विजय पाटील
www.janvicharnews.com
शतावरी (संस्कृतमध्ये नारायणी; शास्त्रीय नाव ॲस्पॅरेगस रेसिमोसस) ही एक पर्णहीन, काटेरी, बहुवार्षिक आरोहिणी वेल आहे. खोडावर वाढणाऱ्या लांब व मोठय़ा फांद्यांना अनेक पेर असतात. या प्रत्येक पेरावर लहान, हिरव्या, एकाआड एक उपफांद्या असतात. या फांद्यांना ‘पर्णकांडे’ म्हणतात. या पर्णकांड्या पानांप्रमाणे भासतात. ही ‘पाने’ बारीक असून सुरूच्या पानासारखी दिसतात. फांद्यांवर साधारणपणे १ सें.मी. लांबीचे बाकदार काटे असून ते खालच्या बाजूस वाकलेले असताता. ही ‘पाने’ २ ते ६ च्या संख्येच्या गुच्छात उगवणारी २ ते ३ सें.मी. पर्यंत लांब असतात. लांब फांद्यांवर पेरावर टोकदार, वाकडे काटे असतात. शतावरी आधारास गुंडाळून घेते व वर चढते आणि अनेक फांद्या तयार होऊन लहान काटेरी झुडूप तयार होते.
www.janvicharnews.com
शतावरीची फुले पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाची असून गुच्छात येतात. फळ वाटाण्याच्या आकारमानाचे असून त्यामध्ये एक किंवा दोन मिरीएवढ्या बिया असतात. झाडाची मुळे जाड, लांबट गोल असून दोन्ही टोकाकडे निमुळती असतात. यांनाच कंद असे म्हणतात. कंद पांढरे असतात व ते एका झाडाला १०० पर्यंत असू शकतात. यामुळेच या वनस्पतीला शतावरी असे नांव पडले आहे. शतावरीची मुळे जमिनीखाली बुंध्याजवळ झुपक्याने वाढतात. एका वेलीस अनेक मुळ्या फुटतात साधारणतः १०० मुळ्या एकावेळी फुटल्यामुळे तिला शतमुळा असे नाव पडले आहे. मुळांच्या वर पातळ करडय़ा रंगाचा पापुद्रा असतो, तसेच मुळाचा मधला भाग पिवळसर रंगाचा आणि टणक असतो. मुळांचा औषधात वापर करताना हा भाग काढून टाकावा लागतो. शतावरी मधुर रसाची असते .
www.janvicharnews.com
शतावरीला शास्त्रीय परिभाषेत Asparagus racemosus असे म्हणतात. ही वनस्पती Liliaceae या कुटुंबातील आहे. शतावरी ही मूळची भारतीय असून उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात समुद्रसपाटीपासून ४००० फूट उंचीपर्यत सर्व देशभर वाढताना दिसते. भारतात सह्याद्री डोंगररांगांत, सातपुडा पर्वत रांगांत व कोकणात शतावरीच्या वेली खडकाळ जमिनीवर, डोंगर उतारावर तसेच जंगलातही आढळतात. शोभेचे झाड म्हणून शतावरी घरोघरी लावलेली दिसते.
www.janvicharnews.com
आपल्याकडे शतावरीचा आणखी एक प्रकार आहे. त्याला भाजीची शतावरी असे म्हणतात. तिचे शास्त्रीय नाव Asparagus officinalis असे आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया, फ्रान्समधील मिलिल फोर्ट, चीनमधील तैवान, जपान वगैरे देशात ही वनस्पती ॲस्परेगसची भाजी म्हणून खाल्ली जाते. ॲस्परेगसची लागवड पूर्वीपासून काश्मीर, भूतान या थंड प्रदेशात होत आली आहे. या भाजीचे कोवळे कोंब चवदार, आरोग्यवर्धक तर आहेतच याशिवाय त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए व सी, पोटॅशियम, रिबोफ्लेव्हिन व थायमिन ही औषधी तत्त्वे आहेत. या कोंबांपासून चविष्ट असे सूप तयार केले जाते. आपल्याकडे मेरी वॉशिंग्टन ह्या जातीच्या ॲस्परेगसची शिफारस केली जाते.
