www.janvicharnews.com
भारतीय नागरिक बांधवांनो,
देशात मागच्या फेब्रुवारी महिन्यापासून हिजाब वरून धार्मिक वाद सुरू करण्यात आला आहे.
मला असे वाटते की,
हा वाद ब्राह्मण्यवाद्यांकडून
जाणीवपूर्वक उकरून काढण्यात आला आहे. कारण जातीयवादी,धर्मांध, विषमतावादी,वंशश्रेष्ठत्व, वर्णश्रेष्ठत्ववादी तसेच
असंवैधानिक विचार आणि भूमिका असलेल्या आर.एस. एस, भाजप व त्यांच्या समविचारी
संघटनाना येनकेन प्रकारे भारत देशाला “ब्राह्मणांची सर्वांगीण क्रूर सत्ता-वर्चस्व असलेला, विषमतेवर, उच-निचतेवर आधारीत देश म्हणजे हिंदुराष्ट्राच्या नावाखालील ब्राह्मणी राष्ट्र ” उभे करायचे आहे. त्यासाठी त्यांनी या – ना त्या कारणाने देशातील ख्रिश्चन, बौद्ध, शीख ई.सह भारतीय नागरिक मुसलमानांचाही छळ करायला सुरुवात केली आहे. कारण त्यांना या धर्मियांचा मोठा अडसर वाटत आहे.त्यासाठी त्यांनी सी.ए.ए., एन.पी.आर., आणि एन.आर.सी. सारखे जाचक कायदे करून मुसलमानांना या देशातून एकतर हाकलून लावायचे किंवा मग घुसखोर ठरवून आयुष्यभर छळ छावणीत डांबायचे, या उद्देशातून हे कायदे केलेले आहेत.
तर ॲट्रासिटी सारखे कायदे कमकुवत करून दलितांवर हल्ले,अन्याय, अत्याचार करणाऱ्यांना बळ प्राप्त करून द्यायचे अशा कृती – प्रयोगांना त्यांनी देशात सुरूवात केली आहे.
सद्या हिजाब वरून देशात याच कटाची एक कडी म्हणुन मुद्दामहून मुसलमानाचा धार्मिक वाद उभा करण्यात आला आहे, असे मला वाटते. कारण जी विद्यार्थिनी हिजाब घालते, ती तिच्या धर्माखातर घालते किंवा संस्कृतीखातर किंवा परंपरा टिकवून ठेवण्यासाठी घालते, किंवा तिच्या इच्छेखातर घालते, तिच्या मर्जीने घालते, तिला मिळालेल्या कौटुंबिक, सामाजिक स्वातंत्र्यामुळे घालते. त्यातून ती काही वेडेवाकडे करतेय किंवा दिसतेय यावर त्यांनाच व्यक्त होऊ द्यावं.त्यात त्यांनाच सुधारणा करायची असेल तर करू द्यावी किंवा असेच रहायचे असेल तर राहू द्यावे.याबाबत इतर धर्मीयांनी धार्मिक द्वेष भावनेतून तिच्यावर लक्ष ठेवण्याचं काही एक कारण नाही. हिजाब घालण्याचा सर्वश्री आधिकार त्या विद्यार्थिनीचा आहे. तिने अंगभर कपडे परिधान करायचे की तोकडे ? हा तिच्या मताचा,विचाराचा, हक्काचा, आवडी – निवडीचा, तिच्या मर्जीचा,
तिच्या स्वातंत्र्याचा आणि आधिकाराचा भाग आहे. आपल्या शहरावरून जर आपण नजर फिरवली तर विद्यार्थिनींना एवढे स्वातंत्र्य आहे, हे निश्चितच आपणास दिसून येईल. म्हणून स्री-पूरूष असमानतेवर आधारित, विषमतेवर आधारित, पुरूषप्रधानतेवर आधारित वर्चस्ववादी संस्कृती इथे बळजबरीने तीच्यावर लादण्याचा प्रश्नच उद्भभवत नाही. आणि तसा प्रयत्न ही कोणी करू नये.
