
www.janvicharnews.com
शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम व MH 25 Helping Hands यांच्या संकल्पनेतून रामलिंग देवस्थान, येडशी येथे स्वच्छता मोहीमेचे व वृक्षारोपण लागवडीचे आयोजन विद्यापीठाचे रासेयो समनव्यक डॉ.आनंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते, मोहिमेचे उद्घाटन उस्मानाबाद-कळंब मतदार संघाचे आमदार श्री कैलास पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी बोलताना ‘पर्यावरण जपताना अशा निस्वार्थ भावाने जेव्हा शिक्षणसंस्था आणि सेवाभावी संस्था एकत्र येतात तेव्हा आपल्याला अशा यशस्वी मोहिमा आयोजित होताना दिसतात आणि असेच अविरत प्रयत्न सुरू राहावेत व तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी पर्यावरण आणि निसर्ग जपायला भरीव योगदान द्यावे असे मत त्यांनी व्यक्त केले, पुढे बोलताना शंकरराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांचे आणि MH 25 Helping Hands च्या सर्व स्वयंसेवकांचे त्यानी कौतुक केले.
या मोहिमेत तब्बल ५०-६० डिसपोसल बॅग्स एवढा घनकचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आले आणि यानंतर देवस्थान परिक्षेत्रात करंज, चिंच, लिंब, पिंपळ, कवठ, वड अशा देशी झाडांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या सांगतेवेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व MH25 Helping Hands च्या स्वयंसेवकांनी आपण वेळोवेळी एकत्र येऊन असे कार्यक्रम आयोजित करू व पर्यावरण संवर्धनासाठी आपले योगदान देऊ असा निर्धार केला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे रासेयो चे कार्यक्रमाधिकारी प्रा.तानाजी बोराडे, प्रा.नितीन पडवळ सर, प्रा.नंदकुमार जगदाळे सर, प्रा.स्वप्निल काळे सर, प्रा.पूनम सुतार मॅडम व महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि MH25 Helping Hands चे विपुल देशमुख, कुलदीप गायकवाड, शुभम राखुंडे, आकाश वाघमारे, वैभव कुलकर्णी व असंख्य स्वयंसेवक उपस्थित होते.