
www.janvicharnews.com
आज आपण बोलणार आहोत होमिओपॅथी आणि मानसिक आरोग्य या विषयावर. अस म्हणतात की या जगात सागरा पेक्षाही खोल काही असेल तर ते माणसाचा मन आहे . सागरात जशा लाटा येतात आणि जातात ,तसेच मनात विचार येतात आणि जातात ..
जेव्हा हे विचार सारखे सारखे येतात ,तेव्हा त्याचे रूपांतर विकारात होते ,तेव्हा त्याला आपण मानसिक विकार म्हणतो . जसे की राग ,भिती ,द्वेष ,मत्सर ,एकटं राहणे इत्यादी .
मनात अशा विचारांचे प्रमाण जर अति झाले तर ते मना बरोबर शरीराला सुद्धा घातक ठरू शकतात .
होमिओपॅथी ही एक अशी चिकित्सा पद्धती आहे की ज्यात ही औषधे निरोगी माणसावर सिद्ध केलेली आहेत ,त्या मुळे या पॅथीत शारीरिक लक्षणांन बरोबर मानसिक लक्षणे देखील मिळतात .
मानसिक विकाराचे प्रकार.
आज काल सगळ्यांचच जीवन खूप व्यस्त झाल आहे . माणसाने खूप प्रगती केली आहे . या भूतलावर माणसा इतका कोणताच प्राणी हुशार नाही . माणसाच्या प्रगतीच्या वेगाची गती फार आहे . या गती बरोबरच मानसिक विकाराची गती पण वाढत आहे . जर योग्य वेळी हे विकार लक्षात घेऊन त्या वर उपचार केले तर बऱ्याचश्या शारीरिक आणि मानसिक विकारांना आळा घालता येतो . या पॅथीत हे विकार सहज दूर केले जाऊ शकतात .
बऱ्याच प्रकारचे मानसिक विकार असतात जसे की ,
भीती वाटणे
काही लोकांना सारखीच भीती वाटत असते . जसे की अंधाराची भीती वाटणे ,उंच जागेची ,परीक्षेची ,गर्दीची ,मरणाची ,एकटे राहण्याची ,रोड क्रॉस करायची इत्यादी . जर या भीतीचे प्रमाण वाढतच गेले तर ही भीती बऱ्याचश्या शारीरिक आणि मानसिक आजारांना कारणीभूत ठरू शकते .
राग
काही लोकांना खूप अति प्रमाणात राग असतो ,अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा देखील त्यांना राग येत असतो . रागात मग काही लोक वस्तू फेकणे ,ओरडणे ,चिरकणे ,मार-पीट करणे इत्यादी गोष्टी करतात . हळू हळू हा त्यांचा स्वभाव बनत जातो ,ते चिडचिडे होत जातात .बऱ्याच वेळी आपण असं करतो मग लोक काय म्हणतील ,या गोष्टीचा देखील त्यांना राग यायला लागतो . मग हा राग हा अपमान ते मनातच दाबून ठेवतात ,त्याचा परिणाम शरीरावर आणि मनावर होतो. या मुळेच मग पुढे चालून शारीरिक आणि मानसिक विकार उत्पन्न होतात .
आत्महत्या करायचा विचार
काही लोकांना त्यांच्या मनाच्या विरुद्ध काही गोष्टी झाल्या की लगेच आत्महत्येचा विचार मनात येतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मनाविरुद्ध झालेल्या त्यांना सहन होत नाहीत . जीवनात काही परेशानी अली की लगेच निराश होणे ,कि लगेच आत्महत्येचा विचार करणे .
होमिओपॅथीक औषध जर अशा पेशंट ला दिली तर हळू हळू हे विचार कमी होतात .
खोटे बोलणे
बऱ्याच लोकांना किंवा मुलांना खोटे बोलायची सवय असते .ही सवय सुद्धा या औषधांनी हळू हळू कमी होते .
संशय
काही लोकांना प्रत्येक गोष्टीत संशय घेण्याची सवय असते . सगळ्यांकडे संशयाच्या दृष्टीने पाहणे . या सवयीवर सुद्धा या पॅथीत चांगल्या प्रकारची औषधे आहेत .
रडणे
बऱ्याच वेळा खास करून महिला अगदी छोट्या कारणा साठी सुद्धा सहज रडतात . कोणीकाही बोलले की रडायला सुरुवात .,हा एक प्रकारचा मानसिक विकारच आहे .
ही काही उदाहरणे आपण पहिली अशा बऱ्याचश्या मानसिक विकारांवर होमिओपॅथी मध्ये इलाज आहे . फक्त योग्य वेळी आणि योग्य होमिओपॅथीक तज्ञांचा सल्ला घेणे व उपचार घेणे गरजेचे आहे .
म्हणतात ना स्वच्छ मन हे निरोगी शरीराचा आरसा आहे .
या मानसिक विकारांना स्वतःवर हावी होऊ देऊ नका आणि स्वस्थ राहा .
होमिओपॅथी मध्ये आजाराच कारण दूर करून आजार नीट केला जातो . प्रत्येक आजारी व्यक्तीचे औषध हे त्याची शारीरिक व मानसिक अवस्था पाहूनच दिले जाते . योग्य औषधांसाठी तज्ञांचा सल्ला घ्या .
संपर्क
डॉ समता गोर्हे
8657875568