www.janvicharnews.com
हिजाब आमची धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे, असे म्हणत जर विद्यार्थिनी हिजाब घालत असतील तर ही परंपरा मानायची की नाही? हे त्यांनाच ठरवू द्यावं. याचं उत्तर त्यांनाच देऊ द्यावं. त्यात इतर धर्मीयांनी हस्तक्षेप करण्याची काही अवश्यकता नाही, असे मला वाटतेय. कारण कोणतीही प्रथा,परंपरा जर वाईट असेल तर तो समाजच कालांतराने ते त्यागण्याचं धाडस सुद्दा करू शकेल. आणि नाही दाखवले तर त्यांच्याच धर्माला हानी पोहचेल. यात इतर धर्मीयांनी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही.
खरे तर आपण हे समजून घ्यायला हवे की, मुळात हा वाद महाविद्यालयीन व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक उभा केलेला आहे. शाळा, महाविद्यालयातील रस्त्यांवरून किंवा त्या परिसरात विद्यार्थिनी हिजाब परिधान करून वावरतात याबाबत कोणाला वाईट वाटण्याचे,किंवा आमचा धर्म बुडतोय किंवा आमचे मन दुखावतेय असे म्हणण्याचेही काहीच कारण नाही.
परंतू या महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे भाजप चे आमदार रघुपती भट हे आहेत. हे आपण आधी समजून घेतले पाहीजे.
ते तेथील एक मातब्बर नेते आहेत. ते संघीय, मनुस्मृतितील विषम आणि धर्मांध विचारसरणीचे आहेत. त्यांचा बोलविता धनी हा आर.एस.एस आणि भाजप आहे. या पाठबळावर एवढ्या षडयंत्रकारी संधीचे सोने करण्यात “संघी” तर नक्कीच पटाईत आहेत. ते ही संधी कशी बरे हातची जाऊ देतील? या दृष्टिकोनातूनही विचार झाला पाहीजे.
परंतू मला असे वाटते की, देशात केवळ ब्राह्मण्यवाद्यांचे सत्ता-वर्चस्व
स्थापण करण्यासाठीच
एक सोपा मार्ग म्हणून, देशाच्या एकतेचा, बंधुभावाचा, अखंडतेचा, शांततेचा आणि सर्वधर्मसमभावाचा बळी
देण्याचा हा मार्ग त्यांनी पत्करला आहे,जो देशहितार्थ नाही, तर देशद्रोही आहे.
त्यामुळे संघाचा हा एक देशविरोधी कटाचा भाग आहे हे सिद्ध होतेय.
याला बळकटी दिली ती अभाविप, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, एस डी पी आय सारख्या संघटनांनी. तसेच त्यांच्या सोबतच्या झुंडीनी आणि त्यांनी पोसलेल्या गुंड मुलांनी गळ्यात भगवे गमचे घालून आणि जयश्रिरामच्या
नाऱ्या सह रस्त्यावर धुडगूस घालून. जरा विचार करा की हा वाद आताच का उभा केला गेला आहे?
यापूर्वीच का नाही ? किंवा यानंतर का नाही? खरे तर ब्राह्मण्यवाद्यांना आता खुप घाई झाली आहे. 1925 साली त्यांनी स्थापन केलेल्या आर.एस.एस ला 2025 साली शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्यांना यानिमित्ताने हिंदूराष्ट्राच्या नावाखालील ब्राह्मणीवर्चस्व असलेले मनुराष्ट्र घोषित करायचे आहे. म्हणून ते काही मुद्दे जाणीवपूर्वक सरकार ऐवजी न्यायालयात नेऊन तेथून ते सोडवू इच्छित आहेत. यातून पक्ष,सरकार म्हणून ते नामानिराळे राहतात.
आणि न्यायालयानेच आता निकाल दिला आहे, तेंव्हा गप्प बसा, असा सुर आवळतात.
