फडणवीस समर्थकांनी अमित शहा यांना पोस्टर वरून गायब केले……

फडणवीस मुख्यमंत्री पदावर नको या केंद्रीय भाजपने घेतलेल्या निर्णया मागचे खरे सूत्रधार अमित शहा आहेत असा सूर फडणवीस समर्थकांचा दिसून येतो आहे

www.janvicharnews.com

भाजपाच्या पाठींब्याने नवीन सरकार महाराष्ट्राच्या सत्तेत आले आणि भाजपाच्या मुंबई कार्यालयात जल्लोष करण्यात आला, पण या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवरून अमित शाह गायब होते. नागपूरमध्येही माजी महापौर संदीप जोशी यांनी लावलेल्या फलकावरून अमित शहा गायब होते. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि शिंदे गट त्यांना पाठिंबा देईल, अशी चर्चा सुरू असतानाच एकदम आश्चर्यचकित करणारी घटना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये घडली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केल्यानंतर तसेच मंत्रिमंडळातही सहभागी होणार नसल्याचे सांगितल्यानंतर एकच राजकीय खळबळ उडाली. यामुळे या निर्णयामागे मग कोणाचा हात? देवेंद्र फडणवीस यांचे कोणी पंख कापले? अशी एकच चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु झाली. सोशल मीडियातही सकारात्मक नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीतून फडणवीस यांनी मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. मोदी यांनी दोनवेळा फोन केल्याचेही वृत्त झळकले. यानंतर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी व्हावे असे ट्विट करत मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यास भाग पाडले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचा शपथविधी पार पाडला.  या संपूर्ण प्रकारात अमित शहांचाच हात आहे आणि त्यांच्यामुळेच फडणवीस यांनी ठाकरे सरकार घालवण्यासाठी अविरत प्रयत्न करूनही त्यांची उपमुख्यमंत्रिपदावर बोळवण करण्यात आली, अशी प्रतिक्रिया फडणवीस समर्थकांमध्ये उमटत आहे. फडणवीस समर्थकांनी मंबई कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या फलकावर तसेच नागपूर येथील माजी महापौर संदीप जोशी यांनी फडणवीस यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या फलकावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो जाणीवपूर्वक दिला गेला नसल्यामुळे भाजपातील नाराजी चव्हाट्यावर आलेली आहे असे दिसून येते आहे…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top