Home कृषी साक्षरता वाटाणा लागवड मार्गदर्शन

वाटाणा लागवड मार्गदर्शन

0
वाटाणा लागवड मार्गदर्शन

वाटाणा लागवड मार्गदर्शन

सतिश भोसले

www.janvicharnews.com

वाटाणा पिक मार्गदर्शन, #शेतीवर बोलू काही, #एकात्मिकरोगवकिडनियंत्रण, #पाणीव्यवस्थापन, #एकात्मिकअन्नद्रव्य_व्यवस्थापन,

जैविकअजैविकताण_व्यवस्थापन.


नमस्कार शेतकरी बंधूनो,
वाटाणा (मटार, ग्रीन पी, गार्डन पी लॅ. पिसम सॅटिव्हम)
(कुल:- लेग्युमिनोजी, उपकुल:- पॅपिलिऑनेटी) हे एक उपयुक्त कडधान्य आहे. आपल्या आहारात येणारा एक महत्वाचा घटक म्हणजे वाटाणा. वाटाणा हे थंड हवामानातील पीक आहे. वाटण्याची लागवड सर्वत्र मोठ्या प्रमाणात होते. वाटाण्याचे दाणे जेव्हा कोवळे असतात तेव्हा सुद्धा त्या कोवळ्या शेंगा म्हणजेच मटार आपल्या शरीराला पोषक ठरतात. वाटाण्यामध्ये कार्बन, प्रोटिन्स तसेच फॉस्फरस पोटॅशियम हे खनिजे आणि अ, ब, क जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. वाटाणा हे द्विदल वर्गातील पीक असल्यामुळे हवेमधील आणि जमिनीमधील नत्र शोषून घेण्याची क्रिया मुळांवरील गाठी द्वारे होते. यामुळे जमिनीचा कस वाढतो. वाटाणा हे थंड हवामानात वाढणारे पीक असल्याने सरासरी तापमान १o° ते १८° से तापमानात या पिकाची चांगली वाढ होते. कडाक्याची थंडी व धुके यांमुळे पिकावर दुष्परिणाम होतो. फुले येण्याच्या वेळेस उष्ण हवामान असल्यास शेंगांत बी भरत नसल्याने वाटाण्याची प्रत कमी होते. त्यामुळे योग्य वातावरण बघून या पिकाची लागवड करावी.

जमीन व पूर्वमशागत :-
वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी चांगल्या निच-याची ५.५ ते ६.७ सामू असलेली जमीन निवडावी. वाटाणा पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येत असले, तरी हलक्या जमिनीत पीक लवकर तयार होते. हे पीक चांगले उत्पादनशील पीक असल्याने त्यासाठी पूर्वमशागत योग्य रीतीने करून जमीन भुसभुशीत करावी. पेरणीपूर्वी हेक्टरी २५ गाड्या शेणखत व पाणी द्यावे व वाफसा झाल्यावर पेरणी केल्यास उगवण चांगल्या प्रकारे होते.

लागवडीचा हंगाम :-
वाटाणा पिकाची वर्षातून दोन हंगामात लागवड केली जाते. राज्यात हे पीक खरीप हंगामात जून-जुलैमध्ये तसेच रब्बी हंगामात ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये हिवाळ्यात लागवडीयोग्य ठरते. वाटाण्याचे पीक हे एकदल पिकानंतरच घ्यावे. वाटाणा हे पीक वांगी, कांदा, टोमॅटो, बटाटा अशा रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडणा-या पिकांनंतर घेऊ नये.