जसा बाबरी मशिदीचा मुद्दा सोडवून घेतला.
www.janvicharnews.com
खरे तर या धर्मनिरपेक्ष देशात असे वाद उभा करण्यात येऊच नयेत,या मताचा मी आहे. पण आता तर त्यांनी सरळ सरळ संविधानाच्या प्रस्तावनेतील समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या शब्दांना वगळण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेले आहेत. संविधानाच्या प्रस्तावनेतील हे दोन्ही शब्द वगळण्यात आले तर त्याचे तमाम देशवासियांना वाईट वाटेल. देशावर त्याचे विपरीत परिणाम होतील.
पण ब्राह्मण्यवाद्यांना तसे झाले तर आनंद होईल. आणि असा निकाल देणाऱ्यांना ते पेढे भरवतील. फूलमाला अर्पण करतील.
असे वाद उभा करणारी मानसिकता आर.एस.एस, भाजपवादी आहे की संविधानवादी? तर ती नक्कीच संविधानवादी नाही. मग या संविधानिक भारतात कर्नाटकातील भाजप सरकारने या महाविद्यालयीन व्यवस्थापनाविरूद्ध काय कार्यवाही केली? का नाही केली? हा प्रश्न अनुत्तरित आहेच.
विद्यार्थीनी शाळां – महाविद्यालयाच्या युनिफॉर्म सोबतच हिजाब परिधान करीत होत्या. कालपर्यंत त्यावर कोणाचा काही आक्षेप नव्हता. परंतू
“वर्गात बसायचे असेल तर हिजाब घालू नका”, असा मनुवादी हुकूम भाजप आमदार अध्यक्ष असलेल्या व्यवस्थापनाने अचानकच कसा काय काढला? इतर शाळां – महाविद्यालयाने का नाही काढला? कर्नाटक राज्यात इतर शाळां – महाविद्यालये नाहित काय?
तर निश्चितच आहेत. म्हणून या मागच्या कटाचे खरे सूत्रधार कोण आहेत? त्यांचे हात बांधून त्यांना देशासमोर आणले पाहीजे. त्यांना देशाच्या चौकात उभे केले पाहिजे. आणि याचा जाब त्यांना विचारला पाहीजे.
विद्यार्थिनी हिजाब घालून येतात म्हणून आम्ही गळ्यात भगवे गमचे घालून येऊ, हे काय त्यावरचं
उत्तर झालं? हि काय वैचारिक भूमिका झाली? हे काय देशहितार्थ शहाणपण झालं? हे काय एकमेकांना सामावून घेणं झालं? हि काय धर्मनिरपेक्षता झाली, हा काय सर्वधर्मसमभाव झाला? ही देश भेदण्याची
निती आहे. ब्राह्मण्यवाद्यांचे देशद्रोही षडयंत्र आहे.
ते हिरवं करतात तर आम्ही भगवं करू, हे काय त्यावरचं उत्तर होऊ शकतं ? यात सर्वधर्मसमभावाची बीजे नाहीत.यात देश एकसंध ठेवण्याचा भाव नाही.तर यात फुटीरतावाद टिच्चून भरलेला दिसून येतो. यात परधर्मीय द्वेष आहे. यात हटवादीपणा आहे. हुकूमशाहीची बीजं आहेत. यातूनच पुढे धर्मांध तेढ निर्माण होण्यास मदत होते. आणि हा धर्मांध तेढ देशाच्या ऐक्यासाठी घातक आहे, मारक आहे. यातून देश एकसंध उभा कसा राहणार? विद्यार्थिनी तर शाळां- महाविद्यालयाचा युनिफॉर्म घालतातच.
परंतू हिजाब परिधान करण्यावरून मुद्दामहून वाद उकरून काढून तो पेटता ठेवायचा, त्याच्या धुराने देश काळवंडून टाकायचा हा प्रकार देशाच्या एकात्मतेला नख लावणारा आहे .
