संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या मुर्त्युचे रहस्य…

 

संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या मुर्त्युचे रहस्य.

“तुकाराम बीज” म्हणजे संत तुकाराम महाराजांना वयाच्या केवळ बेचाळिसाव्या वर्षी गूढ अशा मृत्यूला सामोर जावे लागले. संत तुकाराम महाराज यांचा जन्म १६०८ चा तर मृत्यू १६५० सालचा म्हणजे ते फक्त ४२ वर्षे जगले.
संत तुकाराम महाराज तरुण असताना त्यांचा मृत्यू झालाच कसा…?
हा नेहमीच शंकेचा,वादाचा विषय राहिला आहे. संत तुकाराम महाराजांचा मृत्यूचा वाद भविष्यात कोणी तरी उकरून काढू नये. म्हणूनच ज्या वैदिक ब्राह्मणांच्या हातात धार्मिक विशेष अधिकार होते, प्रचाराची सनसाधने होती, त्यानीच संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले अशी स्वतःच्या सोयीची नोंद करून घेतली कारण•••
वास्तविक पाहता संत तुकाराम महाराजानी स्वतः लिहलेल्या गाथे मधुन स्वर्ग,वैकुंठ,मोक्ष नाकारलेला आहे. ते म्हणतात:
येथे मिळतो दहिभात |
वैकुंठी त्याची नाही मात ||
येथे (पृथ्वीवर) काबाडकष्ट केले तर दहीभात-भाजीभाकरी तर मिळेल,पण वैकुंठात जे कामधेनू,कल्पवृक्ष,चिंतामणी सांगितले जातात ते धादांत खोटं आहे. पुढे ते म्हणतात:
भय नाही जन्म घेता,
मोक्षपदा हाणो लाथा |
तुका म्हणे आता,
मज न लगे सायुज्यता ||
संत तुकाराम महाराज म्हणतात या जन्माची मला भीती नाही,म्हणजे ते पृथ्वीवर राहू इच्छित होते,मोक्षाला लाथा घाला असे म्हणून ते मोक्ष(वैकुंठ) नाकारतात. जे तुकाराम महाराज वैकुंठ नाकारतात, ते तुकाराम महाराज वैकुंठाला जातील का? तथाकथित मोक्षाचे अतिउच्च पद म्हणजे सर्वोच्चपद आहे, असे वैदिक ब्राह्मणी परंपरा सांगते,त्या सर्वोच्चपदाला तुकाराम महाराज नाकारतात.
म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठ नाकारतात, त्या तुकाराम महाराजांना वैदिक ब्राह्मण वैकुंठाला का पाठवतात ?
कारण ब्राह्मणी वैदिक धर्मशास्त्रा नुसार ज्यांची ब्राह्मणाकडून हत्या झालेली असेल त्याचे मृत्यू नंतर केले जाणारे विधी अर्थात सुतक पाळण्याची गरज नाही. रामेश्वरभटांनी कान्होबाला(तुकारामाचे भाऊ) सांगितले, की तुकाराम सदेह वैकुंठाला गेला आहे तेव्हा तुकारामाचे सुतक पाळायची गरज नाही. रामेश्वरभटाने कान्होबाला हे सांगण्याचा मुळ उद्देश हाच होता. कारण रामेश्वर भटाला माहित होतं की गौतमधर्म-सूत्रा मध्ये एक नियम आहे•••••
बह्यदण्डहता ये च ये चैव ब्राह्यणैर्हताः ।
महापातिकिनो ये च पतितास्ते प्रकीर्तिति: ।।
पतितांना न दाह: स्यान्न च स्यादस्थिसंचय: ।
न चाश्रुपात: पिण्डो वा कार्या श्राद्धक्रिया न च ।।
या श्लोकाचा अर्थ असा- जे ब्राह्मणाच्या काठीने मारले गेले असतील, ज्यांची ब्राह्मणांकडून हत्या झालेली असेल आणि जे महापातकी असतील,ते पतित म्हटले जातात. अशा पतित लोकांचे दहन करू नये.(म्हणजे तिसर्या दिवशी त्या अस्थी गोळा करून त्याचा विसर्जन करण्याचा विधी करू नये) त्यांच्या साठी अश्रू ढाळू नयेत. त्यांना पिंड अर्पण करून नये वा त्यांच्यासाठी श्राद्धक्रिया ही करू नये
याचा अर्थ असा की ब्राह्मणाचे वैर ओढवून घेणार्या माणसाच्या नातेवाईकांनी त्याच्या जिवंतपणी आणि त्याचा मृत्यू नंतर ही त्या व्यक्तीच्या बरोबरीचे आपले रक्ताचे नाते ही नाकारावे असा हा वैदिक धर्माचा नियम बहुजन समाजाला सुचवितो.

