भिडे पुराण

भाग :- ३.

www.janvicharnews.com

“राजा शिव छत्रपती” या पुरंदरे लिखित ग्रंथाचे पारायणे करण्याचे पाप आमच्या हातून घडले.

महाराज ही अक्षम्य चूक आमच्या हातून घडली कारण भिडे नावाच्या कर्मठ बामणाच्या शिवप्रतिष्ठान या संघटनेच्या नादी आम्ही लागलो होतो, आणि आमच्या हातून हे पाप घडले. “राजा शिवछत्रपती” या ग्रंथाचे पारायण करताना आम्ही शिव कुळाचे चारित्र्य हनन करत होतो हे आमच्या त्यावेळी लक्षातच आले नाही.

भिडे ने बाबा पुरंदरे ने लिहिलेले “राजा शिवछत्रपती” हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरात असावा अशा हेतूने एक लाख प्रती घराघरात पोच करण्याचा संकल्प केला. या पुस्तकाची किंमत फक्त ₹ १०० इतकी ठेवली.

पुरंदरे लिखित “राजा शिछत्रपती ” हे पुस्तक घरोघरी पोचविण्याची संधी आम्हाला मिळाली याच्या आनंदात मी होतो. आम्ही कार्यकर्त्यांनी ₹१०० प्रमाणे सर्वांकडून रकमा जमा केल्या व भिडे कडे दिल्या. दोन वर्षांनी ग्रंथ मिळाले.

प्रत्यक्ष वर्षाच्या श्रावण महिन्यात, हिंदूंचा पवित्र महिना म्हणून आम्ही या पुस्तकाचं महिनाभर वाचन करीत असत, या ग्रंथा सोबत आम्ही एक भगवा दोरा मुंजे सारखा काखेत बांधत असे. ग्रंथ वाचून झाला की शेवटच्या दिवशी आम्ही प्रसाद करीत आणि वाचन समाप्ती करत असे.

पण भिडेने हा ग्रंथ वाचायला आणि त्याचा प्रसार करायला का सांगितले हे आम्हाला जेम्स लेन ने लिहिलेल्या ” शिवाजी किंग इन इस्लामिक इंडिया” या पुस्तकाचे प्रकाशन झाले त्यावेळी कळाले आणि आम्हाला आमच्या हातून घडलेल्या पापाची जाणीव झाली; आमच्या हातून काय पाप घडले ते पुढील लेखात…

क्रमशः……

विजय पाटील.

शिवप्रबोधिनी, कोल्हापूर.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top