महाराष्ट्रातील काही भागात शतावरीला ‘ससूर/सुसर मुळी’ असेही म्हणतात. व याची करून भाजी करून खाल्ली जाते. साधारणत: राना-वनांत वा शेतांत मृग नक्षत्रातील पहिल्या काही पावसानंतर ही वनस्पती जमिनीतून वर निघते. आणि कोवळे कोवळे कोंब खूडून आणून याची भाजी बनविली जाते.एक रानभाजी म्हणून शेतकरी बांधव आवडीने ही भाजी खातात.
www.janvicharnews.com
याची भाजी चविष्ट, रूचकर, आरोग्यास पोषक, जीवनसत्त्व व खनिजद्रव्ययुक्त असते.शतावरीच्या मुळ्या आणि अंकुर या भागांपासून औषधी रसायने मिळवतात. शतावरीची चव गोड आणि कडू असते.ती कफ आणि पित्त कमी करते.शतावरीपासून शतावरी घृत, विष्णू तेल, शतावरी कल्प तसेच प्रमेह मिशतेल तयार केले जातात.शतावरी स्नायूंची शक्ती वाढवण्यासाठी वापरली जाते.शतावरीचे नारायण तेल हे अर्धांगवायू व संधिवातासाठी उपयुक्त आहे. शतावरीच्या कंदामध्ये सॅपोनिन, ग्लायकोसाइड्स, फॉस्फरस, रिबोफ्लेव्हिन, थायमाईन, पोटॅशियम, कॅल्शियम व इतरही रासायनिक द्रव्ये आहेत. कंदाचा उपयोग पित्तप्रदर, ज्वर, धातुवृद्धी, मुतखडा, अपस्मार व रक्तशुद्धीसाठी केला जातो. कंदाचा उपयोग जनावरांमध्ये विशेषतः गायी, म्हशींमध्ये जास्त दूध मिळण्यासाठी केला जातो.शतावरी कल्प हा शतावरीच्या कंदापासून बनविला जातो. तसचे शतावरीपासून तयार केलेले नारायण तेल अर्धांगवायू व संधिवातावर गुणकारी आहे.तसेच ही स्मृतिवर्धक कार्य करते.मासिक पाळीत अंगावरून खूप स्राव जाणे ही, नव्याने पाळी येणाऱ्या तरुण मुली व पाळी जाण्याच्या मेनोपॉझच्या काळात या तीनही तक्रारींमध्ये स्त्रियांना शतावरी वनस्पतीची मदत होते. स्त्रियांच्या सुलभ प्रसूतीसाठी हिचा वापर केला जातो
www.janvicharnews.com
शतावरीची शेती
शतावरीची लागवड केल्यानंतर ती सतत १४-१५ वर्षे जमिनीत टिकून राहते व बागायती असल्याने उत्पन्न येणे चालू राहते. लागवडीनंतर एका वर्षाने कोंब तयार होतात. भारतातील सर्व फार्मसी शतावरीच्या मुळ्या विकत घेतात. भारताबाहेरही त्यांना मागणी असते. अॅलोपथी, आयुर्वेद, होमिओपॅथी या तिन्ही औषधशास्त्रांत शतावरीच्या मुळ्या वापरतात.
शतावरी चे प्रकार
1.पांढरी शतावरी
2.पिवळी नेपाळी शतावरी
1पांढरी शतावरी…
शेतात ही वनस्पती जास्त पिकते आणी याची काढणी सुलभ आहे काढणी करून मशीन मधून सोलून वाळवून लगेच विक्री केली जाते याचे उत्पन्न जास्त निघते म्हणून याची किंमत कमी असते आणी गुणाधर्म कमी असते..ही पंढरी शतावरी फक्त ताकत वाढीसाठी वापर करतात..
www.janvicharnews.com
2.पिवळी नेपाळी शतावरी …
याचे उत्पादन कमी असते .याची काढणी खूप कष्ट दायक असते ही वनस्पती काढणी जेसीबी च्या सहाय्याने करून त्याचे गड्डे गोळा करून ते गड्डे फोडून मूळे वेगवेगळे करावे लागते.प्रत्येक मुळी ला कतरीने ना लागणारी मुळी कट करून घ्यावे लागते.चार वेळा पाण्याने धुवून घ्यावे लागते.त्यानंतर मोट्या पातेल्यामधून शिजवून अग्नी संस्कार करावे लागते. मग प्रत्येक मुळी सोलून घ्यावे लागतात. सोलून मग उन्हाळ्यातील कडक उन्हात वाळवून घ्यावे लागते.8 किलो ओली मुळी पासून 1 किलो वाळलेली सुकी मुळी तयार होते.एक किलो सुकी मुळी पासून 750 ग्राम पावडर तयार होते.
शतावरी कशी वापरावी?
अशा प्रकारे शतावरीचे सेवन केले जाते.
डिकोक्शन किंवा उकळून – 50-100 मि.ली.
रस – 10-20 मिली.
शतावरी पावडर – 3-6 ग्रॅम.
शतावरीचा पारंपरिक वापर
शतावरी हर्बल पावडर- ही दररोज 3 ते 10 ग्रॅम, 1/2 ते 2 चमचे दिवसभरात दोनदा दुधात मिसळून प्या. किंवा स्त्री रोग तज्ञ, आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.