वाटाण्याचे प्रकार व सुधारित जाती :-
अ) बागायती किंवा भाजीचा वाटाणा (गार्डन पी)
ब) जिरायती किंवा कडधान्याचा वाटाणा (फिल्ड पी)
बागायती वाटाण्याचे दोन गट आहेत :-
1) गोल व गुळगुळीत बी असलेले :- या जातीचा वाटाणा सुकवण्यासाठी म्हणजेच सुकून डाळ किंवा इतर पदार्थांसाठी उपयोग करतात.
2) सुरकुतलेल्या बियांचे प्रकार :- या जातीच्या व पाण्यात साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे वटाणे गोड लागतात. पिठाळपणा कमी असतो. या जातीच्या वाटाण्याचे हिरवे दाणे हवाबंद करून आणि हिरव्या शेंगा बाजारात विकण्यासाठी उपलब्ध असतात. या हिरव्या शेंगांना बाजारात खूप मागणी असते

वाटाण्याच्या पुढील जाती महत्त्वाच्या आहेत:
(१) अल्प मुदतीच्या मऊ बियांच्या जाती : आसौजी, लखनौ बोनिया, अलास्का, अर्ली, सुपर्ब मेटेओर
(२) अल्प मुदतीच्या सुरकुतलेल्या बियांच्या जाती : आरकेल, अर्ली बॅजर, लिट्ल मारवेल, केलवेडान वंडर, अर्ली डिसेंबर
(३) सुरकुतलेल्या बियांची मुख्य हंगामी दीर्घ मुदतीच्या जाती: बोनव्हीला, टी १९, लिंकन, डेल्व्हीचे कमांडो, खापरखेडा, एनपी २९, पर्‌फेक्शन, न्यू लाईन, टॉमस लॅक्स्टन, आल्डरमन, जीसी १४, जीसी १९५
(४) मऊ बियांची मुख्य हंगामी जात : किनौरी
(५) खाण्याच्या शेंगांची जात : सिल्व्हिया

महाराष्ट्रात वाटाण्याच्या पुढील जातींची शिफारस केली आहे : बोनव्हीला, खापरखेडा, ॲर्ली बॅजर, एनपी २९, वाई वाटाणा, सिलेक्शन ८२ व सिलेक्शन ९३.

सुधारित जाती :-
सद्यस्थितीत लागवडीसाठी लवकर येणाऱ्या जातींची निवड करावी. उदा.असौजी, निटीऔर, अर्लीबॅजर, बोनव्हिला, आर्केल, जवाहर – १, फुले प्रिया या जातींची निवड करावी.
आर्केल : या जातीच्या शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असून साधारणपणे ६ ते ७ सेंमी लांबीच्या असतात. झाडांची उंची ३५ ते ४५ सेंमी असून ५० ते ५५ दिवसांनी शेंगा काढणीस तयार होतात.
बोनव्हिला : शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असून शेंगातील दाणे अत्यंत गोड असतात. झाडांची उंची मध्यम असून ४५ दिवसांनी शेंगा काढणीस तयार होतात.
जवाहर – १ : शेंगा फिकट हिरव्या रंगाच्या असून सर्वसाधारणपणे ६ सेंमी पर्यंत लांब असतात. लागवडीपासून ५५ दिवसांत फुलावर येते व ९० दिवसांत शेंगा काढणीस सुरवात होते.

लागवडीचे अंतर व बियाणे :-
वाटाण्याची लागवड ही सपाट जमिनीत करतात किंवा सरी पद्धतीने करतात त्यासाठी दीड ते दोन फूट अंतरावर सरी करून दोन्ही अंगास बिया टोचून लागवड केली जाते. दोन बियातील अंतर पाच ते सात सेंटीमीटर ठेवावे. वाटाणा लागवड करताना सरी-वरंबे किंवा सपाट वाफ्यामध्ये ३० × १५ सेंमी अंतरावर करावी. टोकण पद्धतीने लागवड करण्यासाठी ३० ते ४० किलो प्रति एकर आणि पेरणी पद्धतीसाठी ५० ते ६० किलो प्रति एकरी बियाणे लागते.

