
या महाशयांचे वार्षिक वेतन आहे 21 कोटी रुपये
www.janvicharnews.com
“असली मसाले सच सच एमडीएच” ही जाहिरात आपण रोज टीव्हीवर पाहतो. या जाहिरातीमधील 95 वर्षीय म्हातारा हा वास्तवातला एक मोस्ट सक्सेसफुल हिरो आहे.. एमडीएच मसाल्याचे सर्वेसर्वा श्री महाशय धरमपाल गुलाटी यांचे नाव. वार्षिक वेतन फक्त 21कोटी.
शिक्षण – इयत्ता 5 वी पर्यंत.
जन्म – 27 मार्च 1919
सियालकोट पाकिस्तान .
वडिल चुन्नीलालनी मसाला व्यवसायात नाव करुन एमडीएच (महाशियां दी हट्टी = महाशयाचे दुकान ) ही कंपनी स्थापन केली. परंतु 1947 च्या फाळणीमुळे धरमपाल अमृतसर व पुढे दिल्लीत आले. निर्वासितांच्या तंबुत राहुन 650 रुपयांचा टांगा घेतला. दोन आण्यात सवारी ही घोषणा करत धरमपाल धंद्यात उतरले पण त्यात नुकसान आले. परंतु दिल्लीचा अभ्यास झाला. शेवटी एक छोटेसे टोपले घेऊन ते आपल्या मसाला विक्रीकडे वळले. “सियालकोट के मसालेवालें” हळूहळू जम बसवू लागले. 1953 ला दिल्लीतच पहिले दुकानतर पुढे 1959 ला किर्ती नगर भागात एमडीएच नावाने कारखाना सुरु केला. आज विविध 60 प्रकारच्या उत्पादनाचे 15 कारखाने तर 100 देशात कंपनी चा विस्तार असुन वार्षिक उलाढाल 1500 कोटींची, 1000 मुख्य डिलर आहेत. एमडीएच चे 80% शेअर्स धरमपालजींचे असून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने ते वार्षिक 21 कोटी मानधन घेतात. 2017 -18 कंपनीचा निव्वळ नफा 213 कोटींचा आहे. यातील अर्धीअधिक रक्कम ते समाजसेवेसाठी वापरतात. 20 शाळा व महाविद्यालये तसेच एक सुसज्ज हॉस्पिटल चालवून ते गरिबांची सेवा करतात. एक मुलगा व सहा मुली असे सर्वजण त्यांचा कारभार पुढे चालवतात.फक्त पाचवी पास व खिशात एक दमडी नसणारा, रोज टिव्हीवर दिसणारा हा अवलिया खरंच सुपरहिरो आहे.. शेवटी त्यावरुन एकच म्हणावे लागेल… ईमानदारीने मेहनत करा, सफलता मिळेल सचसच…सलाम सुपर हिरोला..
सतीश कदम