इव्हेंट मॅनेजमेंट करिअरचे नवे दालन
क्षेत्राची ओळख
विविध प्रकारचे समारंभ, परिषदा, अधिवेशने प्रदर्शन विवाहसोहळे यांचे आयोजन हे एक आव्हान असते. खास करून जेव्हा हे सोहळे मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात व त्याचे संपूर्ण व्यवस्थापन करून तो सोहळा व्यवस्थित पार पाडणे ही एक मोठी जबाबदारी असते. या अशा कार्यक्रमाचे व्यावसायिक कुशलतेने व्यवस्थापन करणे म्हणजेच इव्हेंट मॅनेजमेंट होय.
क्षेत्राची व्याप्ती व संधी
इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते संपूर्ण कराव्या लागणाऱ्या कामांचा समावेश होतो. एखादा समारंभ ठरल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या कायदेशीर परवानग्या किया परवाने मिळवणे, जनसंपर्क समारंभस्थळाची स्टेज तयार करणे आवश्यक तेथे जाहिरात प्रसिद्धी करणे, केटरर निवड कार्यक्रमासाठी लागणाऱ्या सर्व सोई सुविधा करणे यातील अनेक किंवा सर्व जबाबदाऱ्या इव्हेंट मॅनेजरला पार पाडाव्या लागतात. थोडक्यात, कोणत्याही व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये येणाऱ्या नियोजन, संघटन, आर्थिक व्यवस्थापन, नियंत्रण, विविध घटकामधील समन्वय ह्या सर्वच गोष्टी इन्व्हेंट मॅनेजर अचूकपणे सांभाळत असतो.
एकूण सेवा क्षेत्राचा होणारा विकास आणि त्या अनुषंगाने इकेट मॅनेजमेंट इंडस्ट्रीचा होणारा विकास पाहता हे कार्यक्षेत्र एक उद्योग्न्मुख क्षेत्र आहे असे म्हणता येईल. मोठ्या कंपन्यांच्या परिषदा पार्टीज पुरस्कार सोहळे यापासून ते लग्नसमारंभ आणि वाढदिवससापर्यंत म्हणजेच मोठ्या प्रमाणावरील आंतरराष्ट्रीय कार्यक्रमापासून ते लहान, खासगी समारंभापर्यंत सर्वच प्रसंगासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांची सेवा घेण्याकडे कल वाढत आहे.
करिअर पर्याय
इंव्हेट नियोजक
इंव्हेट ऑर्गनायझर
कार्यक्रम समन्वयक
क्रियेटीव्ह इंव्हेट विक्रेता व्यवस्थापक
व्यवसाय विकास कार्यकारी प्रमुख
कार्यक्रम अधिकारी
कार्यक्रम व्यवस्थापक
कष्टमर केअर कार्यकारी
आवश्यक गुण
इंव्हेट मॅनेजरच्या कामाचे बहुआयामी व्यवस्थापकीय स्वरूप लक्षात घेता त्याच्यामध्ये प्रभावी व्यक्तिमत्व, आमविश्वास शिस्तबद्धता, समयसूचकता, वक्तशीरपणा, चांगले संज्ञापन चांगला लोकसंपर्क विविध प्रकारच्या व्यक्तीना हाताळण्याचे कौशल्य आणि अचानक उद्भवणान्या समस्यांना तोंड देण्याची तयारी ही कौशल्य असणे महत्त्वाचे असते. त्याचबरोबर या विषयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेणेही एक चांगला इव्हेंट मॅनेजर होण्यासाठी महत्त्वाचे असते.
अभ्यासक्रम व पात्रता
इव्हेंट मैनेजमेंटच्या प्रशिक्षणासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची अट नाही. साधारणपणे कोणत्याही शाखेच्या बारावी उत्तीर्ण व्यक्तीसाठी देखील कोर्सेस उपलब्ध आहेत. थिअरीसोबतच या प्रकारच्या कोर्सेसमध्ये प्रत्यक्ष अनुभवातून प्रशिक्षण मिळते.
इव्हेंट मॅनेजमेंट कोर्सेस आणि संस्थांमध्ये प्रमाणपत्र
1). डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट कालावधी – 11 महिने संस्थेचे नाव – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, मुंबई कोर्स फी – रु 63,000
2). डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट कालावधी – 1 वर्ष संस्थेचे नाव – प्रेस्टिज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, इंदूर कोर्स फी – 90,000 रुपये
3). वेडिंग मॅनेजमेंटमधील प्रमाणपत्र कालावधी – 6 महिने संस्थेचे नाव – वेडिंग मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, दिल्ली
4). डिप्लोमा इन हॉटेल आणि इव्हेंट मॅनेजमेंट कालावधी – 1 वर्ष संस्थेचे नाव – इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कुलिनरी स्टडीज, जयपूर कोर्स फी – रु 50,000
5). डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट कालावधी – 1 वर्ष संस्थेचे नाव – इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग, उदयपूर कोर्स फी – रु. 1,00,000
6). डिप्लोमा इन वेडिंग कोऑर्डिनेशन कालावधी – 1 वर्ष संस्थेचे नाव – अॅनेक्सी कॉलेज, कोलकाता
7). डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट कालावधी – 1 वर्ष संस्थेचे नाव – अॅनेक्सी कॉलेज, कोलकाता
8). डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट कालावधी – 1 वर्ष संस्थेचे नाव – अरिहंत एज्युकेशन ग्रुप, इंदूर कोर्स फी – 60,000 रुपये
इव्हेंट मॅनेजमेंट ऑनलाइन कोर्स
1). यशस्वी कार्यक्रम: इव्हेंट प्लॅनिंग, मार्केटिंग आणि मॅनेजमेंट कालावधी – 10 तास संस्थेचे नाव – उडेमी कोर्स फी – रु 3,200
2). नवशिक्यांसाठी इव्हेंट मॅनेजमेंट कालावधी – 2 तास संस्थेचे नाव – उडेमी कोर्स फी – रु 2,800
3). प्रकल्प व्यवस्थापन: तत्त्वे आणि सराव कालावधी – 5 महिन्यांचे संस्थेचे नाव – कोर्सेरा कोर्स फी – 3,616 रुपये इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स अभ्यासक्रमातील प्रमाणपत्र इव्हेंट मॅनेजमेंट बिझनेस कम्युनिकेशन इव्हेंटची ओळख इव्हेंट जाहिरात आर्थिक अकाउंटिंग इव्हेंट प्लॅनिंग आणि टीम मॅनेजमेंट इव्हेंट मॅनेजमेंट सेफ मार्केटिंग इव्हेंट मॅनेजमेंट इव्हेंट मॅनेजमेंट इव्हेंट लीडरशिप आणि कम्युनिकेशन बजेट मॅनेजमेंट प्रोजेक्ट वर्कसाठी क्रॉस कल्चर मॅनेजमेंट आयटी