हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘हे’ करा ५ आयुर्वेदिक उपाय…..

तूप आणि खोबरेल तेल…

www.janvicharnews.com

तूप त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करते. तूप आणि खोबरेल तेल या दोन्हीमध्ये नैसर्गिक घटक असतात. जी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. तुपात वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेच्या वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात. हिवाळ्याच्या हंगामात तूप आणि खोबरेल तेल मिक्स करून त्वचेला लावल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते.

कोरफड…

www.janvicharnews.com

कोरफड आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. विशेष म्हणजे कोरफड कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यास मदत करते. आंघोळीनंतर तुम्ही मॉइश्चरायझर म्हणून कोरफड वापरू शकता. कोरफडमध्ये चिमूठभर हळद मिक्स करा आणि आपल्या त्वचेला लावा. यामुळे चेहऱ्यावरील  पिंपल्स दूर होण्यास मदत होते.

दूध आणि मध…

www.janvicharnews.com

हिवाळ्याच्या हंगामात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी मध आणि दूध  देखील खूप फायदेशीर आहेत. यासाठी दोन चमचे दूध मधामध्ये मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळते.

क्लींजिंग…

www.janvicharnews.com

चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी आणि ताजेतवाने वाटण्यासाठी दिवसातून दोनदा चेहरा धुणे आवश्यक आहे. मात्र, त्यामुळे हिवाळ्यात त्वचेला कोरडेपणा येऊ शकतो. त्यामुळे अधिक रासायनिक उत्पादने वापरणे टाळावे. तुम्ही सौम्य किंवा नैसर्गिक क्लीन्सर वापरू शकता.

आहार व विहार…

www.janvicharnews.com

संतुलित आणि पौष्टिक आहारामुळे त्वचेचं आरोग्य नीट राहते. त्याचबरोबर हिवाळ्यात कोवळ्या उन्हात बसणेही उपयुक्त आहे. थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपायही आहेत. जसे की, लिंबाचा रस आणि एरंड तेलाच्या मिश्रणाने चेहऱ्याला मसाज करणे आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुणे. रात्री झोपताना लिंबाचा रस, गुलाब पाणी, ग्लिसरीन याचे मिश्रण लावल्यास हात-पाय मुलायम आणि चमकदार होतात.

सुनील इनामदार.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top