अभिमान आहे आपण 100 कोटीची सोयाबीन ऑइल मिल उभा करताय …………

अभिमान आहे आपण 100 कोटीची सोयाबीन ऑइल मिल उभा करताय …………

वैराग ता. बार्शी जि. सोलापूर येथील सुप्रसिद्ध आडत व तेल व्यापारी, दाळ उत्पादक मा. दिलीपभाई आणि शीतलभाई गांधी आपण मुळच्या व्यावसायात प्रचंड यश संपादन केल्यानंतर आता सोयाबीन ऑइल मिलची उभारणी करत आहात. परवा बार्शी येथील व्याख्यानानिमित्ताने बऱ्याच दिवसांनी भेट झाली. फोनवर चर्चा असतेच मात्र प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. त्यानुसार बार्शी – तुळजापूर-उस्मानाबाद रस्त्यावर कदमवस्ती भागात जवळपास 10 एकर परिसरावर आपला नियोजित प्रोजेक्ट पाहून खूप आनंद झाला. काम अतिशय झपाट्याने सुरू आहे. प्रस्तावित मिलची मला आकलन झालेली आकडेवारी पाहून शॉक बसण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. कारण अतिशय साधी राहणी, मितभाषी स्वभाव पाहता आपल्या कार्याविषयी आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

www.janvicharnews.com

चकित करणारी आकडेवारी —-

* अंदाजे भागभांडवल – 100 कोटी

* दररोज 500 टन गाळप क्षमता आहे.

•रोज लागणारा कच्चा माल सोयाबीन – 10, 000 कट्टा

•शिल्लक मालाची साठवणूक 1 लाख कट्टा, तेवढ्या क्षमतेचे गोडावून तयार होत आहे. यामध्ये गाड्या थेट आत जातील अशी व्यवस्था आहे.

•12 टनाच्या बॉयलरसाठी – 30 टन कोळसा लागेल.

•दररोज 3 लाख लीटर पाणी ( त्यासाठी 8 लाख लीटर पाण्याच्या दोन टाक्या तयार झाल्या आहेत )

•दररोजचे लाईट बिल – अंदाजे 1. 50 लाख रुपये

•रोज 50 ते 80 ट्रक व किमान 10 -12 टँकरचे आवागमन राहणार आहे.

• कामगार – 400 लोकांना थेट रोजगार मिळेल, आता बांधकामासाठी 150 लोक काम करत आहेत.

•या मिलमधून रोज 100 टन सोयाबीन तेल निर्मिती होणार आहे.

•@ यातून बार्शी उस्मानाबाद परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

•किमान 100 रुपये अधिकचा भाव मिळू शकतो.

•ही सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी मिल असेल.

www.janvicharnews.com

•आपल्या प्रकल्पाचे नाव –

DARSHANA SOLVENT EXTRACTION PRIVATE LIMITED, BARSHI

•म्हणूनच भाई आपला आम्हाला अभिमान आहे. आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छ्या !

प्रा. डॉ. सतीश कदम

Scroll to Top