पोपटपंची विद्यार्थ्यापेक्षा सृजनशील विद्यार्थी घडवणे काळाची गरज….

आजचा पालक…आजचा विद्यार्थी
भाग :- ४


👉आजच्या शैक्षणिक वातावरणातील मुले सर्व Formula पटापट म्हणून दाखवतील पण स्वतःचा Formula कधीही शोधू शकणार नाहीत.
👉Guitar शिकतील पण स्वतःची संगीत रचना करू शकणार नाहीत. लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वतःची ओळख निर्माण करणार नाहीत.
कारण सध्या आपण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवत आहोत. जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्ग संपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत. काही जणांना campus मध्ये दर महिना ४ लाखांपेक्षा जास्त पगार असणारी नोकरी मिळतेय….पण त्यात देशाचं नाही, भांडवलदारांच हित साधला जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वतः जगण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसर्याला जगण्याची मजा मिळू देतील…
अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टी पेक्षा practical वर भर देतात.

वृक्ष-वेली स्वतःच अन्न स्वतः तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात?… असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची- वेलींची जोपासना करायला लावतात. प्रॅक्टीकल मधून मुलांना मिळालेल उत्तर त्यांच भविष्य उज्ज्वल करू शकते.
माझी पालकांना विनंती आहे की काळाची पावले ओळखून आपण आपल्या मुलांच्या भविष्याबाबत…विचार पुर्वक निर्णय घेतला पाहीजे.

संकलन……✍️👇

शिवश्री गोरख मोरजकर

शिक्षणतज्ञ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top