पॉप्युलेशन सायन्सेस (Population Sciences) आणि करीअर
क्षेत्राची ओळख
आजकाल विद्यार्थी पारंपरिक व्यवसाय निवडण्यापेक्षा नवनवीन व्यवसाय क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत. त्यापैकीच एक आहे. पॉप्युलेशन सायन्स, पॉप्युलेशन सायन्स म्हणजे लोकसंख्याशास्त्र, संख्याशास्त्र (स्टॉटस्टिक्स), गणित, अर्थशास्त्र, इतर सामाजिक शास्त्रे, भूगोल, पर्यावरणशास्त्र, जीवशास्त्र अशा विविध अभ्याशाखाना कवेत येणारे हे शास्त्र आहे. हे एक सामाजिक शास्त्र असून लोकसख्यावाढीच्या विविध पैलूंचा अभ्यास करते सार्वजनिक आरोग्य, स्थलातर अशा लोकसंख्येशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी, तसेच सामाजिक क्षेत्रात नवनवीन उपाययोजना किया कार्यक्रम राबवण्यासाठी या शास्त्रातील संशोधनाची मदत होते.
(क्षेत्राची व्याप्ती व संधी
या क्षेत्रात उत्तम करिअर करण्यासाठी या विषयातील मास्टर्स किंवा डॉक्टरेट पदवी संपादन करणे आवश्यक आहे. हे क्षेत्र निवडणारे विदयार्थी अध्यापक, संशोधक, समाजशास्त्र, अर्थशास्त्रज्ञ म्हणून किंवा मार्केट रिस्क अॅनालिस्ट म्हणून नोकरी करू शकतात. त्यांना शासकीय तसेच काही खाजगी संस्था मार्केट रिसर्च आपल्या प्रसारमाध्यमे, स्वयंसेवी संस्था, औद्योगिक क्षेत्र किंवा समाजकल्याण संस्थात नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
या विषयात उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशातही संधी उपलब्ध आहेत. फक्त मानवी समूहाची गणना नाही, तर एखाद्या देशातील एकूण प्राणी, एकूण भूक्षेत्र, शेती क्षेत्र अशा नैसर्गिक संसाधनाची, भौगोलिक बाबीची गणना करण्यासाठी. एखाद्या देशाच्या विकासाचा आलेख मांडण्यासाठी जागतिक स्तरावरही संशोधक, माहिती संकलक विश्लेषक अशा लोकसंख्याशास्त्रातील व्यावसायिक कौशल्ये लगाया तज्ज्ञांची गरज भासते. त्यामुळे करिअरची वेगळी वाट चोखाळण्याची आवड असेल, तर पॉप्युलेशन सायन्स या नव्या अभ्यासशाखेचा विद्यार्थी नक्कीच विचार करू शकतात.
आवश्यक गुण
लोकसंख्याशास्त्राचा उत्तम जाणकार / तज्ज्ञ होण्याकरता गणिती आकडेमोड व संख्याशास्त्रात (स्टॅटिस्टिक्स) गती असणे आवश्यक असते. माहिती जमवणे, जमवलेल्या माहितीच्या आधारे विश्लेषण करणे, तार्किक अनुमान काढणे अशा कौशल्याची आवश्यकता असते. ही माहिती सत्य / वास्तवपूर्ण असावी लागते. दूरवर प्रवास करून अथकपणे सतत माहितीचे संकलन करावे लागते ती दरवर्षी किंवा ठरावीक कालावधीनंतर अद्ययावत करावी लागते. याकरता जिद्द, चिकाटी, दूरदृष्टी व उत्तम निर्णयक्षमता हे गुण असणेही आवश्यक असते.
अभ्यासक्रम
M.A/ M.SC IN POPULATION STUDIES
M.P.S
M.PHIL
Ph.d