आर्थिक सुरक्षा कवच आणि भविष्यकालीन गुंतवणूक

आजच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या भविष्यासाठी अनेक गुंतवणूक करतो, सोने खरेदी करतो, जमिनीमध्ये पैसे लावतो किंवा मुदत ठेवी (FD) ठेवतो. पण जेव्हा ‘आरोग्य विम्याचा’ (Health Insurance) विषय निघतो, तेव्हा आजही अनेक लोक याकडे ‘विनाकारण होणारा खर्च’ किंवा ‘वाया जाणारे पैसे’ म्हणून पाहतात. पण खरंच आरोग्य विमा हा केवळ खर्च आहे का? की ते एक स्मार्ट आर्थिक नियोजन आहे? चला सविस्तर जाणून घेऊया.
आजच्या काळात आरोग्य विमा (Health Insurance) असणे ही केवळ सोय नसून ती एक महत्त्वाची गरज बनली आहे. याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- वाढता वैद्यकीय खर्च (Medical Inflation)
अनपेक्षित आजार व अपघात यावरील वैद्यकीय उपचारांचे खर्च झपाट्याने वाढत आहेत. शस्त्रक्रिया, औषधे आणि दवाखान्यातील भरतीचा खर्च एका मध्यमवर्गीय कुटुंबाचे आर्थिक बजेट कोलमडू शकतो. विमा असेल तर तुम्हाला खिशातील पैसे खर्च करावे लागत नाहीत.
- बचतीचे संरक्षण (Protection of Savings)
माणूस वर्षानुवर्षे मेहनत करून मुलांचे शिक्षण, लग्न किंवा घरासाठी पैसे साठवतो.इतर गुंतवणुकींमधून (उदा. FD, शेअर्स) आपण पैसे वाढवतो, परंतु, घरामध्ये एखादे मोठे आजारपण आले, तर ही सर्व जमापुंजी काही दिवसांतच खर्च होऊ शकते. अचानक आलेल्या मोठ्या आजारपणामुळे तुमची वर्षेभराची गुंतवणूक एका झटक्यात संपू शकते. विमा ही गुंतवणूक तुमच्या मुख्य भांडवलाला धक्का लागू देत नाही. आरोग्य विमा तुमची ही आयुष्यभराची कमाई सुरक्षित ठेवतो,
- अचानक उद्भवणारे संकट
- आजारपण किंवा अपघात कधीही सांगून येत नाही. अशा वेळी ऐनवेळी पैशांची जुळवाजुळव करणे कठीण जाते. विमा तुमच्यासाठी एक ‘सुरक्षा कवच’ म्हणून काम करतो.
उत्तम दर्जाचे उपचार
पैशांच्या कमतरतेमुळे उपचारांशी तडजोड करावी लागू नये, यासाठी विमा गरजेचा आहे. विमा असल्यास तुम्ही चांगल्या आणि नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकता.
- कॅशलेस सुविधा (Cashless Treatment)
कॅशलेस हॉस्पिटलायझेशन- विमा कंपन्यांचे अनेक हॉस्पिटल्ससोबत टाय-अप असते. तिथे तुम्हाला भरती होताना एकही रुपया जमा करावा लागत नाही; कंपनी थेट हॉस्पिटलचे बिल भरते.
- गंभीर आजारांसाठी संरक्षण
कॅन्सर, हृदयविकार किंवा किडनीचे आजार यांसारख्या मोठ्या आजारांच्या उपचारांसाठी लाखांमध्ये खर्च येतो. आरोग्य विम्यातील ‘क्रिटिकल इलनेस’ कव्हर अशा वेळी खूप मदतीचे ठरते.
- आयुष्याची निश्चितता आणि मानसिक शांतता
जेव्हा तुमच्याकडे योग्य आरोग्य विमा असतो, तेव्हा “काही संकट आले तर पैशांचे काय होईल?” ही भीती कमी होते. तुम्ही पैशांची चिंता न करता केवळ रुग्णाच्या प्रकृतीवर आणि चांगल्या उपचारांवर लक्ष केंद्रित करू शकता.
- प्राप्तिकरात सवलत (Tax Benefits)
- आरोग्य विम्याचा हप्ता (Premium) भरल्यास तुम्हाला ‘प्राप्तिकर कायदा कलम 80D’ अंतर्गत करात सवलत मिळते. म्हणजे आरोग्यासोबतच तुमची बचतही होते.
एक महत्त्वाची टीप: तुम्ही जितक्या कमी वयात विमा काढाल, तितका त्याचा हप्ता (Premium) कमी असतो आणि तुम्हाला जास्त फायदे मिळतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी योग्य विमा प्लॅन निवडण्यास आम्ही मार्गदर्शन करतो


