कोरोना काळात पावसात भिजणे ठरू शकते घातक? काळजी आणि उपाय ….

www.janvicharnews.com

पाऊस आणि आजार दोघे सोबत येतात. या ऋतूतील आजारांची लक्षणे आणि कोरोनाची लक्षणे जवळपास सारखीच असतात. सर्दी-खोकला-ताप. ही कोरोना आणि पाऊस या दोन्हीची सामान्य लक्षणे आहेत.

पावसाळ्यात तुम्ही कसे निरोगी राहू शकता

ऑफिसला जात असताना किंवा घरी येताना अचानक पाऊस पडतो, मग सायकल, दुचाकीवरून जाणारे लोक, पादचारी भिजतात. त्यानंतर काही वेळाने सूर्यप्रकाशही येतो. अशा स्थितीत तुम्ही आजारी पडू शकतात. त्यामुळे तुम्हाला काही खबरदारी घ्यावी लागेल.

पुढील कारणांमुळे तुम्ही पावसाळ्यात आजारी पडू शकता…

१ आजूबाजूला असणाऱ्या अस्वच्छ परिसरामुळे

२ घाणीमुळे डास आणि कीटकांची निर्मिती होते

३ गलिच्छ पाणी पिणे

४ वातावरणातील झालेले बदल

५ ओले कपडे तात्काळ न बदलणे

६ बाहेरील फाष्ट फूड पदार्थ खाल्यामुळे ..

पावसात डोकं का झाकावं….

  • आधी पावसाचे पाणी डोक्यावर पडते.
  • डोके हा शरीराचा अतिशय नाजूक भाग आहे.
  • डोक्यावर थोडीशी थंडी पडल्याने सर्दी होऊ शकते.
  • म्हणूनच पावसात आधी डोकं झाकलं पाहिजे.
  • डोके ओले झाले तर घरी येऊन लगेच ड्रायरने वाळवा.

वर नमूद केलेल्या गोष्टींचे पालन केल्यास काय होईल?
उत्तर- कपडे बदल्याने

  • तुम्हाला जास्त थंडी जाणवणार नाही.
  • शरीराचे तापमान सामान्य होईल.
  • बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका देखील कमी होईल.

हळदीचे दूध किंवा आल्याचा चहा पिल्याने…

  • शरीराला आतून उष्णता मिळेल.
  • ताप आणि सर्दी होण्याचा धोका कमी होईल.

पाय धुणे आणि कोरडे करणे…

  • संसर्गाचा त्रास होणार नाही.
  • सूज येण्याची समस्या होणार नाही.

अँटीबॅक्टेरियल क्रीम लावल्याने

  • शरीरातील बॅक्टेरिया मरतात.
  • त्वचेची ऍलर्जी आणि संक्रमण टाळता येते.
  • दाद, खरुज आणि खाज येण्याची समस्या होणार नाही.

प्रश्न- पावसाळ्यात आपण काय खावे आणि प्यावे?
उत्तर-

  • सुका मेवा
  • गवती चहा
  • गरम पाणी
  • गरम सूप
  • डाळिंब, सफरचंद आणि चेरी सारखी फळे
  • हळदीचे दूध
  • ताज्या भाज्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top