शेतीला पाणी नाही, शिक्षणाचा घसरलेला दर्जा , कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, युवकांना रोजगार उपलब्ध नाही, सार्वजनिक शासकीय इमारती अडगळीत पडल्या सारख्या अवस्थेत,
धाराशिवचे आधार कार्ड कोण होणार?www.janvicharnews.com
धाराशिव- विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे तीन महत्वाच्या बाबी होत्या त्या म्हणजे हिदुत्वाची प्रतारणा होते आहे, शिवसेना आमदारांना पुरेसा निधी मिळत नाही, महाविकास आघाडी सरकार मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसैनिकाकडे दुर्लक्ष होते आहे. या तीन गोष्टीवरून शिवसेनेतील ४० आणि अपक्ष १० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करून भाजपा महाशक्तीच्या मदतीने नवीन सरकार बनवले. तब्बल ४० दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला खातेवाटप हि झाले शिंदे गटातील आमदारामध्ये कमी जास्त प्रमाणात नाराजीचा सूर हि दिसला परंतु अल्पावधीतच धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या आमदार प्रा डॉ तानाजी सावंत यांना मात्र त्यांच्या मनासारखे खाते मिळाले .
www.janvicharnews.com
दुरावस्थेचे माहेरघर
मंत्री सावंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयापैकी मानले जातात कारण शिंदे गटाच्या बंडाची पार्श्वभूमी ते वेगवेगळ्या व्यासपीठावरून सातत्याने मांडत होते.सत्तानाट्यात हि मंत्री सावंत यांची भूमिका शिंदे गटाला बळ देणारी होती हे नाकारून चालणार नाही यामुळेच कि काय! मंत्री सावंत यांना जे हवे ते खाते मिळू शकले असा कयास लावला जातो. मंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोबत अतिरिक्त मृद व जलसंधारण अशा आवडीच्या खात्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहेत. आता यापुढे ना हिंदुत्व धोक्यात येईल ना निधीची कमतरता भासेल..आता फक्त धाराशिव जिल्ह्यातील कोलमडलेली आरोग्य व्यवस्था पुनर्जीवित कशी होईल? जिल्ह्यातील युवकांना जिल्ह्यातच रोजगार कसा उपलब्ध करता येईल? आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी वर्षभर पाणी मिळेल अशी व्यवस्था! केली तरच धाराशिव चे नाव मागास जिल्ह्याच्या यादीतून बाहेर पडेल!
जिल्हा किती मागास आहे हे रोड वरून जातानाच समजते…उन्हाळा म्हणजे राजस्थान वाळवंट
www.janvicharnews.com
मंत्री सावंत यांची शिवजलक्रांतीचे प्रणेते तसेच राजकारणातील दानसूर व्यक्तिमत्व म्हणून जनमानसात ओळख आहे तीच ओळख अधिकाधिक विस्तारित होऊन धाराशिव जिल्ह्यातील अन्य सर्व रखडलेल्या पायाभूत कामांना गती मिळेल हाच आशावाद आहे. मागास धाराशिव जिल्हाचे आजी माजी पालकमंत्री अशी आपली ओळख देखील पुसली जावी इतकीच माफक अपेक्षा. सत्तेच्या सारीपाटात केलेल्या संघर्षा मागची भूमिका सार्थ ठरवण्याची वेळ आणि संधी देखील आलेली आहे त्याचा विसर न पडता धाराशिव जिल्ह्याला विकासाचे मॉडेल बनवले तरच राजकीय विश्वासहार्यता जनमानसात रुजली जाईल..