Home कृषी साक्षरता !!@!! टोमॅटो पिक मार्गदर्शन !!@!!

!!@!! टोमॅटो पिक मार्गदर्शन !!@!!

0
!!@!! टोमॅटो पिक मार्गदर्शन !!@!!

टोमॅटो पिक मार्गदर्शन
श्री.सतिश भोसले @09762064141.

नमस्कार शेतकरी बंधूनो,

सध्या टोमॅटो पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता असल्याची लक्षणे दिसू लागली आहेत, टोमॅटो पिकांमध्ये वातावरणातील बदल लक्षात घेऊन टोमॅटो पिकांचे संरक्षण करत असताना एकात्मिक रोग व किड व्यवस्थापनाबरोबरच एकात्मिक अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन योग्य रित्या करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने टोमॅटो नोंदवहीचा वापर केल्यास आपणांस बर्याच गोष्टी समजण्यास मदत होईल.

➡️टोमॅटो पिकांतील या कालावधीत फवारणीमध्ये :-

👉 पहिली फवारणी:- निमकरंज किंवा निमगार्ड 1.25 मिली अधिक नेटिव्हो (Tebuconazole + Trifloxystrobin 75 WG(50% +25% w/w)) 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्र घेऊन फवारणी घ्यावी.

👉 दुसरी फवारणी:- न्युट्रिमिक्स 2 ग्रॅम + फ्लॉवरबूस्ट 2 मिली + 00:60:20 = 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्र घेऊन फवारणी घ्यावी.

वरिल फवारणी सर्व रसशोषक किडींच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. तसेच पानांवर येणारी हानिकारक बुरशीचा नायनाट होतो. करपा, पानांवरील काळे ठीपके, मिलीड्यू यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रणासाठी व रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी करण्यासाठी मदत होते. पानांची रुंदी वाढून कार्यक्षमता वाढते. फळधारणेस व फळ पोषणांमध्ये मदत होते. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरुन निघते. त्यामूळे टोमॅटो पिकांचे निरोगी पोषण होऊन उत्पन्नात वाढ होते.

➡️टोमॅटो पिकांतील 60 ते 70 दिवसाच्या कालावधीत आळवणी घेत असताना त्यात 00:52:34 = 3 किलो अधिक प्राईम झाईम 1 लिटर अधिक न्युट्रीमिक्स 500 ग्रॅम किंवा 00:60:20 = 3 किलो किंवा 00:42:47:7fe = 3 किलो अधिक मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो किंवा 13:00:45 = 4 किलो + कॅल्शियम नायट्रेट विथ बोरॉन = 500 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे कोणतेही एक आलटुन पलटून आळवणी घ्यावी. यामुळे टोमॅटो पिकांची संतुलित वाढ होते, पाने हिरवीगार होतात, फुटव्यांची संख्या वाढते. दोन पानांमधील व दोन फुटव्यांमधील अंतर मर्यादित राहते. फुलांची व फळांची संख्या वाढते. फळांचे पोषण व्यवस्थित होते. मॅग्नेशियम वनस्पतींमध्ये फॉस्फरस वाहक म्हणून कार्य करते. पेशी विभाजन आणि प्रथिने निर्मितीसाठी हे आवश्यक आहे. फुलगळ होत नाही, फळाला डाग पडू देत नाही, एकंदरीत फळांचा विकास चांगला होतो फळे चांगली पोसतात. उत्पन्नात वाढ होते.

शेतकऱ्यांचे नाव: श्री. अभिषेक जवळकर साहेब.

गाव : म्हातोबा आळंदी, ता: हवेली, जि: पुणे.

पिक व जात : टोमॅटो पिक (आर्यमान).

लागवड दिवस: लागवडीपासुन 62 दिवसांचा प्लॉट.

एकुण क्षेत्र : 1 एकर.

एकात्मिक अन्नद्रव्ये, पाणी व रोग-किड व्यवस्थापन मार्गदर्शन…टोमॅटो पिकांच्या संतुलित विकासासाठी, भरघोस फुलधारणा, फळधारणा, फुगवण, चकाकी आणि संपुर्ण रोग व कीड संरक्षणासाठी देवअमृत अॅग्रोटेकची दर्जेदार व विश्वसनीय उत्पादने एकदा अवश्य वापरून पहा…

…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!✍

🙏🙏🙏🙏🙏 शेतकरी हितार्थ 🙏🙏🙏🙏🙏

—-

🦚🌹🦚 !! अन्नदाता सुखी भव: !!🦚🌹🦚

काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो

🙏विचार बदला! जीवन बदलेल!!🙏

“Agriculture is My Love, Passion, Culture & Life.”

Mr.SATISH BHOSALE

Founder & CEO,

KRUSHIWALA FARMER’S GROUP

(General Manager)

DevAmrut Agrotech Pvt Ltd.

Mob No.: 09762064141

FB Link: https://www.facebook.com/sp.bhosale2151

🌳
🌳
🌳
🌳
🌳
🌳
🌳
🌳
🌳
🌳
🌳
🌳
🌳
🌳
🌳
🌳