बीजप्रक्रिया :-
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास सॉईल पॉवर १o मिली सोबत ट्रायको ५ मिली किंवा काबॅन्डेझीम ३ ते ४ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅमची बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे मुळकुजव्या हा रोग टाळता येईल. त्याचप्रमाणे पेरणीपूर्वी रायझोबियमची (वाटाणा गट) प्रक्रिया केल्यास उत्पादनात वाढ होते.

रासायनिक खते

वाटाणा पिकास जमिनीचा पोत पाहून खत वापरले जाते, त्यासाठी साधारण हेक्टरी १५ ते २० टन शेणखत, २० ते ३० किलो नत्र, ५० ते ६० किलो स्फुरद आणि ५० ते ६० किलो पालाश जमिनीचा पोत पाहून द्यावा. जमिनीची मशागत करत असताना शेणखत योग्य प्रकारे मिसळून द्यावे. त्याचबरोबर संपूर्ण पालाश आणि स्फुरद व अर्धे नत्र, बी पेरण्याचे अगोदर जमिनीत पेरावे किंवा मिसळावे. त्यातून राहिलेले नत्र ज्या वेळी पीक फुलावर येईल त्या वेळी फ्लॉवरबूस्ट सोबत द्यावे.

पाणी व्यवस्थापन :-
कोणत्याही पिकासाठी खतांबरोबर मशागत करून पाण्याचीही खूप आवश्यकता असते पाणी आहे तर जीव आहे त्यासाठी पेरल्यानंतर लगेच पाण्याची भरणी करावी. आपल्या पिकाला पाण्याची आवश्यकता आहे हे ओळखण्यासाठी मध्ये मध्ये मक्याचे ताटे लावावे किंवा दाणे टाकावे. मक्याचे झाड जमिनीतील आर्द्रता शोषते त्यामुळे पाणी कमी पडल्यास ते सुकायला लागते. यावरून आपल्याला पिकाला पाण्याची गरज आहे हे वेळीच ओळखता येते. लागवड किंवा पेरणी केल्यावर लगेच पाणी द्यावे, त्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. फुलधारणा अवस्था व फळधारणा अवस्थेवेळी पिकाला पाण्याची गरज असते, त्यावेळी पाण्याचे योग्य व्यवस्थापन गरजेचे आहे.

किड व रोगांचे व्यवस्थापन :-
वाढत्या थंडीच्या काळात पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव होण्यास वातावरण अनुकूल असते त्या दृष्टीने रोग व किडींचे नियंत्रणाचे नियोजन करावे.

www.janvicharnews.com


किड नियंत्रण :-
वाटाण्याच्या पिकावर मावा आणि शेंगेतील अळी या कीटकांचा उपद्रव जास्त प्रमाणात आढळतो.
मावा, तुडतुडे, फुलकिडे :- या किडीच्या नियंत्रणासाठी गार्डनिम २० मिली किंवा निंबोळी अर्क ५ टक्के किंवा डायमेथोएट ३० टक्के १० मिली. किंवा इमिडाक्लोप्रिड ४ मिली १० लिटर पाणी याप्रमाणे फवारावे. पेरणीनंतर किमान तीन आठवड्यांनी फवारणी करायला पाहिजे, आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.
शेंगा पोखरणारी अळी :- या किडीचे वेळेवर नियंत्रण न केल्यास खूप नुकसान होते. यासाठी निमकरंज २० मिली किंवा निंबोळी अर्क ५ टक्के किंवा क्विनालफॉस २५ टक्के १५ मिली. किंवा डेलटामेश्रीन ५ मिलि. किंवा एच.एन.पी.व्ही १० मिली. १० लिटर पाण्यातून फवारावे. आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.

