सर्दी खोकल्यावर रामबाण घरगुती उपाय —

पावसाळा सुरु झाला सर्दी खोकला होणार आणि त्यावर तात्काळ उपाय करण्यासाठी किचन मध्येच मात्रा मिळेल

www.janvicharnews.com

१) लिंबु अर्धे कापुन त्यावर काळी मिरी पावडर व मीठ शिंपडून ते चोखल्यास कफाची तीव्रता कमी होते.

२) चमचाभर शुद्ध मधात चिमुटभर पांढरी मिरी पावडर टाकुन दिवसातुन ३ वेळा असे ४-५ दिवस घेतल्यासही खोकला कमी होतो.

३) नियमितपणे द्राक्षांचे सेवन केल्याने साधा सर्दी-खोकला लगेच बरा होतो. यामुळे फुफ्फुसाचे कार्य सुधारते आणि कफ शरीराबाहेर पडण्यास मदत होते.

४) काळी मिरी पावडर व सुंठ पावडर यांचे मिश्रण मधातुन दिवसातुन २-३ वेळा घेतल्यास खोकल्यापासुन आराम मिळतो.

५) हिवाळ्यात दररोजच्या जेवणात लसणाच्या २-३ पाकळ्यांचा समावेश केल्यास खोकला होण्याची शक्यता फार कमी असते.

६) आवळा पावडर व मध यांचे मिश्रण तसेच द्राक्षाचा रस आणि मध यांचे मिश्रणही फायदेशीर ठरते.

७) पाव चमचा मिरी पावडर, पाव चमचा सुंठ पावडर, १ चमचा मध हे सगळे दोन चमचे पाण्यात मिसळावे. खोकल्याची उबळ आल्यावर हे मिश्रण घेतल्यास लगेच आराम मिळतो.

८) पालकाच्या कोमट रसाने गुळण्या केल्यास कोरड्या खोकल्याचा त्रास कमी होतो. अर्धा चमचा खसखस पेस्ट, ३-४ चमचे नारळाचे दुध आणि चमचाभर मध हे मिश्रण रोज रात्री झोपताना घेतल्यास त्यानेही कोरडा खोकला कमी होतो.

९) १०० ग्रॅम पाण्यात भिजवलेली द्राक्षे तेवढ्याच साखरेत शिजवुन त्याचा सॉस बनवुन ठेवावा. झोपण्यापुर्वी २ चमचे हा सॉस घेतल्याने खोकल्याची ढास येत नाही.
तुळस आणि बडिशेपेचा काढाही खोकल्यावर उपयुक्त आहे.

१०) कोरड्या खोकल्यावर बदाम हे रामबाण औषध आहे. पाण्यात भिजवलेले बदाम सोलुन त्याची बारीक पेस्ट करून ती सकाळ संध्याकाळ लोणी-साखरेत मिसळुन घ्यावी.

११) खोकल्याबरोबरच श्वसनसंस्थेतील इतर बिघाड थोपवण्यासाठी दररोज चार तुळशीची पाने चार मिरीबरोबर चघळावीत.

१२) कांद्याचा रस व मध यांचे मिश्रण उत्कृष्ट कफसिरप आहे. उकळत्या पाण्यात एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, एका लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रणही असेच काम करते. यामुळे खोकल्यापासून तात्काळ आराम मिळतो.

१३) कपभर उकळत्या पाण्यात चमचाभर मार्जोरम (कुठरा) घालुन १५-२० मिनिटे तसेच ठेवावे व नंतर त्याचे सेवन करावे.

१४) सकाळी उठल्याबरोबर एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. जेवणानंतरही गरम पाणी घ्यावे.

१५) उकळत्या पाण्यात निलगिरीची व पुदिन्याची काही पाने टाकुन त्याचा वाफारा घ्यावा. हळकुंड भाजुन त्याची पावडर करून ती रोज घ्यावी.

१६) दूध आणि हळदी : सर्व भारतीय स्वयंपाकघरात सापडणारा एक आवश्यक घटक म्हणजे हळदी. हळदी एक अँटिऑक्सीडेंट आहे ज्यामुळे आरोग्याला बरेच फायदे होतात. झोपण्याच्या आधी एक ग्लास गरम हळद दूध प्यायल्याने सर्दी आणि खोकला बरा होतो.

१७) मीठाच्या पाण्याने गुळण्या : हा अतिशय जुना औषधोपचार आहे .जो खोकला आणि सर्दी प्रभावीपणे हाताळतो. या खारट पाण्यात हळद घालणे देखील फायदेशीर आहे.

१८)आवळा : आवळ्यामध्ये मजबूत रोगप्रतिकारक क्षमता असल्याने तो बऱ्याच आजारांविरोधात लढतो. यकृतचं कार्य सुरळीत करण्यासाठी आणि रक्त भिसरण सुरळीत करण्यासाठी आवळा मदत करतो.

१९)गाजर रस : सामान्य सर्दी आणि खोकला असेल तर त्यावर घरगुती उपाय उत्तम आहे. गाजरचा रस प्यायल्याने सामान्य सर्दी आणि खोकला बरा होण्यास मदत होते.



		
		
			

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top