प्राणवायू देणाऱ्या मित्राचा विसर: चिंताजनक बाब
डॉ. निखिल अडसुळे –निसर्ग मित्राकडून आपल्याला आव्हान…
पाहू नको, कृती कर;निसर्गास या,आपलस कर.
आपण आपला इतिहास पाहिला तर कोणे एके काळी भारताच्या एक तृतीयांश क्षेत्रफळावर जंगल होतं, साधारणपणे आठ कोटी हेक्टर. 1951 ते 70 या काळात 34 लाख हेक्टर जंगल रस्ते, रेल्वे अशा प्रगतीच्या कामांमध्ये नष्ट झालं.
वनखात्याचा अहवाल असा सांगतो की दर वर्षी साधारण दीड ते दोन लाख हेक्टर वनक्षेत्र नष्ट होत असावं. पण माधवराव गाडगीळ या शास्त्रज्ञांनी त्यांच्या अहवालात असं सांगितलं की दरवर्षी आठ ते दहा लाख हेक्टर जंगल नष्ट होत आहे. या दोन्ही अहवालामध्ये फार तफावत आहे आणि याचं कारण राजकारण असो की देशाचा विकास पण जंगल नष्ट होणार ही या दोन्ही अहवालांमधली एकत्रित सामाविष्ट गोष्ट आहे.
मग जेवढी झाडं तोडली तेवढीच झाडं पुन्हा आम्ही लावून देऊ असेही बरेच लोक म्हणतात. पण शंभर वर्षाच्या एका झाडाला तोडून त्या जागी दुसरं झाड लावल्या नंतर ते इवलसं रोपटं, शंभर वर्षा च्या झाडाची बरोबरी करू शकेल का?
डेहराडूनच्या माती संशोधन केंद्राचा अभ्यासही असा सांगतो की, भारतात दरवर्षी सहाशे कोटी टन माती वाहून जाते. त्यापैकी 200 कोटी टन माती धरणात जाते, दोनशे कोटी टन माती समुद्रात जाते आणि दोनशे कोटी टन माती इतरत्र पसरते.
www.janvicharnews.com
जंगल वाचवण्यास काय फायदा होईल हे उत्तराखंडमधल्या महिलांना कळालं आणि म्हणूनच चिपको आंदोलन उदयास आलं. सर्व विकास प्रकल्पांमध्ये विकास काय होणार आहे हेच सांगितले जाते परंतु काय हानी होणार आहे हे देखील सांगणे तितकेच गरजेचे आहे असे अभ्यासातून लक्षात आले. पुन्हा एकदा यावर्षी उत्तराखंड मध्ये मोठी ढगफुटी झाली. जंगल तोड केल्यामुळे, सुरुंग लावल्यामुळे आणि तो भूभाग अतिशय ठिसूळ आणि भुसभुशीत केल्यामुळे तिथे वारंवार भूस्खलन होत आहेत. अशाच प्रकारच्या अनेक आपत्तींची पेरणी विकास प्रकल्प मधूनच होत आहे का असा प्रश्न पडतो.
हवामान बदल ही संकल्पना 1988 साली सांगितले गेली. संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने अनेक शास्त्रज्ञ एकत्र आले आणि Intergovernmental Panel on Climate Change (IPCC) ची स्थापना झाली. 1990 मध्ये त्यांनी पहिला अहवाल दिला आणि हवामान बदल हे गोष्ट जगाला कळली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हवामान बदलामध्ये कार्बन उत्सर्जन हेच प्रामुख्याने जबाबदार आहे. कार्बन उत्सर्जन जसं वाढत जाईल त्याच पद्धतीने जगाचे तापमान देखील वाढत जाईल. त्यावेळी त्यांचा अंदाज होता की जगाचे तापमान 0.6 डिग्री सेल्सिअस ने वाढणार आहे. औद्योगिक क्रांतीच्या मानाने सध्या 1.2 ते 1.4 डिग्री सेल्सिअस असणे आपलं तापमान वाढलं आहे.
www.janvicharnews.com
ब्राझीलमधले ॲमेझॉन जंगल हे पृथ्वीचं कापूस मानलं जात होतं, तिथल्या अध्यक्षांनी स्वतःच्या देशाच्या आर्थिक फायद्यासाठी जंगलाला आगी लावल्या आणि त्या उजाड झालेल्या जमिनीवर सोयाबीनची लागवड केली. 2019 पासून जवळपास एक कोटी हेक्टर ॲमेझॉनचे जंगल नष्ट झाले. फक्त पाम तेलाच्या उत्पादनासाठी इंडोनेशियामध्ये अशीच परिस्थिती उद्भवली आणि तिथल्या जमिनीवर असलेल्या हजारो हेक्टर जंगलाला त्याच देशाने आग लावली. सायबेरियातील आग असेल, इंडोनेशियातील आग असेल कंबोडियातील आग असेल या सगळ्या देशांनी जंगलांना आगी लावून जमिनी मिळवल्या. हा प्रगतीचा खरा अर्थ आहे का? यामुळे त्या देशांचा शाश्वत विकास होईल का? असा प्रश्न उद्भवतो.
