www.janvicharnews.com
महाराष्ट्रात घरोघरी लाडक्या गणेशाच आगमन झालं आहे. सर्वसामान्यांपासून, राजकारणी ते सिनेअभिनेत्यांनी आपल्या घरी गणरायाची स्थापना केलेली आहे. गणेशोत्सव म्हणजे आनंदाचा ऐक्याचा, उत्सव. सर्वांनी एकत्र येवून एकमेकांच्या घरी दर्शनास भेट देवून आनंदाने हा उत्सव साजरा केला जातो. राज्यातील राजकीय नेते गणेशोत्सवात अगदी मग्न झालेले दिसत आहेत. राज्य सरकारकडून गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांची, उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. राजकीय नेते एकमेकांच्या घरी गणरायाच्या दर्शनाला जात भेटीगाठी घेताना दिसत आहे. यावर्षी केंद्र स्थानी दिसतोय तो मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरच्या गणेशोत्सवाची.
www.janvicharnews.com
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज ठाकरे यांची निवास्थानी भेट देत गणरायाचं दर्शन घेतलं. या शिंदे-ठाकरे भेटी नंतर राज्यातील राजकीय चर्चांना उधाण तर येणारच. उद्धव ठाकरेंचा हात सोडल्यानंतर राज ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टाळी देणार का अशी चर्चा होताना हि दिसली.काही दिवसांपूर्वीचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती तर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर राज्यात काही नवी समीकरण बघायला मिळतील अशी शक्यता नाकारता येणार नाही. तसेच काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें गेले. बाळासाहेबांच्या तालिमीत तयार झालेल्या या दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. या सर्व राजकीय नेत्यांच्या भेटीत गणेशोत्सव कसा साजरा करावा? उत्सवाचे महत्व काय? यावर निश्चितच चर्चा झाली नसावी कारण 24 तास राजकीय कुरघोड्याच्या वर्तुळात राहणारे नेते बप्पाच्या निमित्ताने अध्यात्मिक तसेच महाराष्ट्र सर्वसमावेशक हिताची चर्चा करतील अशी अपेक्षा करणे फोल ठरेल.
www.janvicharnews.com
आशिष कुलकर्णींच्या घरी कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंही राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. देशाचे गृहमंत्री 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार असुन या दौऱ्या दरम्यान ते राज ठाकरेंची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. या भेटीत मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा होणार नाही असे म्हणणे 24 राजकीय मोडवर असणारे अमित शहा केवळ राज ठाकरे यांच्या घरातील गणेशाच्या दर्शनास येणार आहेत असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. गणरायाच्या निमित्ताने हेतुपूर्वक भेटीगाठी घडवून आणणाऱ्या राजकीय नेत्यांच्या ओंजळीत महापालिका निवडणूक विजयाचा गुलाल येईल का हे पाहणे औचित्याचे ठरेल