भारताच्या विजयाने सोशल मीडियात हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू खेळीची आणि शरद पवारांच्या क्रिकेट प्रेमाचीच चर्चा…

मुंबई : भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने हा सामना पाच विकेटने जिंकला. आशिया चषक स्पर्धेची भारताने शानदार सुरुवात केली आहे. मागच्या वर्षी टी 20 वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत याच मैदानात टीम इंडियाचा पाकिस्तानने पराभव केला होता. त्या पराभवाची आज भारतीय संघाने त्याचा वचपा काढला. काल मैदानात ऑलराऊंडर हार्दिक पंड्या याने आपली उत्कृष्ट खेळ दाखवत पाकला अस्मान दाखवले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेट वरील प्रेमाची साक्ष दिली असेच म्हणावे लागेल.

मॅच जिंकल्यानंतर सगळीकडे हार्दिक आणि त्याच्या सिक्सची सर्वत्र चर्चा झाली. पण याचवेळी सोशल मीडियावर एक व्हीडओने प्रचंड व्हायरल घातला. हा व्हीडिओ होता शरद पवारांचा. मॅच जिंकता क्षणी शरद पवार यांनी आपला हात उंचावत विजयी साईन दाखवली. मॅच संपता क्षणी अनेकांच्या व्हॉट्सअप स्टेटसला हा व्हीडिओ ठेवला होता. त्याचबरोबर फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवरही हा व्हीडिओ सर्वत्र पाहायला मिळाला. त्यांचा हा व्हीडिओ सध्या जोरदार चर्चेत आहे. अवघ्या 11 सेकंदाचा व्हीडिओ अनेकांची मनं जिंकतोय. तसेच “जिंदादिल क्रिकेट-देशप्रेमी …” म्हणत अनेकांनी हा व्हीडिओ सर्व सोशल मिडीयावर शेअर केला.

हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात ऑलराऊंडर हार्दिक पंड्याने षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अपेक्षेप्रमाणे भारत पाकिस्तान सामना रंगतदार झाला. शेवटच्या षटकापर्यंत भारतीय क्रिकेटप्रेमी टेन्शनमध्ये होते. अखेरीस भारतीय संघाने हा सामना ५ विकेट्स आणि २ चेंडू राखून जिंकला. हार्दिक पांड्याने षटकार ठोकत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून जडेजाने ३५ धावांची दमदार खेळी साकारली, तर हार्दिकने नाबाद ३३ धावां सह पाकचे तीन खेळाडूना तंबूत पाठवले या अष्टपैलू खेळीने पाकला धूळ चारली…

Scroll to Top