प्रश्न हा आहे की संत तुकाराम महाराजांची हत्या का? आणि कोणी घडवून आणली
•••••••••••••••••
संत तुकाराम महाराजांचा वैचारिक संघर्ष वैदिक ब्राह्मणी दहशतवादी धार्मिक व्यवस्थेच्या विरोधात आणि बहुजनांच्या मानवी अधिकारा करीता होता.म्हणूनच संत तुकाराम महाराजांनी वैदिकांचे वेद-श्रुति-स्मृती-यज्ञयाग-होमहवन सर्व-सर्व नाकारले.

|| वेद ||
वेद हे वैदिक ब्राह्मणी संस्कृतीच्या इतिहासातिल एक अतिशय प्रभावी घटक आहे. वेदा बद्दल बहुजना मध्ये असा समज पसरलविला गेला होता की वेदा मध्ये जगातील सर्व ज्ञान आहे. सृष्टिचे सर्व रहस्य वेदामध्येच दडलेले आहे.वेद सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्याने कोणीही आपली बुद्धी किंवा तर्क वापरून वेदाची चिकिस्ता करायची नाही, अशी रूढी तयार करण्यात आली. वेदाचा हाच संदर्भ घेऊन बाळ गंगाधर टिळक हिंदूची व्याख्या करताना सांगतात की “जे लोक ही रूढी मनतात, ते वैदिक म्हटले जातात, आणि जे लोक फक्त वेदांना ‘प्रमाण’ मानतात तेच लोक हिंदू ” परंतु

संत तुकाराम वैदिक ब्राम्हणाला वेदां विषयी जानिव करुन देतात•••••••••••
वेदाचा तो अर्थ अम्हांसीच ठावा।
येरानी वाहवा भार माथा।।
तुका म्हणे आले आपणचि फळा ।
हातोहाती मूळ सापडले ।।

वैदिक ब्राम्हणी धर्माचे स्वरूप जाणण्याचा वेद हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे वेद हे वैदिक ब्राम्हणी विषमतावादी व्यवस्तेचे प्रभावी शश्त्र आहे.
वेदांनी चातुर्वर्ण विषमतावादी समाजाची निर्मिती तर केलीच आणि त्यातुन विषारी जातिव्यवस्थेचा उगम झाला. आणि पुढे चालून वैदिक ब्राह्मणांनी असा दंडक घोषित केला की वेदांची कोणीही चिकित्सा करु नये तसे करणे हे वैदिक धर्मामध्ये सर्वात मोठे पाप माणण्यात आले तसेच वेद अपौरुषय आहेत अर्थात विचारस्वतंत्र्याला संपूर्ण नकार देण्यात आला,

वेद हे ब्राम्हणाचे सत्ता, संप्पती , प्रतिष्ठा व सुखभोगाचे प्रतिक आहे.

वैदिक ब्राम्हण स्वतःला भुदेव म्हणवून घेतात•••

देवा आधिन जगस्तर्व
मंत्रा आधिन देवते ।
ते मंत्र आधिन ब्राह्मण
ब्राम्हण मम देवतम ।।

संत तुकाराम महाराज वेदाच्या या बनवेगिरीला प्रश्न विचारतात.

