भिडे पुराण

भिडे पुराण भाग:- ७.

शिवप्रतिष्ठान का वाढले?

शिवप्रतिष्ठान ची पाळेमुळे प्रथम सांगलीत रुजवायला सांगली मधील राजकारण जबाबदार ठरले. सांगलीतील दादा घराण्याचे सर्वसमावेशक काँग्रेसी राजकारण संपवायचे असेल तर सांगली परिसरातील धर्मांधता वाढवली पाहिजे या साठी येथील स्वतला धुरंधर आणि मुत्सद्दी समजणाऱ्या राजकीय मंडळींनी भिडेला राजाश्रय दिला.

सर्वात वाईट गोष्ट अशी की महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आणि माझी केंद्रिय मंत्री प्रतिकदादा पाटील हे भिडेचे भक्त बनले . माझी मंत्री कै. पतंगराव कदम आणि माजी मंत्री कै. आर. आर. पाटील (आबा) यांना तर भिडे याने संताजी – धनाजीची जोडी असे म्हणून हारभर्याच्या झाडावर चडवले होते. आणि या मंत्र्यांना मानणारा बहुजन समाजातील लोकांचा ओढा आपोआप शिवप्रतिष्ठान ला येऊन मिळाला, त्यानंतर छञपती उदयराजेराजे भोसले यांना मानणारा युवक वर्ग ही याच्या सावलीला येऊन उभा राहिला. आणि जयंत पाटलांचे त्याचा सोबत असलेले संबंध हे जगजाहीरच आहेत. याचा पुरेपूर लाभ भिडेने उचलला.

विषारी नागाने ऐन उन्हाळ्यात आपला विषारी फणा उंच उभारून थांबावे आणि त्या विषारी नागाच्या फडीची सावली पडावी आणि त्या सावलीला एखाद्या बेडकाने विश्वासाने थांबावे तसा तसा बहुजन मराठा समाज भिडे सारख्या अविच्यारांचे विष ओकणाऱ्या माणसाच्या सावलीला जाऊन बसला. मग भिडेने धर्मांध, अविचारी आणि मनात विषारी भावना निर्माण झालेला युवक तयार केला.

मिरज दंगली अगोदर भिडे ने शिवप्रतिष्ठानची स्थापना करून त्याच्या चितावनिखोर भाषणांनी दंगलीची पार्श्वभूमी तयार करून ठेवली होती, हिंदू – मुस्लिम वादाला खतपाणी घालून दंगलीची पार्श्वभुमी तयार झाली होती.

मिरज दंगल झाली आणि सांगलीचे सर्वसमावेशक राजकारण संपले आणि सर्वसमावेशक दादा घराण्याची सत्ता संपुष्टात आली, हे घराणे राजकारणातून बाहेर फेकले गेले. त्या ठिकाणी आता भाजपाची सत्ता आली. राजकारणाच्या खेळी साठी सांगलीच्या पुढार्यांनी नाना पाटलांच्या, दादांच्या आणि बापूंच्या जिल्ह्याचा बळी घेतला .

या भिडेच्या त्यागाने आरएसएस प्रणित भाजपाने सांगलीत आपले ब्राम्हणी पाय रोवले. छत्रपति शिवाजी महाराज आणि छञपती संभाजी महाराज यांच्या नावाचा चुकीचा वापर करून भिडेने सांगलीत पेशवाई रुजवली…….

पुढं……..

क्रमशः……

विजय पाटील.

शिवप्रबोधिनी, कोल्हापूर.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top