रोग नियंत्रण :-
भुरी :- हा रोग एरिसायफे पॉलिगोनाय या बुरशीमुळे पीक फुलोऱ्यावर असताना उद्‌भवतो आणि त्यामुळे पिकावर अनिष्ट परिणाम होतो. रोगामुळे पिकाच्या खोडे, पाने, इ. भागांवर राखेप्रमाणे पांढरी कवकाची वाढ आढळते. शेंगा पावसाळी, ढगाळ वातावरणामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. भुरी रोगामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते या रोगामुळे झाडाच्या फांद्या व पानांच्या दोन्ही बाजूने पांढरा फटक पावडर सारखा बुरशी जंतूंचा थर बसतो आणि थोड्याच दिवसात झाडाला पुर्ण व्यापून टाकतो त्यामुळे झाडाची वाढ खुंटते व कमकुवत होते. फळधारणा बरोबर होत नाही. या रोगाच्या नियंत्रणासाठी फंगीनिल २० मिली किंवा पाण्यात मिसळणारे गंधक ८o टक्के २५ ग्रॅम किंवा डिनोकॅप ४० डब्लूपी १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा गंधकाची भुकटी ३०० मेश प्रति एकरी ८ किलो या प्रमाणात धुरळावी. त्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने फवारणी किंवा धुरळणी करावी. रोगास प्रतिबंधक अशा जातींचा वापर करावा.

मर :- फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम, प्रभेद पिसाय बुरशीमुळे हा रोग होतो. यामुळे रोपे पिवळी पडून मरून जातात. रोगप्रसार जमिनीमधून होतो. पिकांची फेरपालट, रोगप्रतिकारक जातींची लागवड हे यावरील उपाय आहेत. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास ५ मिली ट्रायको किंवा काबॅन्डेझीम ३ ते ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच लागवडीच्या वेळी प्रति हेक्टर ५ ते ६ किलो ट्रायकोडर्मा पावडर शेणखतात मिसळून जमिनीत मिसळावे.

www.janvicharnews.com

काढणी आणि उत्पादन :-
वाटणा शेंगाचा गडद हिरवा रंग फिकट रंगाच्या दिसताच काढणीस सुरवात करावी व काढणी योग्य शेंगा नियमित तोडाव्यात. काढणी ३ ते ४ तोड्यात पूर्ण होते. तोडणीचा हंगाम ३ ते ४ आठवडे चालतो. आठवड्यातून दोनदा तोडणी करणे सोईस्कर ठरते. लवकर येणा-या जातीचे हिरव्या शेंगाचे हेक्टरी उत्पादन २५ ते ३५ क्विंटल तर मध्यम कालावधीत तयार होणा-या जातीचे उत्पादन ६५ ते ७५ क्विंटलपर्यंत आणि उशिरा येणा-या जातीचे ८५ ते ११o क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. अशा अतिशय सोप्या वाटाणा लागवड पद्धतीने दर्जेदार उत्पन्न घेता येते. योग्य व्यवस्थापन केले गेले आणि उत्तम निगा राखली गेली तर ही वाटाणा लागवड शेतकरी बांधवांना भरघोस उत्पन्न देते.

एकात्मिक अन्नद्रव्ये, पाणी व रोग-किड व्यवस्थापन मार्गदर्शन…पिकांच्या सर्वांगीण विकासासाठी, भरघोस फुलधारणा, फळधारणा, फुगवण, चकाकी आणि संपुर्ण रोग व कीड संरक्षणासाठी देवअमृत अॅग्रोटेकची दर्जेदार व विश्वसनीय उत्पादने एकदा अवश्य वापरून पहा…
…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!✍

🙏🙏🙏🙏🙏 शेतकरी हितार्थ 🙏🙏🙏🙏🙏

🦚🌹🦚 !! अन्नदाता सुखी भव: !!🦚🌹🦚
काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो
🙏विचार बदला! जीवन बदलेल!!🙏

“Agriculture is My Love, Passion, Culture & Life.”
Mr.SATISH BHOSALE
Founder & CEO,
KRUSHIWALA FARMER’S GROUP
(General Manager)
DevAmrut Agrotech Pvt Ltd.
Mob No.: 09762064141
FB Link: https://www.facebook.com/sp.bhosale2151

www.janvicharnews.com


🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