापाऱ्यांसाठी हवे ते करणे. म्हणजेच देशातील जनतेचा विश्वासघात करण्यासारखेच आहे असो…. काल अमित शहा मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर त्यांनी एकीकडे महाराष्ट्रातून शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांना संपविण्याची भाषा केली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी असल्याचे म्हटले. म्हणजेच उध्दव ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे यांनाही संपविण्याची तयारी झाली असल्याचे स्पष्ट होते. शिवसेनाच संपवायची आहे तर मग ती उध्दव ठाकरे यांची असो की एकनाथ शिंदे यांची. शिवसेना संपविणे हाच भाजपचा प्लान असल्याचा त्यांनी स्पष्टच बोलून दाखविले. शिवाय मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या.

www.janvicharnews.com
खरेतर संवैधानिक पद धारण करणाऱ्या व्यक्तीने खुलेआम निवडणूक प्रचारात भाग घेणे आणि एखादे राज्य अथवा महानगरपालिका ताब्यात घेण्याचे वक्तव्य करणेच असंवेधानिक होय. तुम्ही देशाचे गृहमंत्री नसून भाजपचे आहात असे वर म्हटलेच आहे. तसेच उध्दव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला, गद्दारी केली म्हणून त्यांना संपवा वगैरे वगैरे वल्गना त्यांनी केल्या. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांच्यासोबत केलेल्या गद्दारीचा साधा नामोल्लेखही केला नाही. गद्दारांना धडा शिकवा म्हणजेच एकनाथ शिंदेंना धडा शिकवा असे त्यांना म्हणायचे आहे का? तसेच उध्दव ठाकरे यांनी धोका दिला असे अमित भाईंचे म्हणणे आहे तर मग ते गेली अडीच वर्ष गप्प का बसले? शिवाय भाजपचे ज्येष्ठ आणि जबाबदार नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी अधिवेशनात “आम्ही शिवसेनेला फसविले ही आमची चूक असल्याची कबुली दिली होती.” मग, खरे कोण बोलतोय? मातोश्रीच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेत एक तडिपार असलेली व्यक्ती आणि एक सुसंस्कृत घराण्यातली ज्याने महाभयंकर कोरोना काळात राज्यातील जनतेचे पालकत्व स्वीकारून हजारो प्राण वाचविले अशी सरळ, साधी व्यक्ती यापैकी लोकं कोणावर विश्वास ठेवणार? साहजिकच उध्दव ठाकरे हिच विश्वसनीय आणि खरी व्यक्ती होय.
http://चला आता मुंबई विकू या……!https://janvicharnews.com/2148/

www.janvicharnews.com
मुंबई महानगरपालिका काबिज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे यासाठीच अमित शहांचा महाराष्ट्र, मुंबई दौरा आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या करोडो रुपये फिक्स डिपाॅझिटवर भाजपचा डोळा आहे. कारण, येत्या काळात अनेक राज्यातील आमदार, नगरसेवक फोडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा लागणार आहे. आमदार खरेदी करणे ही गोष्ट आता लपून राहिली नाही. शिवाय मुंबई ला केंद्रशासित करणे आणि महाराष्ट्राचे दोन तुकडे करण्यासाठी विदर्भला वेगळे करणे हे देवेंद्र फडणविसांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सर्वप्रथम मुंबई महानगरपालिका ताब्यात घेणे अत्यंत गरजेचे आहे असे केंद्रिय भाजप नेतृत्वाला वाटते. महाराष्ट्राचे तुकडे होऊ नये यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने मग तो कोणत्याही जाती, धर्म, पंथ आणि समाजाचा असो त्याने प्रथम मुंबई भाजपच्या ताब्यात जाऊ नये म्हणून उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे आणि एकजुटीने उभे राहणे अत्यावश्यक आहे. धर्माधर्मात तेढ निर्माण करणाऱ्या भाजपापेक्षा शिवसेनेचे हिंदुत्व कधीही चांगलेच. बाहेरच्या शत्रुपेक्षा आपल्या घरातील वाद मिटविणे गरजेचे आहे. महाराष्ट्रावर यापूर्वी असे किती “शहा” चालून आले त्यांचे काहीही चालले नाही. तर मग या “शहा” ला परतविणे महाराष्ट्राच्या जनतेला सहज शक्य आहे. मात्र, आपल्यातले “अणाजी पंत” ओळखता आले पाहिजेत. नाहीतर मुंबई सह महाराष्ट्रही गमवायची वेळ आपल्यावर येऊ शकते. म्हणून जनतेने सावध, जागरुक होऊन येत्या निवडणूकीत मतदान केले पाहिजे! ✍️