दैवते असती तयाच्या हाती ।
मग का मरती त्याची नातेगोती ।।

संत तुकाराम महाराजाच्या सडेतोड ऊत्तराने वैदिक ब्राम्हणाच्या विशेष अधिकाराला तडा गेला.
वैदिक ब्राह्मणा बद्धल बहुजनाला जो आदर होता, त्यांच्या शब्दाला जे पवित्र मानले जायचे, वेदांचा जो सन्मान होता. संत तुकाराम महाराजांच्या सत्याच्या सिद्धांताने वैदीक पंडिताच्या धार्मिक वर्चस्वाला हादरे बसु लागले. ज्ञानाची श्रेष्ठत्वाची घमेंड, दुसर्याना दुखविनारा अहंकार त्यातुन इतरांना कमि लेखन्याची प्रवृत्तिला धक्क्यावर धक्के बसु लागले वैदिक पंडितांचे आसन डगमगू लागले. वैदिकांच्या पोकळ वाणीला सूरुंग लावण्याचे क्रांतिकारी कार्य संत तुकारामांनी केले म्हणुनच संत तुकाराम टाळकुटे संत नसून विद्रोही संत आहेत !!!

वेदावरील कठोर टिकेने वैदिक पंडितांच्या गोटात एकच “खळबळ” उडाली असेल ज्या वेदांची प्रतिष्ठा बहुजनांच्या मनात वैदिक पंडितांने निर्माण केली होती,वेदांचा एकही शब्द उच्चारण्याचा धार्मिक अधिकार शुद्रांना(OBC) नव्हता त्या शुद्रा मधिल तुकाराम नावाच्या शुद्राने (OBCने) वेदा विषयी शंका घ्यावी , वैदिक पंडिताच्या ज्ञानाला अव्हान द्यावे हे पाहुन जातीवादी वैदिक पंडितांच्या मेंदुला चांगल्याच झिण-झिण्या आल्या असतिल आणि मग या वैदिक पंडिताचे विषारी दात संत तुकाराम महाराज यांना डसन्या करिता “सळसळले” ही असतिल.

|| यज्ञ ||
वैदिक ब्राम्हणाचा पर्जन्येष्टी यज्ञ आहे ह्या यज्ञाने पाऊस पाडला जातो असा वैदिक ब्राम्हाणाचा दावा आहे.
यज्ञ भवती प्रजन्ये।
यज्ञ कर्म सामुभ्दव।।
अर्थात यज्ञानेच पाऊस पडतो कर्मा पासुन यज्ञ हेच आदितत्व आहे.
परंतु वास्तविक पाहता गिते मध्ये १२-१२ वर्षाचे दुष्काळ पडल्याचे वर्णन आहे आणि ह्या गितेत विश्वमित्र रुषीचा उल्लेख आहे. विश्वमित्र मोठा रुषी याला ह्या बारावर्षाच्या भंयकर दुष्काळात आपला जीव वाचविण्या साठी कुत्र्याचे मांस खावे लागले. जर यज्ञाने पाऊस पडत असता तर वेदरचना करनारा यज्ञाचे पौरोहित्य करणार्या विश्वमित्र रुषीने पर्जन्ययज्ञ करुन पाऊस पाडला असता.

संत तुकाराम वैदिक ब्राम्हणाच्या पर्जन्येष्टी यज्ञाच्या थोथांडावर आपल्या अभंग वाणीत वैचिरिक सिद्धांत मांडतात.

प्रजन्य पडावे आपल्या स्वभावे।
आपल्याला देते पिके भुमी ।।
।। तुका म्हणे ।।
काही विदविर्य शक्ति नाही