एका वाक्यात सांगायचं झालं तर_“जगामधील संपत्तीची निर्मिती ही निसर्गाच्या विनाशातून होत आहे.”
बऱ्याच प्रमाणामध्ये उत्सर्जित कार्बन समुद्रात शोषले जातात. याचं कार्बनडाय ऑक्साईडचा पाण्याशी संयोग होऊन कार्बनिक एसिड तयार होतं आणि समुद्रातला पाण्याचं तापमान वाढते. त्यामुळे नको तेव्हा पाऊस पडतो. 2011 पासून फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये सातत्याने मराठा वाड्यात पाऊस पडत आहे. त्यावेळी गारपिट पण होते पीक सुद्धा नष्ट होतात. अरबी समुद्रात चक्रीवादळ वाढत आहेत त्याचाही मुख्य कारण ‘कार्बन समुद्राच्या पाण्यात शोषून घेतले जाणं’ हेच आहे.
www.janvicharnews.com
कॅनडामध्ये 49.6⁰ सेल्सिअस तापमान जाणं, कॅलिफोर्निया मध्ये 54⁰ सेल्सिअस तापमान पाकिस्तान मध्ये 52⁰ सेल्सिअस तापमान होणं या हवामान बदलाच्या पूर्वसूचना आहेत का? आपण आत्ताच सुधारणा करून घेतली पाहिजे नाहीतर आपला ही देश याच प्रमाणे पर्यावरणाच्या कोपाला सामोरे जाईल. 2021 मध्ये जागतिक हवामान परिषद इंग्लंडच्या ग्लास्कोमध्ये होणार आहे. त्या परिषदेचं हेच उद्दिष्ट आहे की 2050 पर्यंत जगाला कार्बन मुक्त करायचे आणि 2030 पर्यंत जगातील कार्बन उत्सर्जन निम्म्यावर आलं पाहिजे.
वारंवार होणारे भूस्खलन याचा अर्थ काय? हा डोंगर म्हातारा झालाय का?
सह्याद्री पर्वतरांगांत बद्दल माधवराव गाडगीळ यांनी आणि कस्तुरी रिंगण यांनी अहवाल दिला त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, खाणी, बांधकाम, खोदकाम, जंगल नष्ट करणं यामुळे सह्याद्रीवर अनेक आपत्ती येणार आहेत. गोव्यामध्ये खाणकाम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. उत्तर गोव्यामध्ये पिसुरलेम या गावी खाणीमुळे पाणी निघून गेलं. नदी आटली, ओढे आटले आणि पाण्यासाठी स्वयंपूर्ण असलेलं गाव, आज पाण्याच्या टँकरवर अवलंबून आहे. हा भयानक बदल अपरिवर्तनीय आहे.
अशा अनेक भयावह घटना सांगता येतील. त्यातील काही घटना अपरिवर्तनीय आहेत म्हणजेच त्या ठिकाणी पुन्हा तसे वातावरण तयार करणे जवळपास अशक्यच आहे. मग जे आपल्या हातात आहे तेच आपल्या पुढच्या पिढीसाठी राखून ठेवाव.
www.janvicharnews.com
आपण हे विचार करायला विसरत आहोत की, दरवर्षी पुराणांची संख्या वाढत आहे. पुरांचे दिवस कालावधी देखील वाढत आहेत. 1980 पर्यंत साधारणपणे दीड दिवस पूर टिकत होता आणि आता साडेतीन ते चार दिवस पूर टिकत आहे. पूर का येतो? पुराचा कालावधी का वाढतो? धरण योग्यप्रकारे आणि योग्य ठिकाणी आहे का या प्रश्नांवर आता पुनर्विचार करण्याची गरज झालेली आहे. महाराष्ट्रातील 75000 कारखान्यांपैकी 38000 कारखाने अति प्रदूषित आहेत. 49 नद्या अतिप्रदूषित आहेत आणि जवळजवळ 34 गावं अति प्रदूषित आहेत. जर आपण येणाऱ्या पिढीला चांगला निसर्ग देऊ शकत नसतो तर या प्रगतीचा फायदा काय?
www.janvicharnews.com
26 डिसेंबर 2004 ला जगाला सुनामीचा तडाखा बसला. जवळजवळ तीन लाख लोक त्यामध्ये दगावले. तमिळनाडूतील मुथूपेठ आणि पिछावरम या गावांमध्ये एकही मृत्यू झालेला नाही. कारण 1999 पासून एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन येथील स्थानिकांना सहभागी करून जवळजवळ पन्नास हजार हेक्टरवर खारफुटी वृक्ष लावली होती. पुढे चालून सुनामीच्या काळामध्ये संरक्षक भिंत बनून याच खारफुटी जंगलांनी त्या गावकऱ्यांचे प्राण वाचवले. निसर्ग वाचवणे मध्ये आणि संगोपन मध्ये जर साथ दिली तर वाईट काळात निसर्ग देखील आपल्यालाच मदत करतो हे याचं उदाहरण होय.
चला एकजूट होऊया, निसर्ग वाचवूया