सावधान! व्हॉट्सअॅप वापरताय तर ‘या’ गोष्टीचं पालन करा, अन्यथा होऊ शकते कारवाई…
www.janvicharnews.com
दैनंदिन जीवनात इंटरनेटच्या वापरामुळे आपले अनेक काम सोपे होतात. आपल्या आजूबाजूच्या अनेक गोष्टींबद्दल आपण इंटरनेट वर सर्च करून त्याविषयीची माहिती मिळवू शकतो. तसेच इंटरनेटमुळे आपण लोकांच्या संपर्कात राहू शकतो. सध्या इंटरनेटवर अनेक मेसेजिंग अॅप उपलब्ध आहेत. मात्र, हे अॅप जितके सोयीचे आहेत. तितकेच घातक देखील ठरू शकतात.
www.janvicharnews.com
व्हॉट्सअॅप हे आजच्या घडीचं एक अतिशय लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. जगात हे अॅप वापरणाऱ्यांची संख्या देखील भरपूर आहे. मात्र, व्हॉट्सअॅपचा वापर करताना युजर्स त्याच्या पॉलिसीकडे नीटसं लक्ष देत नाहीत आणि नंतर युजर्सला तुरुंगात जाण्याची वेळ येते.
व्हॉट्सअॅप वापरताना तुम्हाला त्याच्या पॉलिसीचं पालन करणं महत्वाचं आहे. जर तुम्ही व्हाट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन असाल तर तुम्हाला अधिक सावध राहावं लागणार आहे. एवढंच नाही तर तुमच्या ग्रुप मधील ग्रुप मेंबर्सच्या पोस्टकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे.
www.janvicharnews.com
व्हॉट्सअॅप वापरताना हिंसा पसरवणारे मेसेजेस येत असतील तर ते मेसेज किंवा पोस्ट शेअर करणं टाळा अन्यथा तुमचं अकाउंट ब्लॉक होऊ शकतं. कंपनीच्या पॉलिसीचं पालन न करणाऱ्या लाखो अकाउंट्सवर कंपनी बंदी घालते. बंदी घातल्यानंतर ते अकाउंट रिकव्हर करण्यासाठी युजर्सना स्पष्टीकरण द्यावं लागतं. या व्यतिरिक्त लोकांच्या धार्मिक भावना दुखवणार्या पोस्ट, मेसेज देखील शेअर केल्या जातात. यामुळे सुद्धा तुमचा अकॉउंट ब्लॉक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप किंवा अन्य कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटर्मचा वापर करताना काळजी घेणं गरजेचं आहे.