पाऊस निसर्ग नियमा प्रमाणे पडतो, भुमी आपल्याला धान्य पिकवते यज्ञातून नाही.
संत तुकोबाने वैदिक ब्राह्मणाच्या “पोकळ”शब्दावर ओढलेले हे असुड होते. अनैतिक वैदिक पंडितांच्या मर्मावरच जबरदस्त आघात होता.
बहुजानांच्या वेदना – दुःख त्यांची गरिबी-लाचारी
बौद्धिक गुलामीचा निर्माता वैदिक ब्राह्मणच आहे हे संत तुकाराम सांगु लागले, लोक ही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेऊ लागले. संत तुकारामांनी आपल्या वाणीचे असूड वैदिक ब्राम्हणी व्यवस्थेवर चालविले.
ते आपल्या गाथेतून सांगतात•••••
अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड ।
काय त्यासी रांड प्रवसली
वैष्णव चांभार धन्य त्याची माता ।
शुद्ध उभयंता कुळ याती
ऐसा हा निवाडा जाळासे पुराणी ।
नव्हे माझी वाणी पदरीची
तुका म्हणे आगी लागो
थोरपणा ।
दृष्टी त्या दुर्जना न पडो माझी।।
पुढे ते सांगतात••••
किर्तनाचा विकारा मातेचे गमन ।
भाड खाई धन विटाळ तो ।।१।।

हरिकथेची विक्री करणे,त्यापासून धन मागणे हे मातेशी गमन केल्या प्रमाणे आहे. अशा प्रकारचे धन मातेची भाड घेण्यासारखे होय. हे वाईट मार्गाने असल्याने त्याचा विटाळच होतो ।।१।।

इथं एक महत्त्वाचं समजून घेतलं पाहिजे ते हे की•••
संत तुकाराम महाराजांचे वैदिक ब्राह्मण पंडितां बरोबरचे वैर व्यक्तिगत कारणातून निर्माण झालेले नव्हते तर वैदिक ब्राह्मण पंडितांच्या अनैतिक
संस्कार व संस्कृति विरोधी वैचारिक भुमिका तुकारामानी घेतली होती.

वैदिक ब्राम्हणाने संत तुकारामांची शारीरिक मारहाण केली. त्यांच्या किर्तनावर व अभंगावर बंदी घातली, वेदांवर बोलतात म्हणून शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील महसूल वसुलीचे काम बघणार्‍या कृष्णाजी अनंत चिटणीसाला भरीस घालून तुकोबांच्या घरावर, दुकानावर, शेतीवर जप्ती आणण्यात आली.
त्यांच्या सहित कुटूंबाला वाळीत टाकले, त्यांच्या कुटूंबाला गावातुन हद्धपार केले.
नाही नाही ते खटाटोप आणि आटापिटा करूनही तुकारामांचे प्रबोधन कार्य थांबत नाही हे पाहून तुकारामांची “गाथा” धर्मविरोधी आणि अप्रस्तुत ठरवण्याचा आणि ती इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याचा अघोरी प्रयोग झाला. त्यासाठी काशीहून धर्मपीठाचार्य बोलावण्यात आले. त्यांच्यासमोर तुकारामाला पाचारण करून शास्त्रार्थाची तर्कटचर्चा करण्यात आली. हे अर्थात ढोंग होते. तुकाराम लिहितो, सांगतो ते धर्मविरोधी आहे, हे ठरवण्याचा डाव ठरलेला होता. त्यानुसार तुकारामांचे अभंग नष्ट करण्यात यावेत असा निर्वाळा धर्मन्यायपीठाने दिला. तुकारामांनी लिहिलेले अभंगांचे संबंध बाड तुकारामांच्याच हाताने इंद्रायणीत बुडवले गेले.
कारण काय तर तुकाराम कुणबी अर्थात वर्णाने शुद्र(OBC) त्यामुळे एका ज्ञानप्राप्तीचा आणि विचार मांडण्याचा अधिकारच नाही. शुद्रांचे (OBC) विचार म्हणजे घोर पातक. त्यामुळे धर्मभ्रष्ट होतो. देवाचा प्रकोप होतो. म्हणून हे आक्रीत (तुकारामांचे अभंग) नष्ट केले पाहिजे.
दुर्दैवाने त्यावेळी तुकारामांची बाजू घ्यायला तिथे कोणीच नव्हते. गाथा इंद्रायणीत बुडवणे हा धर्मपीठाचा न्याय होता. त्यात कोण हस्तक्षेप करणार? गाथा पाण्यात बुडाली. पण त्यातला विचार मात्र तरला. तो बुडाला नाही. कारण तोवर तो सर्वोतोमुखी झाला होता.
सत्यशोधक तुकाराम महाराज की जय..!

Scroll to Top