मतदारांचा,व संविधानाचा मान न राखणाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार नाही-उल्का महाजन

उल्का महाजन यांनी ABP माझाचा सन्मान अत्यंत महत्वपूर्ण कारण देऊन नाकारला आहे !

विद्यमान काळात कोण आदर्श हा प्रश्न पडतो आहे

www.janvicharnews.com

मा. श्री राजीव खांडेकर,
एबीपी माझाने माझी निवड “माझा सन्मान” साठी केली होती याबद्दल धन्यवाद.
सदर कार्यक्रम 1 जुलैला होणार होता तो राज्यातील राजकीय घडामोडींमुळे पुढे ढकलला जाऊन आता 3 ऑगस्ट ला होत आहे. तो सद्य नवे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होईल असे मला कळवण्यात आले. परंतु ज्या पद्धतीने मतदारांचा, लोकशाहीचा व संविधानाचा मान न राखता हे सद्य सरकार भ्रष्टाचाराच्या आधारे सत्तेवर आले आहे.
त्या पार्श्वभूमीवर अशा व्यक्तींच्या हस्ते (ते संविधानिक पदावर असले तरीही) सन्मान स्वीकारणे माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला पटणारे नाही. म्हणून सदर सन्मान मी नम्रपणे नाकारत आहे.

उल्का महाजन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top