शतावरी ला आयुर्वेदामध्ये राणी म्हणून संबोधले जाते. आणी शतावरी ला महिलांची मैत्रीण म्हणतात.
www.janvicharnews.com
शतावरीचे आरोग्यदायी फायदे –
ही शतावरी महिलांचे सर्व आजार कमी करतात जसे की मासिक पाळीचे सर्व आजार
सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले,देशी 🐑गाईचे गोमूत्र आणि शेणखत वापरून तयार झालेले ,आयुर्वेदातील अमृत म्हणून ओळख असलेली शतावरी मुळी
पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले ,कोणतेही घातक केमिकल न वापरता , व कोणतीही भेसळ नसलेले एक अस्सल शतावरी आपल्या कुटुंबातील सगळ्यांना त्यांच्या निरोगी शरीरासाठी उपयुक्त आहे
पावडर करून रोज दुधातून खा आणि आपले शरीर निरोगी ठेवा
शतावरी मुळीचे पावडर करून रोज दुधातून सेवन केल्यास, अचानक येणारा मृत्यू येणार नाही
हार्ट अटॅक सारखे आजार उद्भवणार नाहीत,आपले शरीर बलवान होईल,
महिलांच्या सर्व आजारासाठी जसे की मासिक पाळी प्रॉब्लेम ,रक्त शुद्ध होण्यासाठी, शरीरातील कॅल्शियम भरून काढण्यासाठी,प्रजनन क्षमता वाढीसाठी
व्यसनी लोकांना सशक्त करणारे ,लहान मुलांना टॉनिक म्हणून व त्यांची शारीरिक बौद्धिक विकास करणारे, वयस्कर व्यक्ती ना गुढघे दुःखी ,कंबर दुखी,त्यांची अशक्त पना घालवणारे
रोज काम करणारे पुरुष मंडळींना फ्रेश ठेऊन कामात उत्साह वाढवणारे,सर्व प्रकारच्या लैंगिक समस्या वर उपयुक्त असे एकमेव औषध म्हणजे शतावरी
या शतावरी मुळी चा रोज वापर करा व आपले आयुष्य निरोगी ठेवा व आयुष्य वाढवा.
शतावरीमध्ये एंटीऑक्सिडेंट घटक असल्यामुळे ते एंटी एजिंगचं काम करते. कमी वयात चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्यापासून संरक्षण होते. शतावरीमध्ये असलेल्या क्लिंजिंगमुळे तुम्ही चेहरा, हात-पाय स्वच्छ करण्यासाठी करू शकतात.
तुम्ही मुरुमांनी त्रस्त असाल तर शतावरीच्या मुळांची पेस्ट चेहऱ्यावर लावा. मुरुम नाहिसे होऊन चेहऱ्यावर ग्लो येईल. शतावरी पावडर दूधात मिसळून त्याचा लेप चेहऱ्यावर लावावा. शतावरीमध्ये असलेल्या एंटीऑक्सिडेंट ग्लूटाथियोन नामक घटकामुळे चेहऱ्यावर मुरुम पुन्हा येत नाहीत.
तुमच्या शरीरावर फोड, पुटकळ्या, घामोळ्या झाल्या आहेत. किंवा त्यांच्या जखमी झाल्या असतील त्यावर तुम्ही शतावरीचा वापर करू शकतात. जखम लवकर भरते. विटॅमिन ई मुळे चेहऱ्यावरील काळे दाग दूर होऊन ग्लो येतो. त्वचेवर उन्हाचा विपरित परिणाम होऊ देत नाही. ओठ काळे पडले असतील तर शतावरी पावडर आणि मध यांची पेस्ट ओठांवर लावावी.
शतावरीचे केसांसाठी देखील अनेक फायदे आहेत. शतावरी पावडर लावल्यानं केस मजबूत होतात. तसेच त्यांची वाढ देखील उत्तम होते. केस आणखी दाट करण्यासाठी शतावरी आणि अश्वगंधा पाउडर दूधात मिसळून सेवन करावी. केस चमकदार होतात. कोंडा देखील दूर होतो.
सावधान!शतावरीचे दुष्परिणामही आहेत…
अस्पॅरॅगसची अलर्जी असणाऱ्या लोकांना शतावरीचे सेवन केल्याने अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे अशा लोकांनी शतावरीचे सेवन करणे टाळावे. तसेच हृदयाचे आणि मूत्रपिंडाचे विकार असणाऱ्या लोकांचा अपवाद वगळता शतावरी सर्वांसाठी सुरक्षित मानली जाते. काही लोकांचे शतावरीचे सेवन केल्याने वजन वाढल्याचे लक्षात आले आहे.
www.janvicharnews.com