यावर्षी साहेबराव हंगरगेकर स्मृती साहित्य पुरस्कार नामांकित ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांना जाहीर

मराठवाडा साहित्य परिषद तुळजापूर व साहेबराव हंगरेकर फाउंडेशन वतीने मंगळवारी कवी संमेलन

तुळजापूर दि १८ डॉ. सतीश महामुनी
मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूर आणि साहेबराव हंगरगेकर फाउंडेशन यांच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांना  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष विनोद(पिटू)गंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक अमर हंगरगेकर यांनी केले आहे.

हा पुरस्कार सोहळा  मंगळवार २० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६: ००वाजता हॉटेल स्काय लॅन्ड पार्किंग येथे होणार आहे. या निमित्ताने मान्यवर कवींची मैफिल आयोजित करण्यात आलेली आहे. गतवर्षी हा पुरस्कार विख्यात कवी फ.मु. शिंदे यांना दिला गेला होता. या निमित्ताने होणारे खुमासदार कवी संमेलन ऐकण्यासाठी तुळजापूर येथील साहित्य रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दोन्ही संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

या सोहळ्यात महाराष्ट्राची हास्यधारा निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. निमंत्रित कवी लोककवी प्रा.प्रशांत मोरे (कल्याण), नारायण पुरी (संभाजीनगर),अविनाश भारती (आंबेजोगाई),रविंद्र केसकर (धाराशिव) हे मान्यवर कवी या सोहळ्यात सहभागी होत आहेत. या सोहळा मध्ये जिल्हाभरातील साहित्यिकांनी साहित्य प्रेमी लोकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने अमर हंगरगेकर यांनी केले आहे. तुळजाभवानीची तीर्थक्षेत्र असणाऱ्या तुळजापूर येथे मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूर आणि साहेबराव हंगरेकर फाउंडेशन यांच्यावतीने चांगल्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन होत असल्यामुळे साहित्य चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच साहित्याची आवड असणाऱ्या वाचक वर्गासाठी हा पुरस्कार सोहळा आणि कवी संमेलन आनंद सोहळा ठरतो आहे. या सोहळ्यामध्ये बाहेर जाऊन येणाऱ्या भाविकांना या साहित्य कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येते, तसेच या कार्यक्रमासाठी येणाऱ्य साहित्यिकांना देखील तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्याचा लाभ मिळतो आहे. साहित्य क्षेत्रामध्ये अत्यंत चांगले पाऊल मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूर ने सुरु केले असून या कार्यक्रमाची दर्जा आणि उंची देखील राज्यस्तरीय सोहळ्याची असल्यामुळे सर्वांनाच साहित्याची उत्तम मेजवानी प्राप्त होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *