
www.janvicharnews.com
भाजपा सत्तेत आहे कि बाहेर या चर्चेत पंकजा मुंडेंचा विचार होईल असे तूर्तास तरी वाटत नाही
पंकजा मुंडे समर्थकांकडून त्यांना मंत्री करा अशी मागणी वारंवार केली जाते. मात्र मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री या वाक्याच्या समज गैरसमजातून वारंवार त्यांना डावललं जात अशी चर्चा सातत्याने होत असते..
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतल्यानंतर आता सर्वांचेच लक्ष मंत्रिमंडळाकडे लागले आहेत. एकनाथ शिंदेंचा मोठा गट आल्यानंतर आता मंत्रिमंडळात भाजपमधील कोणत्या नेत्यांना संधी मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. एकनाथ गटातदेखील मंत्रीपदावरुन रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आता भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपमधून काही संभाव्य नावं चर्चेत आहेत. त्यात सुधीर मुनगंटीवर, आशिष शेलार, गिरीश महाजन, जयकुमार रावल, प्रवीण दरेकर, मनिषा चौधरी यांना नव्या मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यात पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार का, याकडे पंकजा समर्थकांचं लक्ष आहे.दुसरीकडे मराठा कार्ड म्हणून पंकजा मुंडेऐवजी आमदार सुरेश धस आणि गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांची लॉटरी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पंकजा मुंडेंना डावललं..का जाईल
शिंदे गटामधील विदर्भातील आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राठोड हे ओबीसी समाजातील नेते असून ते ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री होते. त्यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. नव्या मंत्रिमंडळात राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असं मानलं जातंय. ओबीसी नेते संजय राठोड मंत्री हे मंत्री झाले तर भाजपामधील प्रभावशाली ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळणार का? याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागलं आहे. पंकजा या मराठवाड्यातील भाजपाच्या प्रभावशाली नेत्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा त्यांना वारसा आहे. बीड जिल्हा आणि शेजारील मतदारसंघावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. या सर्वानंतरही त्यांचा मागील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.पंकजांच्या राजकीय कारकिर्दीला हा पराभव म्हणजे मोठा सेटबॅक मानला जातो.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा यांना भाजपाने राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी दिली आहे.अलीकडे राज्यसभेच्या निवडणुकीतही पंकजा मुंडेना राज्यसभेवर पाठवण्याचा प्लान होता. मात्र प्रत्यक्षात भाजपकडून आलेल्या नावांमध्ये पंकजा मुंडेंचं नाव नव्हतं. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही त्यांना तिकीट मिळाले नव्हते. सध्या कोणत्याही सभागृहाच्या सदस्य नसलेल्या पंकजा यांना भाजपा नव्या मंत्रिमंडळात संधी देणार का? हा खरा प्रश्न आहे. पंकजांना शह देण्यासाठी संजय राठोड यांचे नाव मंत्रिपदासाठी पुढे आणले जात आहे का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे .पंकजा मुंडे समर्थकांकडून त्यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी वारंवार केली जाते. मंत्री, मुख्यमंत्री विषय खूप मोठा त्यांना आमदारकीसाठी देखील त्यांना अनेकदा डावलल. आता शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना जागा मिळणार की, नाही याकडे सर्वांचेच लक्ष आहे.