देशातील वाढती गरीबी, महागाई, भूखमरी, कुपोषण, दारिद्र्य, अशिक्षितपणा, बेरोजगारी, हतबलता ई. असहाय्यतेने देशवासी त्रस्त आहेत. यावर कोणी बोलू नये, देशात या विषयावर चर्चा होऊ नयेत, देशाचं लक्ष या मुद्द्यांवरून भरकटवून नेऊन, त्यांच्यात फक्त धार्मिक उष्णता वाढवून देशातील धर्मांध अग्नीकुंडाचा आगडोंब धगधगता ठेवायचा, हे त्यामागचे आर.एस.एस. भाजपचे व त्यांच्या संघटना झुंडीचे षडयंत्र यामुळेच सर्वांनी मिळून हानून पाडले पाहीजे.
आता हे प्रकरण मा.सर्वोच्च न्यायालयात गेले आहे.तेथे यावर सुनावणी सुरू झाली आहे.
संविधानासह धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा, स्वातंत्र्य ई.सर्वच बाबींचा अन्वयार्थ लावल्या जाईल आणि यथोचित निर्णय ही होईल अशी अपेक्षा करू या. तोपर्यंत देशात कायदा आणि सुव्यवस्था, एकता, अखंडता,बंधुभाव,सौहार्द, शांतता आबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू या. आणि या संविधानिक मुल्यांचे जतन करू या.
आणि येथून पुढे आम्ही अशा देशविघातक मुद्द्यांवरून देशाचं लक्ष विचलित होऊ देणार नाहीत, देशाला आपल्या हातून गालबोट लावणार नाहीत,अशी भारतीय नागरिक म्हणून शपथ घेऊन या. आणि षडयंत्रकारी,धर्मद्रोही, देशद्रोही ब्राह्मण्यवाद्यांना या देशाच्या सत्ता स्थानावरून खाली खेचण्यासाठी देशातील सर्व धर्मीयांची एकजूट करू या.
हि आजच्या काळाची गरज बनली आहे.
कारण भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत….
या देशातील
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला आभिमान आहे….
हा देशहितार्थ सार हळूहळू पुसून टाकण्याचे प्रयत्न आर.एस.एस,भाजप आणि त्यांच्या झूंडींकडून जाणीवपूर्वक होऊ घातले आहेत.
अशी देशविघातक कृती आणि विचार देशातील एकता, भाईचारा, बंधुभाव, समानता, स्वातंत्र्य,न्याय या मूल्यांना छेद देणारे आहेत, असे मला वाटते.
www.janvicharnews.com
आजकाल हिंदू तरूण मोठ्या प्रमाणावर कपाळावर लाल-भगवा उभा किंवा गोल टिळा लावताना आपण बघत आहोत. गळ्यात किंवा हातात भगवा,पिवळा,लाल दोरा बाधीत आहेत.गळ्यात भगवं उपरणं घालून देशभर धर्मांध दहशत माजवीत आहेत. गळ्यात, मनगटावर रुद्राक्ष बांधीत आहेत आणि शाळा महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. यावर जरूर विचार झाला पाहीजे. मुली सुद्धा कपाळावर लाल,भगवी, पीवळी, गुलाबी ई. रंगाची टिकली लाऊन शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी जात आहेत. जिन्स पॅण्ट, शर्ट्स घालत आहेत. यात काही वावगं आहे, असे मला व्यक्तिश वाटत नाही. तो त्यांच्या आधिकाराचा आणि स्वातंत्र्याचा भाग आहे. ती त्यांची व्यक्तिगत बाब आहे.
