मुंग्या येणं याला वैद्यकीय भाषेत ‘पॅराथिसिया‘ म्हणतात. मुंग्या येतात म्हणजे खरंतर आतल्या बाजूने टोचल्यासारखं वाटतं किंवा जळजळ झाल्यासारखी वाटते. सहसा पॅराथिसियामुळे त्रास होतो म्हणजे फक्त थोड्यावेळासाठी इरिटेशन होतं पण त्यापलीकडे त्याचे काही गंभीर परिणाम नसतात आणि त्यासाठी कोणत्याच उपचारांची गरज नसते. पण जर पॅराथिसिया होण्याचं कारण काही वेगळं असेल तर या मुंग्या अशा आपोआप जात नाहीत, त्याला मग उपचारांची गरज असते. ज्या अवयवाला मुंग्या येतात त्या अवयवाच्या एखाद्या नसेवर दाब येऊन त्याचा रक्तपुरवठा तात्पुरता खंडित झालेला असतो. म्हणूनच थोडी हालचाल केल्यावर तिथला रक्त पुरवठा पुर्वव्रत होऊन मुंग्या जातात.
हातापायांना आलेल्या जर या मुंग्या अशा साध्या हालचालीने जात नसतील किंवा वारंवार येऊन खूप काळासाठी राहत असतील तर त्यामागची कारणं वेगळी असू शकतात…
जसं की
• एखाद्या महत्वाच्या नर्व्हची दुखापत ट्रॉमा.
•हार्मोनल इम्बॅलन्स.
•हुमॅटॉइड अर्धायटिससारखे आजार.
•मज्जारज्जूचे विकार.
• किडनीचे विकार लिव्हरचे विकार.
• ट्युमर स्ट्रोक.
•थायरॉईड.
•किमोथेरपीचे साईड इफेक्ट.
•मुंग्या आलेला अवयव बधिर होणे.
•मुंग्या आलेला अवयव बधिर होणे.
• त्या अवयवाची आग होणे.
• अशक्तपणा जर आलेल्या मुंग्या लवकर जात नसतील किंवा वारंवार मुंग्या येऊन वरच्या लक्षणांपैकी कोणतीही लक्षणं दिसत असतील तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पण जर मुंग्यांचा किरकोळ त्रासाने कंटाळला असाल ते कोणते घरगुती उपाय करायचे ते आपण बघू.
हातापायाला आलेल्या मुंग्या घालवण्याचे घरगुती उपाय…
*१. मसाज मुंग्या येणाऱ्या भागाला नियमितपमे साध्या खोबरेल तेलाने मसाज केला तरी मुंग्या यायचं प्रमाण खूप कमी होतं. मसाज केल्याने तिथल्या नसा मोकळ्या होतात आणि त्या भागाचा रक्तपुरवठा सुधारतो. रक्त पुरवठा व्यवस्थित झाला की मग मुंग्यांचा त्रास होत नाही.
*२. गरम शेक गरम पाण्याने किंवा गरम पिशवीने शेकल्यावर सुद्धा रक्त पुरवठा सुधारतो. मुंग्या येणाऱ्या भागातल्या नर्व्हज सुद्धा शेकण्यामुळे मोकळ्या होतात आणि मुंग्यांचा त्रास कमी होतो. गरम पिशवी घेऊन मुंग्या येत असतील त्या भागावर ठेऊन पाच ते सात मिनिटं, असं दिवसातून दोन – तीनदा शेकलं तर मुंग्यांचा त्रास नक्कीच कमी होईल.
*३. एप्सम सॉल्ट एप्सम सॉल्टमध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे नर्व्हज मधलं इंफ्लेमेशन कमी होते आणि असं झालं की मुंग्या येण्याचं कारणाच राहत नाही.
*४. दालचिनी दालचिनीमध्ये मँगनीज आणि पोटॅशिअम खूप प्रमाणात असतं. या दोन्हीचा रक्त पुरवठा सुधरवायला उपयोग होतो म्हणूनच दालचिनी हा मुंग्यांवर फार प्रभावी उपाय आहे कारण मुंग्या येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे रक्तपुरवठा कमी होणं . एक चमचा दालचिनी पावडर एक ग्लास गरम पाण्यात घालून रोज एकदा घेतलं तर या उपायाचा लगेच फायदा होईल.
*५. दही हा सगळ्यात सोपा उपाय आहे , यात काय करायचं आहे तर रोज फक्त थोडं दही खायचं आहे . दह्यात मँगनीजचं प्रमाण खूप जास्त असल्याने त्याचा रक्त पुरवठा सुधरवण्यासाठी फायदा होतो.
मुंग्या येऊच नयेत म्हणून काय काळजी घ्यायची…?
*१. एका जागी फार वेळ बसून राहू नये. कामाचं स्वरूपच बसण्याचं असेल तर दर तासाभराने उठून थोडी हालचाल करावी. बसल्या बसल्या सुद्धा हात – पाय – मान यांचे किरकोळ व्यायाम करावेत.
*२. जेवणात व्हिटॅमिन बी १२ चं प्रमाण वाढवा. अंडी, नॉनव्हेज, दूध यामध्ये व्हिटॅमिन बी १२ जास्त प्रमाणात आढळतं. जेवणात भरपूर हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य घ्यावीत.
*३. सिगारेट, तंबाखू, दारू या व्यसनांचा आपल्या नर्व्हस सिस्टीमवर विपरीत परिणाम होत असतो त्यामुळे त्यापासून लांब राहणंच आपल्या हिताचं आहे.
*४. मधुमेह असेल तर तो नियंत्रणात ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. डॉक्टरांच्या औषधाबरोबरच आहारात बदल आणि नियमित व्यायाम केला पाहिजे. मधुमेह नियंत्रणाबाहेर गेला तर मुंग्यांचा त्रास वाढू शकतो म्हणून ही काळजी घ्यावी.
*५. पोहणे, योगासनं यामुळे रक्तपुरवठा सुधारतो त्यामुळे हे व्यायाम आवर्जून करावेत.
*६. आहारात व्हिटॅमिन ‘ बी ‘ वाढवावे. मोड आलेली कडधान्य, गहू, ओट्स, दूध आणि दुधाचे पदार्थ यामध्ये भरपूर प्रमाणात असतात.
७. जेवणात कार्बोहायड्रेट कमी करून प्रोटीन वाढवावीत. हातापायाच्या मुंग्या घालवण्यासाठी हे उपाय नक्की करून बघा.
डॉ. सदानंद परदेशी,
सुनील इनामदार.