हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील करीअर

हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील करीअर

janvicharnews.com क्षेत्राची ओळख

पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय हे क्षेत्र भारतातील फॉरन डायरेक्ट इन्व्हसमेंटला (FDI) आकर्षित करणाऱ्या क्षेत्रापैकी आघाडीचे क्षेत्र आहे, पर्यटन व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर परकीय चलनाचीही प्राप्ती होते. तसेच रोजगार निर्माण होतो. वर्ल्ड ट्रॅव्हल्स ॲण्ड टुरिझम WTTC) च्या एका अहवालानुसार 2016 मध्ये भारतातील 9% रोजगार हा पर्यटन क्षेत्राशी निगडित आहे. त्यामुळे. भारत सरकारही विविध उपक्रमांद्वारे किंवा प्रसिद्धी माध्यममार्फत पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे. पर्यटन क्षेत्राच्या वाढीमुळे देशी-विदेशी पर्यटकांचा वाढल्याने साहजिकच हॉटेल व्यवसायही विकसित होत आहे. सर्व आर्थिक पातळीवरच्या पर्यटकांना परवडतील अशा हॉटेल्सपासून ते पचतारांकित हॉटेल्सपर्यंत सर्वच प्रकारची अनेक हॉटेल्स आढळतात. आतिथ्य व्यवस्थापन नाणजेच हॉस्पिटालिटी मॅनेजमेंट. त्यामुळेच चांगल्या संधी प्राप्त होताना दिसतात.

हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे हॉटेल ला संपूर्णपणे मॅनेज करणे म्हणजे हॉटेलमधील सर्व कामे व्यवस्थितपणे पार पाडणे किंवा चालवणे हे विद्यार्थ्यांनी उत्कृष्टतेचा दर्जा राखणे देखरेख करणे आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये वेळ आणि विभागांचे व्यवस्थापन कार्यक्षमतेने हाताळणे ही कला शिकणे म्हणजेच हॉटेल मॅनेजमेंट होईल. मित्रांनो आजच्या काळामध्ये हॉटेल मॅनेजमेंट ही इंडस्ट्री खूपच मोठी बनलेले आहे.

क्षेत्राची व्याप्ती व संधी

हॉटेल उद्योगामध्ये निवासी हॉटेल्स, कसीनो, रिसॉर्टस, रेस्टॉरंट्स इत्यादी नानाविध उद्योगांचा समावेश असतो

हॉटेल्समध्ये असलेले मुख्य विभाग

  • फ्रंट ऑफिस
  • अन्न व पेय विभाग.
  • हाऊस कीपिंग

या अनुषंगाने या व्यवसायातील महत्वाच्या भूमिका

janvicharnews.com

अन्न व पेय विभागातील शेफ,

साहाय्यकी सेवा पुरवणारा किचन स्टाफ,

 फ्रंट डेस्क मैनेजर,

 हाउस कीपिंग विभागातील सुपरवायझर्स,

 सर्व विभागांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यावरील व्यवस्थापक या सर्वांची आवश्यकता असते.

हॉटेल्समध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काही काळ काम केल्यानंतर किचन मॅनेजमेट हाऊस कीपिंग मैनेजमेंट मध्ये चांगले पद मिळू शकते.

त्याचप्रमाणे, फ़्लाइंट किचन मॅनेजमेंट, शिपिंग लाईन्समधील किचन्स, क्रूझ, रिसॉर्ट मैनेजमेंट, बाहुराष्ट्रीय कंपन्यांमधील विभाग, आंतरराष्ट्रीय पातळीवरील फास्ट फूड चेन्स, हॉस्पिटल्स, स्वतःचे स्वतंत्र उपहारगृह निर्मिती अशा अनेक करिअर वाटा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर परदेशातही काम करण्याची संधी यामुळे मिळू शकते.

आवश्यक गुण

  • सेवा व्यवसायाची आवड याव्यतिरिक्त या क्षेत्रात करिअर करण्यासाठी
  • झोकून देऊन काम करण्याची वृत्ती,
  • कार्यमग्नता,
  • चांगले व्यवस्थापन कौशल्य,
  • उत्साही वृत्ती,
  • वेळेचे बंधन न पाळता काम करण्याची तयारी,
  • संघभावना,
  • तपशीलवार व काटेकोरपणे काम करण्यासह स्वच्छतेची आवड

 यासारखे गुण महत्त्वाचे असतात.

अभ्यासक्रम

या क्षेत्रात प्रवेश थेट किंवा हॉटेल व्यवस्थापन संस्थेमार्फत प्रशिक्षण घेऊन होऊ शकतो; मात्र आतिथ्य व्यवस्थापनातील पदवी हि या क्षेत्रात काम करण्यासाठी मूलभूत शिक्षण देऊन त्यापुढे व्यावसायिक ज्ञान वाढवण्यासाठी मदत करते. हे शिक्षण तात्विक व प्रत्यक्ष काम यांचे मिश्र शिक्षण असते.

नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी‘ (NCHMCT) हि भारत सरकारच्या पर्यटन करणारी एक स्वतंत्र संस्था आहे. येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी आतिथ्य व्यवसायातील गुणवत्तावान व्यावसायिक म्हणून काम करू शकतात.  या संस्थातील माजी विद्यार्थी भारतात व विदेशात आतिथ्य उद्योग व शैक्षणिक संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदावर काम करत आहेत. हि कौन्सिल केंद्र सरकारतर्फे किंवा राज्य सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिटयूट आणि फूड क्राफ्ट इन्स्टिटयूटस तसेच काही खाजगी इन्स्टिटयूटच्या माध्यमातून आतिथ्य व्यवस्थापनाचे प्रशिक्षण पुरवते. सदरील इन्स्टिटयूटस  देशभर पसरलेल्या आहेत. इन्स्टिटयूटसतर्फे वेगवेगळे व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ते पुढीलप्रमाणे

  • B.Sc इन हॉस्पिटॅलिटी अॅण्ड हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन जेनेरिक 3 वर्षाचा पूर्णवेळ अभ्यासक्रम (NCHMCT IGNOU यांचा संयुक्त अभ्यासक्रम)

पात्रता: मारावी (10 + 2) किंवा समान पातळीवरील परीक्षा इंग्लिश हा विषय     घेऊन उत्तीर्ण आणि JEE चे गुण.

  • B.Sc इन हॉस्पिटलटी अँण्ड हॉटेल मैनेजमेंट- स्पेशलायझेशन (फूड प्रॉडक्शन मॅनेजमेंट / फूड अॅण्ड बेव्हरेज मैनेजमेंट / अंकोमोडेशन मॅनेजमेंट) 3 वर्षा पूर्ण अभ्यासक्रम (NCHMCT IGNOU यांचा संयुक्त अभ्यासक्रम)

पात्रता: बारावी (10 + 2) किया समान पातळीवरील परीक्षा इंग्लिश हा विषय घेऊन उत्तीर्ण आणि JEE चे गुण

  • पास डिप्लोमा कोर्सेस 36 आठवडयांचा अभ्यासक्रम व त्यानंतर 24 आठवड्यांचे इंडस्ट्रिअल ट्रेनिंग
  • डिप्लोमा इन फूड प्रॉडक्शन
  • डिप्लोमा इन बेकरी अॅण्ड कन्फेक्शनरी
  • डिप्लोमा इन हाऊस कीपिंग ऑपरेशन
  • डिप्लोमा इन फूड अॅण्ड बेव्हरेज सर्व्हिस
  • डिप्लोमा इन फट ऑफिस ऑपरेशन

पात्रता: बारावी (10+2) किवा त्याच्या समान परीक्षा इंग्लिश हा विषय घेऊन उत्तीर्ण

  • सर्टिफिकेट कोर्स
  • क्राफ्टसमनशिप सर्टिफिकेट इन फूड प्रोडक्शन अँण्ड पतीसरी- दीड वर्षांचा कोर्स
  • क्राफ्टसमनशिप सर्टिफिकेट कोर्स इन फूड अॅण्ड बेवरेज सर्व्हिस -16 महिन्यांचा अभ्यासक्रम

पात्रता: इंग्लिश हा विषय घेऊन दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी

IHM शी संलग्न असलेल्या व हा कोर्स असणाऱ्या संस्था स्वतंत्रपणे जाहिरात देऊन त्यानंतर गुणवत्तेच्या आधारे निवड करतात

  • पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा इन डाएटिक्स अॅण्ड हॉस्पिटल फूड सर्विसेस- दीड वर्षांचा अभ्यासक्रम करतात
  • पोस्ट ग्रेज्युएट डिप्लोमा इन अॅकोमोडेशन ऑपरेशन्स अॅण्ड मॅनेजमेंट : दीड वर्षांचा अभ्यासक्रम

         पात्रता: कोणत्याही शाखेचा पदवीधर कमाल वय 25 वर्षे

          IHM] जाहिरात देऊन त्यानंतर गुणवत्तेनुसार निवड करते.

  • M. Sc इन हॉस्पिटेलिटी अॅडमिनिस्ट्रेशन 2 वर्षांचा अभ्यासक्रम (NCHMCT IGNOU याचा संयुक्त कोर्स)

 पात्रता: हॉटेल मॅनेजमेंटमधील 3 वर्षांची पदविका किंवा 3/4 वर्षांची पदवी

Scroll to Top