होमिओपॅथी आणि मानसिक आरोग्य

www.janvicharnews.com

आज आपण बोलणार आहोत होमिओपॅथी आणि मानसिक आरोग्य या विषयावर. अस म्हणतात की या जगात सागरा पेक्षाही खोल काही असेल तर ते माणसाचा मन आहे . सागरात जशा लाटा येतात आणि जातात ,तसेच मनात विचार येतात आणि जातात .. 
जेव्हा हे विचार सारखे सारखे येतात ,तेव्हा त्याचे रूपांतर विकारात होते ,तेव्हा त्याला आपण मानसिक विकार म्हणतो . जसे की राग ,भिती ,द्वेष ,मत्सर ,एकटं राहणे इत्यादी .
   मनात अशा विचारांचे प्रमाण जर अति झाले तर ते मना बरोबर शरीराला सुद्धा घातक ठरू शकतात . 

   होमिओपॅथी ही एक अशी चिकित्सा पद्धती आहे की ज्यात ही औषधे निरोगी माणसावर सिद्ध केलेली आहेत ,त्या मुळे या पॅथीत शारीरिक लक्षणांन बरोबर मानसिक लक्षणे देखील मिळतात . 

मानसिक विकाराचे प्रकार. 
  आज काल सगळ्यांचच जीवन खूप व्यस्त झाल आहे . माणसाने खूप प्रगती केली आहे . या भूतलावर माणसा इतका कोणताच  प्राणी हुशार नाही . माणसाच्या प्रगतीच्या वेगाची गती फार आहे . या गती बरोबरच मानसिक विकाराची गती पण वाढत आहे . जर योग्य वेळी हे विकार लक्षात घेऊन त्या वर उपचार केले तर बऱ्याचश्या शारीरिक आणि मानसिक विकारांना आळा घालता येतो . या पॅथीत हे विकार सहज दूर केले जाऊ शकतात .
  बऱ्याच प्रकारचे मानसिक विकार असतात जसे की , 

 भीती वाटणे  
   
काही लोकांना सारखीच भीती वाटत असते . जसे की अंधाराची भीती वाटणे ,उंच जागेची ,परीक्षेची ,गर्दीची ,मरणाची ,एकटे राहण्याची ,रोड क्रॉस करायची इत्यादी . जर या भीतीचे प्रमाण वाढतच गेले तर ही भीती बऱ्याचश्या शारीरिक आणि मानसिक आजारांना कारणीभूत ठरू शकते . 

राग
  काही लोकांना खूप अति प्रमाणात राग असतो ,अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा देखील त्यांना राग येत असतो . रागात मग काही लोक वस्तू फेकणे ,ओरडणे ,चिरकणे ,मार-पीट करणे इत्यादी गोष्टी करतात . हळू हळू हा त्यांचा स्वभाव बनत जातो ,ते चिडचिडे होत जातात .बऱ्याच वेळी आपण असं करतो मग लोक काय म्हणतील ,या गोष्टीचा देखील त्यांना राग यायला लागतो . मग हा राग हा अपमान ते मनातच दाबून ठेवतात ,त्याचा परिणाम शरीरावर आणि मनावर होतो. या मुळेच मग पुढे चालून शारीरिक आणि मानसिक विकार उत्पन्न होतात . 

आत्महत्या करायचा विचार 
 काही लोकांना त्यांच्या मनाच्या विरुद्ध काही गोष्टी झाल्या की लगेच आत्महत्येचा विचार मनात येतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मनाविरुद्ध झालेल्या त्यांना सहन होत नाहीत . जीवनात काही परेशानी अली की लगेच निराश होणे ,कि लगेच आत्महत्येचा विचार करणे . 
होमिओपॅथीक औषध जर अशा पेशंट ला दिली तर हळू हळू हे विचार कमी होतात . 

खोटे बोलणे 
 बऱ्याच लोकांना किंवा मुलांना खोटे बोलायची सवय असते .ही सवय सुद्धा या औषधांनी हळू हळू कमी होते . 

संशय 
काही लोकांना प्रत्येक गोष्टीत संशय घेण्याची सवय असते . सगळ्यांकडे संशयाच्या दृष्टीने पाहणे . या सवयीवर सुद्धा या पॅथीत चांगल्या प्रकारची औषधे आहेत . 

रडणे 
 बऱ्याच वेळा खास करून महिला अगदी छोट्या कारणा साठी सुद्धा सहज रडतात . कोणीकाही बोलले की रडायला सुरुवात .,हा एक प्रकारचा मानसिक विकारच आहे . 

ही काही उदाहरणे आपण पहिली अशा बऱ्याचश्या मानसिक विकारांवर होमिओपॅथी मध्ये इलाज आहे . फक्त योग्य वेळी आणि योग्य होमिओपॅथीक  तज्ञांचा सल्ला घेणे व उपचार घेणे गरजेचे आहे . 
 
म्हणतात ना स्वच्छ मन हे निरोगी शरीराचा आरसा आहे . 
   या मानसिक विकारांना स्वतःवर हावी होऊ देऊ नका  आणि स्वस्थ राहा .
   होमिओपॅथी मध्ये आजाराच कारण दूर करून आजार नीट केला जातो . प्रत्येक आजारी व्यक्तीचे औषध हे त्याची शारीरिक व मानसिक अवस्था पाहूनच दिले जाते . योग्य औषधांसाठी तज्ञांचा सल्ला घ्या .

संपर्क
डॉ समता गोर्हे
8657875568

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top