
www.janvicharnews.com
चक्कर येणे ही एक सामान्य अशी आरोग्यविषयक तक्रार आहे. यामध्ये चक्कर आल्याची म्हणजे आजूबाजूच्या वस्तू आपल्याभोवती फिरत असल्याची भावना होत असते.
चक्कर येणे या त्रासाला वैद्यकीय भाषेत व्हर्टीगो (Vertigo)असे म्हणतात.
चक्कर येते तेव्हा रुग्णास मळमळ होणे, अस्वस्थता वाटणे, अंधारी येणे, घाम येणे यासारखीही लक्षणे जाणवू लागतात. तसेच चक्कर येऊन पडल्यानंतर थोड्या वेळापुरती बेशुद्धीही येऊ शकते.
चक्कर येण्याची कारणे –
अनेक कारणांमुळे चक्कर येऊ शकते. प्रामुख्याने रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास, कानासंबंधित आजार, लो ब्लडप्रेशर, डिहायड्रेशन, मानसिक ताण यांमुळे चक्कर येत
असते.
चक्कर येण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
कानातील विविध आजारांमुळे चक्कर येते,
• कानात इन्फेक्शन किंवा मळ झाल्यामुळे,
• रक्तदाब कमी झाल्यामुळे,
रक्तातील साखर कमी झाल्यामुळे चक्कर येते,
• शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशनमुळे चक्कर येते,
• रक्ताल्पता किंवा ऍनिमियामुळे चक्कर येते,
• स्पाँडिलायसिस ह्या मानेच्या विकारामुळे,
डोळ्यांचे आजार, अपस्मार (फिट येणे), ताप, डोकेदुखी, मायग्रेनच्या त्रासामुळेही चक्कर येऊ शकते.
• उंच ठिकाणावरून खाली पाहणे,
प्रवासावेळी बाहेर डोकावणे,
मानसिक तणाव तसेचं काही औषधांच्या
दुष्परिणामामुळेही चक्कर येत असते.
चक्कर येण्याची काही गंभीर कारणे :
कानासंबंधीत मेनियर आजार झाल्यामुळे चक्कर येऊ शकते. या आजारात शरीराचा तोल संभाळण्यावर परिणाम होतो.
● मेंदूला काही कारणांमुळे रक्तातून मिळणारा ऑक्सिजनचा
पुरवठा कमी झाल्यास चक्कर येते.
जुलाब-उलट्यांमुळे किंवा उष्णतेमुळे अधिक घाम येणे किंवा जास्त व्यायाम केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास डिहायड्रेशनमुळेही चक्कर येऊ शकते.
डोक्याला दुखापत झाल्यामुळे,
• पक्षाघात (स्ट्रोक), हृदयविकार, मल्टिपल स्क्लेरोसिस,
● ब्रेन ट्युमर्स या गंभीर आजारातही चक्कर येऊ शकते.
चक्कर येण्याची लक्षणे –
आजूबाजूच्या वस्तू आपल्याभोवती फिरत आहेत असे वाटते,
• डोके गरगरणे,
• कानात आवाज ऐकू येणे,
• घाम अधिक येणे,
डोळ्यासमोर अंधारी येणे.
• मळमळ व उलटी होणे,
• डोके दुखणे,
शरीराचा तोल जाऊन खाली पडणे,
काहीवेळा बेशुद्ध होऊन पडणे,
चक्कर येणे यावर होमिओपॅथिक उपचार
कोणत्या कारणांमुळे चक्कर येत आहे यानुसार यावर उपचार ठरतात. त्यामुळे चक्कर येत असल्यास, ती कशामुळे येत
आहे याचे निश्चित निदान होणे आवश्यक असते.
होमिओपॅथी मध्ये शारीरिक , मानसिक कारणांचा विचार करून औषधाची निवड केली जाते.
चक्कर येते आहे असे वाटल्यास नेमके काय करावे?
–
• चक्कर आल्यासारखे वाटू लागल्यास खाली बसावे.
• शक्य असल्यास काहीवेळ झोपून आराम करावा.
यावेळी झोपताना पाय थोडे वर आणि डोके खाली करावे.त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होण्यास मदत होते.
पाणी प्यावे. शहाळ्याचे पाणी किंवा फळांचा ताजा रस सुद्धा पिऊ शकता.
• जास्त व्यायाम अथवा उपवास यामुळे रक्तातील साखरेचे
प्रमाण कमी होऊन चक्कर येऊ शकते. अशावेळी थोडी साखर खायायला दिल्यास ही चक्कर लगेच थांबते.
• चक्कर येऊन पडल्यानंतर आलेली बेशुद्धी थोडया वेळात नाहीशी होते. अनेकदा आपोआप बरे वाटते. रुग्ण शुद्धीवर येण्यासाठी त्याच्या तोंडावर हलकेसे पाणी शिंपडू शकता.
डॉ समता गोर्हे
8657875568