शिंदे गट बंडखोरी करत शिवसेनेतून बाहेर पडला. शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडलेल्या या फुटीर गटाने भाजप (BJP) सोबत युती करत शिंदे सरकार स्थापन केलं. सरकार स्थापनेनंतर तब्बल 38 दिवसांनी शिंदे सरकारचा (Shinde Goverment) मंत्रिमंडळ विस्तार झाला व विरोधकांनी टीकेची झोड उठवली.

www.janvicharnews.com
राजकारणातील आरोप-प्रत्यारोप हे जणू जनतेची दिशाभूल करण्यासाठीच असतात, अशी स्थिती सध्या राज्यात आहे. कारण, भाजपने ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचार, गैरवर्तन व गंभीर गुन्ह्यांचे आरोप केले होते, तेच लोक आता भाजपच्या साथीने मंत्रिपदी विराजमान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही मंडळी आता काम करतील. नव्याने शपथ घेतलेल्या १८ कॅबिनेट मंत्र्यांपैकी ६ जणांवर घोटाळ्याचेे आरोप आहेत.

www.janvicharnews.com
संदिपान भुमरे, पैठण-ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारमध्ये रोजगार हमी मंत्री होते. पाचोडमध्ये रोजगार हमी योजेनतून रस्त्याचे काम सुरू होते. या कामावर पाचोड येथील मोठे व्यापारी रोहयोच्या कामावर दाखवले.
विजयकुमार गावित, नंदुरबार-२००४ ते २००९ दरम्यान आदिवासी विकासमंत्री असताना आदिवासी विकास विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले होते. गायकवाड समितीने केलेल्या चौकशीमध्ये हा घोटाळा उघडकीस आला होता.
संजय राठोड, दिग्रस-रील्स व्हिडिओ स्टार पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यामध्ये आत्महत्या केली होती. पूजा चव्हाण हिच्याशी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांचे संबंध असल्याचा आरोप करून राठोड यांच्याच त्रासाला कंटाळून पूजा चव्हाण हिने आत्महत्या केली, असा आरोप भाजपने केला होता
अब्दुल सत्तार, सिल्लोड-आघाडी सरकारमध्ये सत्तार महसूल राज्यमंत्री होते. जमिनींच्या वादांपैकी काही प्रकरणांचे न्यायिक निवाडे महसूल राज्यमंत्र्यांकडे होतात. सत्तार यांनी अनेक चुकीचे निकाल दिले, काही प्रकरणांना गरज नसताना स्थगिती दिली होती. विशेष म्हणजे औरंगाबाद खंडपीठानेही या प्रकारानंतर सत्तार यांना फटकारले होते.टीईटी घोटाळ्यामध्येही सत्तार कुटुंबीयांची नावे पुढे आली.
गिरीश महाजन, जामनेर-२०२० मध्ये जळगावातील खासगी शिक्षण संस्था ताब्यात घेण्यासाठी संचालकांना धमकावल्याच्या आरोपावरून महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
राधाकृष्ण विखे पाटील, शिर्डी-देशविघातक कृत्य करणाऱ्या झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनकडून विखे पाटलांच्या प्रवरा मेडिकल ट्रस्टने देणगी स्वीकारल्याचा आरोप आहे तसेच मुळा-मुठा वीज वापर संस्थेच्या घोटाळ्यामध्येही विखे पाटील यांच्यावर आरोप झाले होते.