सर्वसामान्यांची वैचारिक ढाल :लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
डॉ मल्हार शिंदे
अण्णाभाऊ साठे या नावाने ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते.अण्णाभाऊ हे मांग (दलित) समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते.

www.janvicharnews.com
तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारतही त्यांनी आपले विचार मांडले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध करून जनसामान्यापर्यंत पोहचविले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावणी, गीतं, पदं या काव्यप्रकारचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. १९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती.

www.janvicharnews.com
अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत. अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.
अन्नाभाऊ साठे यांचे काही प्रेरणादायी कोटस,विचार पुढीलप्रमाणे आहेत-

www.janvicharnews.com
1)मनुष्य हा कोणाचा गुलाम नाहीये वास्तविक जगताचा निर्माता आहे.
2) जग बदल घालुन घाव सांगुन गेलेत आम्हास भीमराव
3) नैराश्य हे तलवारीवर जमलेल्या धुळी प्रमाण असते अणि आपण ती धुळ जर लगेच झटकुन टाकली तर आपले जीवन पुन्हा तलवारीसारखे धारदार बनु शकते.
4) आपणा सर्वाची जात ही एक वास्तविक बाब आहे.अणि आपण ज्या गरीबीत जगतो ती एक कृत्रिम बाब आहे.गरीबी आपण पैसे कमवून एकटेच नष्ट करू शकतो पण जात नष्ट करायला आपण सगळयांनी मिळून पुढाकार घेणे गरजेचे आहे.
5) अनिष्ट रुढी परंपरेचे पालन करून मनुष्यास हीनतेची वागणुक देणे हा धर्म नव्हे तर एक सामाजिक कीड आहे.
6) पृथ्वी ही शेपनागाच्या मस्तिकशावर तरलेली नव्हे तर कष्ट करणारया श्रमिक वर्गाच्या तळहातावर तरलेली आहे.
7)दलितांना देखील इतर व्यक्तीं सारख्या समान भावभावना असतात.पण दलित हा इतर व्यक्तींपेक्षा थोडा अलग असतो.दलित हा निर्मितीशील असतो तो वास्तव जगामध्ये कष्टाचे मेहनतीचे सागर उपसुन धनाचे डोंगर उभे करत असतो.
11) जो कलावंत आपल्या जनतेची कदर करीत असतो त्याचीच कदर जनता देखील करीत असते.हे मी पहिले शिकतो त्यानंतरच कुठलेही लेखन करीत असतो.
12) माझ्या राष्टावर,माझ्या देशातील जनतेवर त्यांच्या कतृत्वावर संघर्षावर मला ठाम विश्वास आहे.
13) माझा भारत देश सुखी समृदध व्हावा इथे सगळीकडे समानता वास करावी.या देशाच्या भुमीच स्वर्ग व्हावे असे स्वप्र मी रोज पाहत असतो अणि हेच स्वप्र पाहत मी लेखन करीत असतो.
14) फक्त कल्पनेच्या कृत्रिम डोळयांनी बघुन कुठलेही सत्य दिसुन येत नाही तर ते सत्य हदयात साठवणे गरजेचे असते.
15) डोळयांनी सर्व काही दिसत असते.पण ते सर्वच साहित्यास हातभार लावत नसते.
16) प्रतिभेतुन सत्य अणि जीवणाच वास्तविक दर्शन घडुन येत नसेल तर ती प्रतिभा निरर्थक आहे.
17) सत्यास जर जीवणाचा आधार नसेल तर प्रतिभा ही अंधकारातील आरशासारखी निरूपयोगी ठरत असते.
18) साहित्य हे आरशाप्रमाणे पारदर्शक अणि स्पष्ट असायला हवे.त्यात आपल्या वास्तविक जीवणाचे प्रतिबिंब दिसायला हवे.
19) दलितांचे जीवण खडकातुन झिरपत असलेल्या पक्ष्यासारख असते ते आपण जवळ जाऊन पाहायला हवे.जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे आपणास हे तुकाराम महाराज बोलले ते एकदम सत्य आहे.
20) जो जनतेकडे पाठ फिरवतो साहित्य देखील त्याच्याकडे पाठ फिरवित असते.
लोकशाहीर म्हणून अण्णाभाऊंच्या अनेक कादंबऱ्याा प्रसिद्ध आहेत.
- आबी
- गुलाम
- जिवंत काडतुसे
- पाझर
- रानगंगा
- वारणेचा वाघ
- वैर
- फकीरा
- वैजयंता
🎯अण्णाभाऊ साठे यांचे कथासंग्रह :-
कादंबऱ्या बरोबरच अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कथा संग्रह लिहिले त्यात….
- कृष्णा काठच्या कथा
- गजाआड
- नवती
- खूळवाडा
- आबी
- पिसाळलेला माणूस
- फरारी
- बरबाद्या कंजारी
- निखारा
- चीरानगरची भूतं
असे हे थोर साहित्य सम्राट, लोकशाहीर, विचारवंत, समाजसुधारक अशा कितीतरी उपाधी धारण केलेले अण्णाभाऊ साठे यांचे निधन 18 जुलै 1969 रोजी झाले. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आणि त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन.