- महाराष्ट्र लोकसेवा आयोग बद्दल माहिती:-
- जाहिरात देवून दरवर्षी दिनदर्शिकेनुसारच महाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे विविध सेवाकारिता भरती परीक्षा घेण्यात येते.
- उदा. जसे कि, १) राज्य सेवा परीक्षा
२)PSI/STI/ASST.
३)महाराष्ट्र वन सेवा परीक्षा
४)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा
५)महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
६)न्यायालयीन सेवा परीक्षा
७)सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
८)लिपिक -टंकलेखक परीक्षा, या पदांसाठी संबधित जाहिरात येते व शेवटची परिक्षा द्यावी लागेपर्यंत अभ्यास करावा लागेलच. - NO SHORTCUT, IN THIS WAY!!!
- ऑफिशियल वेबसाईट :- खालीलप्रमाणे बघाल, www.mpsc.gov.in
अर्ज करण्यासाठी वेबसाइट:- www.mpsconline.gov.in संबधित जाहिरात आल्यानंतर दिलेल्या दिशानिर्देशकाप्रमाणे गेल्यावर संपुर्ण माहिती मिळेल त्यामध्ये दिलेली पदे व शैक्षणिकदृष्ट्या पात्रता बघुन विविध मुदतीमध्ये अर्ज करावा. परिक्षा शुक्ल भरावे. अभ्यासक्रम बघुन त्यानुसारच परिक्षेची तयारी केली पाहिजे. - उदा. परीक्षेसाठी पात्रता:-
- * शैक्षणिक पात्रता:-
- १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली अर्हता .
२) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब पदाकरिता भौतिकशास्त्र व गणित या विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी या शाखेतील पदवी
३) मराठीचे ज्ञान आवश्यक. - * वयोमर्यादा –
- साधारण प्रवर्गासाठी किमान १९ वर्ष व कमाल ३३ वर्ष आयोगाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या तारखेपर्यंत.
कमाल वयोमर्यादेची अट इतर मागास व प्रवर्गासाठी ३ वर्षे अनुसूचित जाती / जमातीसाठी ५ वर्षे शिथिलक्षम खेळाडूंसाठी ५ वर्षे एवढी शिथिलक्षम असेल. अपंग उमेदवारांना वयाच्या ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम असेल. - शारीरिक पात्रता –
- १) पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलिस आयुक्त, गट-अ:- पुरूष उमेदवारांकरिता :-उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती – न फुगविता ८४ सें .मी. फुगवण्याची क्षमता – किमान ५ से.मी.जास्तच आवश्यकता असते. - महिला उमेदवारांकरिता
- उंची- १५७ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
- २) अधीक्षक,राज्य उत्पादनशुल्क , गट-अ , उप अधीक्षक राज्य उत्पादनशुल्क , गट -ब :-
- पुरूष उमेदवारांकरिता :-
- उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती – न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता – किमान ५ आवश्यक - महिला उमेदवारांकरिता
उंची- १५५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी) - ३) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब :-
पुरूष उमेदवारांकरिता :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती – न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता – किमान ५ आवश्यक
चष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी. रंगआंधळेपणा नसावा . - महिला उमेदवारांकरिता
उंची- १६३ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
चष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी. रंगआंधळेपणा नसावा . - पुस्तकांची नावे व यादी:-
- मुलाखत :-राज्य सेवा मुलाखत 100 गुण राज्यसेवा (राज्यसेवा) मुलाखतीला 100 गुण आहेत. वन सेवा मुलाखत. एकूण मार्क-५० कृषी सेवा मुलाखत मार्क्स-५० PSI मुलाखत मार्क्स-४० अशाप्रकारची माहितीप्रमाणे अभ्यासक्रम बघुन व पद निवडून मग भावी अधिकार्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा.
- वाचल्याबद्दल धन्यवाद 🙏. जय हिंद