फ्लाईट अटेंडेंट (Flight Attendant) क्षेत्रातील करिअर

क्षेत्राची ओळख

फ्लाईट अटेइट / एअर होस्टेस किवा फ्लाईट स्टुअर्ड हे एक ग्लॅमरस करिअरम्हणून नावारूपाला आलेले कार्यक्षेत्र आहे. प्रचंड मोठा पगार व विविध प्रांतात फिरण्याची संधी यामुळे हा व्यवसाय अनेकांचे स्वप्न असते. विमान प्रवासा दरम्यान प्रवाशांच्या सोई-सुविधांची काळजी घेणे हि फ्लाईट अटेंडटसची जबाबदारी असते. प्रवाशांना सुरक्षिततेसंदर्भातील सूचना देणे, त्यांच्या खान-पान सुविधेची व्यवस्था करणे, आजारी व्यक्ती / लहान मुलांची काळजी घेणे, अडचणीच्या वेळी किंवा आणीबाणीच्या प्रसंगी प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे बचावात्मक कार्यांची माहिती प्रवाशापर्यंत पोहोचवणे, प्रथमोपचार करणे इत्यादी जबाबदाऱ्या फ्लाईट अटेंडंटस पार पाडतात.

क्षेत्राची व्याप्ती व संधी

हवाई क्षेत्राची जसजशी वाढ होत आहे. तसतसी त्याला पूरक अशा सेवांची मागणी ही वाढत आहे. देशांतर्गत (domestic) मे पुरवणाऱ्या कंपन्यांसोबतच आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कंपन्यांमध्येही नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. अनुभवी फ्लाईट पर्सर्स केबिन सुपरवायझर किंवा केबिन मॅनेजर बनू शकतात. काही अटेंडंटसना विमानसेवेच्या जनसंपर्क विभागात विक्री विभागात तसेच हयूमन रिसोर्स किवा ट्रेनिंग विभागात काम करण्याची संधी मिळू शकते.

फ्लाइट अटेंडंटचे प्रकार

कार्गो मॅनेजर: एक कार्गो मॅनेजर किंवा हँडलर विमानातील माल किंवा सामान लोडिंग, अनलोडिंग, सुरक्षित करणे आणि स्टेजिंगमध्ये ग्राउंड क्रूच्या क्रियाकलापांचे पर्यवेक्षण आणि समन्वय करतो. तो किंवा ती कार्गोचे प्रमाण आणि अभिमुखता निर्धारित करू शकतात आणि विमानाच्या गुरुत्वाकर्षण केंद्राची गणना करू शकतात.

हवाई सुंदरी : एअर होस्टेस किंवा केबिन क्रू किंवा फ्लाइट स्टीवर्ड हे प्रवाशांच्या किंवा प्रवाशांच्या कल्याणासाठी, आरामासाठी आणि सुरक्षिततेसाठी बोर्डिंगच्या वेळी आणि शेवटचा प्रवासी फ्लाइटमधून उतरेपर्यंत जबाबदार असतात. या प्रकारच्या फ्लाइट अटेंडंट नोकर्‍या म्हणजे फ्लाइट टेकऑफ आणि लँडिंग करण्यापूर्वी आपत्कालीन व्यवस्था तपासणे.

ग्राउंड ऑपरेटर: ग्राउंड ऑपरेशन्समध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची नोकरीची कर्तव्ये असतात जी प्रवाशांचे विमानतळावर स्वागत करण्यापासून ते विमानाचे टेकऑफ सुनिश्चित करण्यापर्यंत वेगवेगळी असतात. या फ्लाइट अटेंडंट नोकर्‍या व्यावसायिक क्रियाकलाप, एअरलाइन ऑपरेशन्स आणि विमानतळ चालवणे यासारख्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

व्यवस्थापन कर्मचारी: विमानतळ व्यवस्थापक बहुतेकदा ज्या शहरामध्ये विमानतळ आहे त्या शहराद्वारे नियुक्त केले जातात आणि ते विमानतळावरील सर्व ऑपरेशन्ससाठी जबाबदार असतात. या प्रकारच्या फ्लाइट अटेंडंट नोकर्‍या म्हणजे इतर सर्व कर्मचारी आणि विभागांवर देखरेख करणे आणि दैनंदिन कामकाज तसेच भविष्यातील विमानतळ नियोजन व्यवस्थापित करणे.

कॅप्टन: व्यावसायिक एअरलाइन्समध्ये सहसा फ्लाइट दरम्यान किमान दोन पायलट असतात. कॅप्टन हा पायलट इन कमांड असतो आणि सर्व क्रू सदस्यांवर देखरेख करतो. सहपायलट कॅप्टनला टॉवरशी संवाद साधण्यास, उड्डाण साधनांचे निरीक्षण करण्यास आणि नियंत्रणे ऑपरेट करण्यास मदत करतो.

फर्स्ट ऑफिसर: एव्हिएशनमध्ये, फर्स्ट ऑफिसर (एफओ) हा विमानाचा दुसरा पायलट (को-पायलट म्हणूनही ओळखला जातो) असतो. पहिला अधिकारी हा विमानाचा दुसरा-इन-कमांड कॅप्टन, जो कायदेशीर कमांडर असतो. कर्णधाराच्या अक्षमतेच्या प्रसंगी, प्रथम अधिकारी विमानाची कमान स्वीकारेल.

आवश्यक गुण

या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रभावी व्यक्तिमत्त्व जबाबदारीची जाणीव सतत कार्यरत राहण्याची शक्ती आणि शारीरिक सुदृढता (अटीनुसार उंची त्याप्रमाणात वजन, दृष्टिदोष नसलेले डोळे इ.). प्रसंगावधान, संकटकाळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता, मदतीकरता तत्पर असणे आणि गोड आवाजात संवाद साधण्याची कला इत्यादी गुणांची आवश्यकता असते. परकीय भाषा किंवा इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व महत्त्वाचे ठरते.

अभ्यासक्रम

फ्लाईट अटेंडेंट / केबिन क्रू / एअर होस्टेस / एअर होस्ट या पदाकरता विविध संस्था विविध प्रकारचे कोर्सेस / अभ्यासक्रम राबवतात.

एअर लाईन / केबिन क्रू ट्रेनिंग / अॅडव्हान्स डिप्लोमा इन केबिन क्रू अॅण्ड एअरलाईन / डिप्लोमा इन केबिन क्रू & हॉस्पिटॅलिटी इत्यादी.

शैक्षणिक पात्रता : 10+2 (कोणत्याही विषयात) किंवा पदवी (कोणत्याही विषयात) + वैयक्तिक मुलाखतीद्वारे निवड(ही पात्रता इन्स्टिटयूटनुसार बदलते.)

आवश्यक वयकिमान 18 ते कमाल 26 वर्षे

इतर पात्रताउंची

1. 157 सेमी (मुली)170 सेमी (मुले)

2. उंचीनुसार योग्य वजन

3. आकर्षक व्यक्तिमत्व, उत्तम सवांद कौशल्य, शारीरिक सुदृढता, अभियोग्यता, जलतरण कौशल्य, उत्तम दृष्टी इत्यादी गुण आवश्यक असतात.

4. इंग्रजी व इतर अधिकच्या भारतीय अथवा विदेशी भाषेवरील प्रभुत्व

कालावधी- 3-१२ महिने (कोर्स व संस्थेनुसार कालावधी बदलू शकतो )

Scroll to Top