हेरंबकुलकर्णी

www.janvicharnews.com
‘घर घर तिरंगा’ ही मोहीम व त्या अनुषंगाने अमृतमहोत्सवी स्वातंत्र दिन कार्यक्रम वातावरणनिर्मिती सुरू आहे.ती अत्यन्त महत्वाची व स्वागतार्ह आहे. हा अभिमानाचा क्षण आहे पण ७५ वर्षे झाली याचा गौरव व्यक्त करताना हा क्षण ७५ वर्षाच्या सिंहावलोकनाचा आहे.त्यामुळे जे झाले ते ही मांडले जाईल व जे राहीले त्याचीही चर्चा होईल. हीच वेळ असते की त्यांचे प्रश्न यानिमित्ताने पुढे आणता येतील. त्यामुळे स्वातंत्र्याची किरणे ज्यांच्यापर्यंत पोहोचली नाहीत त्या भटके विमुक्त, आदिवासी, भूमिहीन मजूर, कुपोषित जनता, शहरी झोपडपट्टीत नरकप्राय जगणारे गरीब या सर्वांची वेदना मांडून त्याकडेही लक्ष वेधले जाईल.हेतू हा की यानिमित्ताने त्यांचे स्मरण होऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा संकल्प केला जाईल.

www.janvicharnews.com
पण भक्त बेभान होऊन अशा पोस्टवर लगेच पोस्ट लिहिणाऱ्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. घरावर झेंडा लावणारा देशभक्त व न लावणारा देशद्रोही इतकी बटबटीत व्याख्या होऊ नये व डीपी वर तिरंगा ठेवणारा देशभक्त व गरिबीचे फोटो टाकणारा देशभक्त नाही असे वर्गीकरण होऊ नये…त्यातही गरिबी किंवा प्रश्न मांडणारे हे मोदी सरकारने ते प्रश्न निर्माण केले असे म्हणत नसतात ते व्यापक रितीने बोलत असतात पण भक्त ते सरकारवर टीका म्हणून घेतात. मोठ्या पाईपमधील राहणारे गरीब लोक कोठे झेंडा लावतील ? अशी एक पोस्ट पाईपचा फोटो टाकून आली तर त्याला उत्तर २०१४ पूर्वी हे बंगल्यात राहत होते का ? आले

www.janvicharnews.com
थोडक्यात अभिमान व्यक्त करू पण त्याचे रूपांतर उन्मादात होऊ नये व आपली देशभक्ती सिद्ध करण्यासाठी इतरांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह नको आणि प्रश्न मांडणे म्हणजे आनन्द व्यक्त करण्याला अपशकुन नव्हे
अभिमान आनंद आणि उपेक्षित राहिलेल्या बांधवांकडे लक्ष वेधणे एकाचवेळी व्हायला हवे
हेरंबकुलकर्णी