काही लग्न झालेल्या मुली, महिलांच्या डोक्यातील भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, कानात, नाकातील दागीण्यांसह हातात बांगड्या, बोटात अंगठ्या,पायात चैन,
पायातील बोटात जोडवे ई. संस्कृती, प्रथा, परंपरा दर्शक आभूषणे घालून शिक्षण घेण्यासाठी जातातच. यावर इतर धर्मीयांकडून कधी आक्षेप आला आहे काय? तर निश्चितच नाही. मग ब्राह्मण्यवाद्यांनी मुसलमानांच्या पेहरावरून धर्मीयवाद का बर करावा ? मला वाटते हे संविधानाने त्यांना दिलेल्या स्वातंत्र्याचे द्योतक आहे. तुम्हाला जर भारतीय संविधानातील मुल्यांनी, हे स्वातंत्र्य बहाल केलेले असेल आणि तुम्ही जर त्याचा उपयोग आणि आनंद घेत असाल आणि आपली संस्कृती, परंपरा, स्वातंत्र्य आणि देशहित जपत असाल तर आनंदच आहे. मग इतर धर्मीय बांधवांकडून विरोध होण्याचे काही कारण नाही.
जर अशा प्रकारामुळे त्यांची संस्कृती, धर्म, परंपरा, संस्कार ई. बाबी जोपासल्या जात असतील, तर त्याला कुण्या एका धर्मीयांकडून विरोध का व्हावा? काय असा विरोध म्हणजे धर्मांधांची अतिरेकी तालीबानी बळजबरी नाही? देशात राहणाऱ्या सर्व धर्मीयांनी गुण्यागोविंदाने रहावे, असे यांना वाटत नाही काय? यावर विचार केला पाहीजे.
काय शरीरावर परिधान केलेल्या या सर्व धर्मियांच्या प्रथा,परंपरा, संस्कार, संस्कृती,धर्म ई.नी या पूर्वी कधी सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण दुषीत केले आहे? कुलूषीत केले आहे? मानवता, एकतेला कधी ठेच पोहचवली आहे? सद्भावनेला कधी ठेच पोहचवली आहे ? एखाद्याच्या धर्म,परंपरा, संस्कृतीवर अशा प्रकारच्या बंदीची मागणी केली आहे?
www.janvicharnews.com
अशा प्रकारच्या स्वातंत्र्यामुळे देशाची एकता, अखंडता कधी धोक्यात आली आहे? अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी शाळा, महाविद्यालयात आपापल्या संस्कृतीचे, विविधतेने नटलेल्या परंपरांचे पालन केल्याने देशाचे कधी काही नुकसान झाले आहे? कधी देशात भीतीचे वातावरण तयार झाले आहे? कधी देशात द्वेषाचे वातावरण तयार झाले आहे?तर निश्चितच नाही.
मग आताच का अशी देश तोडणारी आणि भेदणारी वातावरण निर्मिती केल्या जात आहे? ती कोणाकडून केल्या जात आहे? आणि कशासाठी केल्या जात आहे? त्यासाठी एवढी घाई का होत आहे? त्यासाठी संपूर्ण देश वेठीस का धरल्या जात आहे? धर्माच्या नावावर देश का तोडल्या जात आहे?
या प्रश्नांची उत्तरं देशवासियांनी समजून घेतली पाहीजेत. आपल्या देशाला समृद्ध करण्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून वागले पाहीजे. सर्वांनी मिळून देशाच्या अखंडतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. देशात न्यायभावना बळकट करण्यासाठी पुढाकार घेतला पाहीजे.
बंधुभाव, धर्मनिरपेक्षभाव, सर्वधर्मसमभाव वाढीस लावला पाहीजे. या अशा संविधानिक आचरणातून आणि विचारातूनच
संविधानिक मुल्यांना
बळकटी प्राप्त होईल. यातूनच व्यक्ती ,समाज, देश बलवान होईल. देशातील विविध धर्मीयांत एकोपा, भाईचारा, शांती, सामाजिक सौहार्द जपला जाईल. आणि भारत देश अखंड राहील. समृद्ध होईल.
धन्यवाद.
ॲड. सुभाष सावंगीकर औरंगाबाद.
मो. 9325209492
टीप – वरील सर्व मते लेखकाची व्यक्तिगत मते आहेत जन विचार पोर्टल जबाबदार नाही